सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते. नुकतीच माघ महिन्याची सुरुवात देखील झाली आहे. सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. यंदा रथसप्तमी २५ जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते. रथसप्तमीचा दिवस हा मकरसंक्रांतीचा शेवटचा दिवस असतो. रथसप्तमी ही संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी होती. (Rathsaptami)
महाराष्ट्रामध्ये देखील रथसप्तमीला खूपच महत्त्व आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये रथसप्तमीच्या दिवशी सकाळी घरामध्ये दूध ओतू घातले जाते. एरवी कधीही घरात दूध ओतू गेले की, रथसप्तमी झाली असे म्हटले जाते. तेव्हा दूध ओतू गेल्यामुळे जे नुकसान होते आणि साफसफाचे काम वाढते याचा त्रास प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र रथसप्तमीच्या दिवशी खास दूध ओतू घातले जाते. ही खूपच जुनी आणि आजही पाळली जाणारी प्रसिद्ध परंपरा आहे. रथसप्तमीला दूध ओतू घालवण्यामागे देखील एक खास आणि मोठा विचार आहे. कोणता तो पाहूया. (Marathi)

रथसप्तमीला दूध ओतू घालतात कारण हा दिवस सूर्याच्या उत्तरायणातील प्रवासाचा, नवीन वर्षाच्या सुरुवातीचा आणि समृद्धीचा काळ असतो. ओतू घालवलेले दूध हे सूर्याच्या तेजोमय उर्जेचे प्रतीक मानले जाते. हे दूध पृथ्वीच्या ‘तेज’ तत्त्वाशी जुळून आपल्या शरीरातील प्राणशक्ती वाढवते. शिवाय ते नवीन धान्य आणि शुभ कार्यांच्या सुरुवातीचे प्रतीक देखील आहे. मुख्य म्हणजे रथसप्तमीला दूध ओतू घालणे हा सूर्यदेवाच्या उपासनेचा एक भाग आहे, जो नवीन सुरुवात आणि आरोग्य दर्शवतो. (Latest Marathi News)
रथसप्तमीला सूर्यदेव उत्तर गोलार्धात प्रवास सुरू करतात. या दिवशी अग्नीवर दूध उतू घालणे हे सूर्याच्या तेजतत्त्वाचे प्रतीक मानले जाते. हे तेज शरीरातील ऊर्जा वाढवते, असे मानले जाते. रथसप्तमीचा सण वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो आणि नवीन पिकांची कापणी सुरू होते. दूध उतू घालणे हे नवीन सुरुवात, समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे. ओतू घातलेले दूध हे आत्म्याच्या ऊर्जा कवचाला शुद्ध करते आणि शरीरातील ‘पंच-प्राण’ जागृत करण्यास मदत करते, अशी धार्मिक धारणा आहे. यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते असे मानतात. दूध हे मातीच्या छोट्या मडक्यात किंवा बोळक्यात तापवून ओतू घातले जाते. हे पृथ्वी, तेज आणि जल तत्त्वांच्या संयोगाचे प्रतीक आहे, जे पृथ्वीच्या वातावरणातील बदलांशी जोडलेले आहे. (Top Trending Headline)
========
Rathsaptami : रथसप्तमीला सूर्य देवाची पूजा कशी करावी?
========
रथसप्तमीला दूध ओतू कसे घालावे?
अग्नी देवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध ओतू घालवले जाते. दुपारी १२ च्या आत दूध ओतू घालणे लाभदायक असते. दूध अग्नी देवाला ओतू घालण्यासाठी प्रथम एक तवा घ्या. (शक्य असल्यास एक छोटीशी चूल मांडावी.) आता तव्यावर समिधा, गौवऱ्याचे छोटे दोन ते तीन तुकडे, वाळलेल्या छोट्या काठ्या घ्याव्या. दूध हे अंगणात तुळशीसमोर ओतू घालवल्यास उत्तम. जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर दूध ओतू घालवावे. आता एक मातीचे भांडे घ्या. त्यात पांढरे तीळ आणि साखर चिमूटभर घालावी. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घालावे. भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल या पद्धतीने ठेवावे. आता तव्यावर ठेवलेल्या समिधा प्रज्वलीत करा. त्यानंतर ही दुधाचे भांडे त्यावर ठेवा. आता या अग्नीला आणि दुधाच्या भांड्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. आता दूध ओतू घालवावे. दूध ओतू गेल्यानंतर उरलेले दूध टाकून न देता या दुधाचे घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे. पूर्वी दूध ज्या दिशेला ओतू जाईल, तिकडे समृद्धी येते असे म्हटले जायचे. (Social News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
