Home » Saraswati : दिवसाच्या ‘या’ प्रहरात देवी सरस्वती करते प्रत्येकाच्याच जिभेवर वास

Saraswati : दिवसाच्या ‘या’ प्रहरात देवी सरस्वती करते प्रत्येकाच्याच जिभेवर वास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Saraswati
Share

आज वसंतपंचमी अर्थात देवी सरस्वतीची जयंती. आजच्याच दिवशी देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली आहे. सरस्वती ही विद्या, बुद्धि, ज्ञान आणि वाणीची प्रमुख देवता आहे. शास्त्र-ज्ञान देणारी आहे. भगवती सरस्वती सत्वगुणसंपन्न आहे. त्यांची बरीच नावे आहेत ज्यात वाक, वाणी, गी, गिरा, भाषा, शारदा, वाचा, श्रीश्वरी, वागीश्वरी, ब्राह्मी, गौ, सोमलता, वाग्देवी आणि वागदेवता अधिक प्रसिद्ध आहेत. सरस्वती देवीच्या वार्षिक पूजेबरोबरच विद्यार्थ्यांच्या अक्षरारंभ आणि विद्यारंभ देखील केले जाते. वसंत पंचमीला श्री पंचमी, ज्ञानपंचमी असेही म्हणतात. हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येतो. हिंदू परंपरेनुसार, संपूर्ण वर्ष सहा ऋतूंमध्ये विभागले गेले आहे, ज्यात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर ऋतु समाविष्ट आहे. या ऋतूंमध्ये वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजा म्हटले जाते आणि म्हणूनच ज्या दिवशी वसंत ऋतु सुरू होतो तो दिवस बसंत पंचमीचा सण म्हणून साजरा केला जातो. (Vasant Panchami)

प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो, असे म्हटले जाते. सरस्वती जीभेवर वास करते म्हणजे काय तर त्यावेळी जे बोलले जाते ते अगदी तंतोतंत खरे ठरते. म्हणूनच माणसाने कायम चांगले आणि खरे बोलले पाहिजे. कारण माहित नाही माता सरस्वती कधी आपल्या वाणीवर विराजमान असेल आणि आपण जे बोलू ते खरे ठरेल. धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की, २४ तासांत २० मिनिटे अशी असतात जेव्हा सरस्वती जिभेवर बसते आणि ती गोष्ट खरी ठरते. म्हणूनच असे म्हटले जाते की माणसाने खरे बोलावे आणि चांगला विचार करावा. देवी सरस्वती ही ज्ञान, बुद्धी आणि विद्येची देवी आहे. मग नक्की सरस्वतीची जिभेवर विराजमान होण्याची वेळ कोणती असते? (Todays Marathi Headline)

Saraswati

शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवी सरस्वती जिभेवर वास करतात. ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा काळ. या मुहूर्तावर पूजा, पठण इत्यादी धार्मिक उपक्रम केले जातात. ब्रह्म मुहूर्तावर जागे होऊन, देवी सरस्वतीचे ध्यान करून आपली इच्छा व्यक्त केल्याने, इच्छा लवकरच पूर्ण होते असे मानले जाते. मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे ०३.२० ते ०३.४० पर्यंत असते. असे मानले जाते की, यावेळी देवी सरस्वतीचे ध्यान करून तुम्ही जे काही बोलता किंवा इच्छा करता ते सर्व खरे ठरते. दुसरीकडे, जर विद्यार्थ्यांनी ब्रह्म मुहूर्तावर सरस्वतीची पूजा करून अभ्यास केला तर त्यांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढते आणि मानसिक विकास देखील मजबूत होतो. ब्रह्म मुहूर्तावर सकारात्मक बोलण्यासोबतच या गोष्टी करणेही शुभ मानले जाते. (Top Trending Headline)

=========

Saraswati : वसंत पंचमीला का आहे पिवळ्या रंगाला महत्व?

=========

देवी सरस्वती ही बुद्धी आणि ज्ञानाची देवी मानली जाते. देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जप आणि पूजा करावी. दिवसाच्या कोणत्याही वेळेस कधीच कोणाबद्दल चुकीचा आणि वाईट विचार करू नये, कारण तुमच्या जिभेवर सरस्वती कधी येईल आणि जे सांगितले जाईल ते खरे होऊन जाईल कोणास ठाऊक. त्यामुळे माणसाने नेहमी लोकांशी चांगले बोलले पाहिजे. कोणाबद्दल वाईट बोलू नये. सतत स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सकारत्मक विचार करा आणि आपल्यासोबतच इतर सगळ्यांचे देखील चांगले होऊ दे अशी देवी सरस्वतीकडे प्रार्थना करावी. (Social News)

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.