Relationship Tips : नात्याच्या सुरुवातीला मिळणारे अतिप्रेम, सततचे कौतुक, महागडी गिफ्ट्स आणि “तूच माझं सर्वकाही आहेस” असे शब्द अनेकांना स्वप्नासारखे वाटतात. मात्र, हे प्रेम नेहमीच खरं असतं असं नाही. काही वेळा यामागे लव्ह बॉम्बिंग (Love Bombing) नावाची मानसिक खेळी असू शकते. लव्ह बॉम्बिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीला भावनिकरित्या आपल्यावर अवलंबून बनवण्यासाठी अतिप्रेमाचा भडिमार करणे. ही एक प्रकारची भावनिक छळवणूक (Emotional Manipulation) आहे, जी वेळेत ओळखली नाही तर मानसिक त्रास देऊ शकते.
लव्ह बॉम्बिंग म्हणजे काय?
लव्ह बॉम्बिंग ही एक अशी वागणूक आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती नात्याच्या सुरुवातीलाच अतिशय जास्त प्रेम, लक्ष, वेळ आणि आश्वासन देऊन समोरच्या व्यक्तीला भावनिक जाळ्यात अडकवते. सुरुवातीला समोरची व्यक्ती स्वतःला खास, सुरक्षित आणि अत्यंत महत्त्वाची असल्यासारखी वाटते. मात्र, हळूहळू हे प्रेम नियंत्रण, अपेक्षा आणि भावनिक दबावात बदलते. लव्ह बॉम्बिंग करणाऱ्या व्यक्तीचा खरा उद्देश प्रेम नसून नियंत्रण असते.

अतिवेगाने नातं पुढे नेणं आणि सतत संपर्क
लव्ह बॉम्बिंगचा पहिला संकेत म्हणजे नातं फार वेगाने पुढे नेण्याचा आग्रह. “आपण लवकर लग्न करूया”, “तूच माझं आयुष्य आहेस” अशी मोठी विधानं काही दिवसांतच केली जातात. दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे सतत फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल्स. सुरुवातीला हे प्रेम वाटतं, पण नंतर तुमचं वैयक्तिक आयुष्य, वेळ आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं.
अति कौतुक आणि अपराधीपणाची भावना निर्माण करणे
लव्ह बॉम्बिंग करणारी व्यक्ती सतत कौतुक करते, तुम्हाला परफेक्ट असल्याचं सांगते, इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरवते. मात्र, जेव्हा तुम्ही त्यांच्या अपेक्षेनुसार वागलं नाही, तेव्हा ती व्यक्ती अचानक थंड होते. यासोबतच “मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू एवढंही करू शकत नाहीस?” असे म्हणत अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते. हा भावनिक दबाव खूप हळू आणि सूक्ष्म असतो.(Relationship Tips)
==========
हे देखील वाचा :
Women Mental Health : महिला आतमधून बैचन का राहतात? वाचा हाय-फंक्शनिटी एंग्जायटी म्हणजे काय आणि उपाय
Simmer Dating नक्की काय आहे? Gen Z तरुणाईमधील रिलेशनशिपचा नवा ट्रेंड
Eye Care : वाढत्या वयासह डोळ्यांखाली डार्क सर्कल्स वाढले जातात? वाचा कारणे आणि सोपे घरगुती उपाय
===========
प्रेम अचानक कमी होणे आणि नियंत्रण वाढणे
लव्ह बॉम्बिंगचा सर्वात धोकादायक संकेत म्हणजे प्रेम अचानक कमी होणे. सुरुवातीचा ओघातला प्रेमवर्षाव थांबतो आणि त्याऐवजी टीका, दुर्लक्ष, संशय आणि नियंत्रण सुरू होते. तुमच्या मित्रमैत्रिणींपासून दूर ठेवणे, निर्णयांवर प्रभाव टाकणे आणि आत्मविश्वास कमी करणे हे यामध्ये दिसून येते. यामुळे व्यक्ती मानसिकरित्या अस्थिर आणि गोंधळलेली होते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
