Home » Cleaning Tips : बाथरूममधील बोअरवेलच्या पाण्याचे हट्टी डाग काढण्यासाठी ‘हे’ उपाय करा

Cleaning Tips : बाथरूममधील बोअरवेलच्या पाण्याचे हट्टी डाग काढण्यासाठी ‘हे’ उपाय करा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Cleaning Tips
Share

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्वच्छतेला खूपच महत्त्व आहे. घरातील केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील स्वच्छतेसाठी कायम आग्रही असतात. आता घराची स्वच्छता म्हणजे केवळ हॉल, बेडरूम किंवा किचन एवढेच स्वच्छ करणे नाही. तर यात बाथरूम आणि टॉयलेटदेखील येतात. घरातील बाथरूम आणि टॉयलेट यांची स्वछता तर सर्वात महत्वाची मानली जाते. मात्र सध्याच्या काळात अनेक घरातील बाथरूम आणि टॉयलेटमधे बहुतकरून बोअरवेलचे पाणी असते. यामुळे टॉयलेट आणि बाथरूममध्ये या बोअरवेलच्या पाण्याचे डाग सर्वत्र पडलेले दिसतात. हे डाग सामान्य डागांसारखे नसल्याने ते काढणे देखील खूपच अवघड असते. (Cleaning Tips)

बोअरवेलच्या पाण्यात नैसर्गिकरित्या अधिक क्षार असतात. हे क्षार नळांवर, सिंकवर वाळून साठतात आणि पांढरट डाग तयार करतात. हे डाग केवळ वाईटच दिसत नाहीत, तर अनेकदा त्यावर जंतू सुद्धा साठतात. अनेक उपाय करून देखील हे डाग काढणे कठीण होऊन बसते. पण डाग काढले नाही तर आपल्यालाच बाथरूम वापरणे खूपच विचित्र आणि असहज वाटते. पाहुणे आल्यावर देखील लाजिरवाणे होते अशावेळेस काय करावे हे सुचत नाही. आज आम्ही तुम्हाला हेच डाग काढण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत, जे करून तुम्ही नक्कीच हे डाग काढू शकता. (Home)

बटाटा आणि बेकिंग सोडा
एक मध्यम आकाराचा बटाटा अर्धा कापून घ्या. त्या अर्ध्या बटाट्यावर अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. आता हा बटाटा नळावर आणि सिंकवर हळूहळू घासा. किंबहुना जिथे जिथे डाग आहेत, त्या भागावर घासा. बटाट्यात असलेला स्टार्च आणि बेकिंग सोडाचे सौम्य अॅसिडिक गुणधर्म एकत्र मिळून डाग सहज काढून टाकतात. काही मिनिटांतच तुम्हाला फरक जाणवेल. (Marathi)

टोमॅटो सॉस
टोमॅटो सॉसचे द्रावण नळातील पाण्याचे डाग काढून टाकण्यासाठी देखील खूप प्रभावी मानले जाते. हा उपाय करण्यासाठी, नळावर तीन चमचे टोमॅटो सॉस पूर्णपणे लावा आणि सुमारे 20 मिनिटे सोडा. त्यानंतर, ब्रश घ्या आणि नळ पूर्णपणे घासून घ्या आणि नंतर कोरड्या कापडाने स्वच्छ करा. (Todyas Marathi Headline)

Cleaning Tips

लिंबू किंवा व्हिनेगर
नळांवर असणारे हट्टी पाण्याचे डाग काढून टाकण्यासाठी व्हिनेगर आणि लिंबू उत्तम पर्याय आहे. हा उपाय करण्यासाठी, तुम्हाला टॅपवर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर फवारावे लागेल आणि सुमारे २० मिनिटे सोडावे लागेल. यानंतर ब्रशच्या मदतीने नळ स्क्रब करून स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या कापडाने नळ पूर्णपणे पुसून टाका. आपण लिंबू आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळून देखील वापरू शकता. हे मिश्रण तुम्ही बाथरूमच्या भिंतीवरील टाइल्सवर ते शिंपडा. दोन मिनिटांनंतर स्कॉच ब्रशच्या मदतीने भिंती घासून स्वच्छ करा. (Social Updates)

ब्लिच वापरा
तुमच्या बाथरूमच्या टाइल्स चमकवण्यासाठी तुम्ही ब्लिचचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एका कपमध्ये आवश्यकतेनुसार ब्लीच घ्या आणि नंतर जुन्या टूथब्रशच्या मदतीने टाइलवरचे डाग साफ करा. त्याच वेळी, ब्लीचमध्ये थोडासा सोडा मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा. टाइल्समधील अंतर साफ करण्यासाठी ही पेस्ट वापरा. ते टूथब्रशने लावा आणि सुमारे १५ मिनिटे तसेच राहूद्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढा. (Top Marathi News)

हायड्रोजन पेरोक्साइड
हायड्रोजन पेरोक्साइड हे एक उत्कृष्ट ब्लीचिंग एजंट आहे जे तुमच्या टाइलमधील घाण आणि काजळी सहजपणे काढून टाकू शकते. हे रसायन थेट न घालता त्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घाला. आता हट्टी डागावर त्याची पेस्ट स्प्रे करा आणि घासून स्वच्छ करा.

टूथपेस्ट
बाथरूममधील नळांवर असणारे डाग काढण्यासाठी टूथपेस्ट देखील उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट नळावर लावा आणि सॉफ्ट ब्रशने हळूहळू घासा. नंतर पाण्याने किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. (Top Trending Headline)

=======

Bhojshala Saraswati Temple : सरस्वती मंदिराचे रहस्य

=======

लिंबाचा रस आणि डिटर्जंट
बाथरूममधील टाइल्सवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि डिटर्जंटचाही वापर फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एका भांड्यात फक्त लिंबाचा रस आणि डिटर्जंटची पेस्ट बनवा आणि ब्रशच्या मदतीने टाइल्स नीट घासून घ्या. फरशी साफ करताना खूप जोमाने घासणे टाळा आणि जास्त रसायनांचा वापर करू नका. यामुळे टाइल्स खराब होऊ शकतात. (Top stories)

व्हाईट व्हिनेगर
कोणत्याही प्रकारचे डाग दूर करण्यासाठी व्हिनेगर हा एक चांगला पर्याय असू शकतो. ती प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात ठेवली जाते. यासाठी प्रथम एक लिटर पाण्यात काही चमचे व्हिनेगर चांगले मिसळा. यानंतर, या पाण्याने डाग फवारणी करा आणि स्पंजने घासून घ्या. काही वेळाने पाण्याने धुवा. तुम्हाला दिसेल की डाग निघून गेले आहेत. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.