आज देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील कर्तत्वपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा संपन्न झाला. दिल्लीतील कर्तत्वपथावर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अनेक मान्यवर या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सहभागी झाले होते. यात युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांचा समावेश होता. आजच्या सोहळ्यामध्ये ध्वजवंदनसोबतच परेड देखील संपन्न झाली. (Republic Day)
प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर एक मोठी आणि खास परेड संपन्न होते. ही परेड दिल्ली प्रजासत्ताक दिनाची परेड ही भारतातील प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या परेडपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वाची परेड आहे. ही परेड दरवर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कार्तव्य पथ येथे होते. या परेडच्या माध्यमातून कर्तव्यपथावर भारताची सांस्कृतिक परंपरा, विविध क्षेत्रातील योगदान, तसेच देशाच्या सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले जाते. हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे मुख्य आकर्षण आहे, जे तीन दिवस चालते. मात्र या परेडचे सुरुवात कशी आणि कधी झाली याची माहिती आहे का? (Marathi News)

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५० रोजी साजरा करण्यात आला होता. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे आयोजन १९५५ सालापासून सुरू झाले. याआधी परेडचे आयोजन इरविन स्टेडियम (सध्या ते मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जाते), रामलीला मैदान आणि लाल किल्ला यांसारख्या ठिकाणी केले जात असे. प्रजासत्ताक दिनाची परेड राष्ट्रपती भवनाजवळ सुरू होऊन लाल किल्ल्यावर संपते. हे सुमारे ८ किलोमीटरचे अंतर आहे. संविधान लागू झाल्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतल्यानंतर दिल्लीच्या जुन्या किल्ल्या जवळील इरविन स्टेडीयमवर पहिल्यांदा ध्वजसंचलन झाले होते. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन सलामी देण्यात आली होती. त्यानंतर परेड झाली होती. (Top Marathi NEws)
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गर्व्हनर जनरल सी राजगोपालाचारी हेही उपस्थित होते. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, इरविन स्टेडीयमचे नामकरण आधी नॅशनल आणि नंतर मेजर ध्यानचंद स्टेडीयम असे ठेवण्यात आले होते. २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक दिनी जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इर्विन स्टेडियमवर तिरंगा फडकवला तेव्हा त्यांना ३० तोफांची सलामी देण्यात आली. आता २१ तोफाची सलामी दिली जात असते. भारतीय लष्कराच्या सात विशेष तोफांमधून ही सलामी दिली जाते. या तोफांना Ponders म्हणतात. १९४१ मध्ये पोंडर्स तोफ बनवण्यात आल्या. लष्कराच्या सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा समावेश करण्याची प्रथा आहे. तो कधीही बदलला नाही. (Top Trending Headline)
======
Republic Day : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्याच हस्ते ध्वजवंदन का केले जाते?
Republic Day : राष्ट्रध्वज फडकवण्याचे आहेत काही नियम आणि कायदे
======
परेडद्वारे भारतीय लष्कराची ताकद आणि शिस्त दाखवण्यात येते. विविध राज्यांच्या चित्ररथाद्वारे भारतातील सांस्कृतिक विविधता सादर केली जाते. लष्कर, नौदल, वायूदल या तीनही सैन्य दलाकडून शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येते. सैन्याकडून दुचाकी वाहनांवर थरारक प्रात्यक्षिके केली जातात. NCC Cadets ही यामध्ये सहभागी होतात. अनेक दिवस परेडचा सराव करण्यात येतो. २३ जानेवारीला अंतिम सराव केला जातो. सरकारच्या अनेक विभांगांचे चित्ररथही या पथसंचलनामध्ये सहभागी होतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
