इराणी चलन रियालचे मूल्य घसरल्यामुळे इराणमध्ये सुरु झालेल्या निदर्शनांना आता १५ दिवस होऊन गेले आहेत. आता या निदर्शनांचे हिंसक आंदोलनात रुपांतर झाले असून अवघा इराण त्यात उतरल्याचे चित्र आहे. या सर्वात इराणच्या रस्त्यावर मोठ्या संख्येनं महिलाही उतरल्या असून त्यांनी कट्टर नियमांविरोधात खामेनी यांना आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. ( Iran’s Anti-Government Protests )
सोबतच इराणमधील नोकरदार आणि व्यापारीही या आंदोलनात उतरले असून अवघे इराण ठप्प झाले आहे. त्यातच येत्या आठवड्यात अमेरिका इराणवर आक्रमण करुन खामेनींना सत्तेबाहेर करुन शकते, अशीही बातमी आहे. त्यामुळे इराणच्या रस्त्यावर आंदोलकांना जोर आला आहे.

हे चिघळलेले आंदोलन आता इराण सरकारच्या पार हाताबाहेर गेले असतांना खामेनी यांनी त्यांच्या खास सैनिकांना रस्त्यावर उतरवले आहे. खामेनींची ही बासीज सेना क्रुरतेसाठी ओळखली जाते. इराणमध्ये २००९ आणि २०२२ मध्ये अशाच प्रकारची आंदोलने झाली. तेव्हाही बासीज लढवय्यांनी ही आंदोलने दडपून टाकली. ( Iran’s Anti-Government Protests )
आता पुन्हा बासीज लढवय्ये रस्त्यावर उतरले असून त्यांना आंदोलकांना मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बासीज हा १९७९ मध्ये स्थापन झालेला एक इराणी निमलष्करी गट आहे. इराणमध्ये इस्लामिक राजवट टिकवून ठेवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
देशातील सामाजिक सुव्यवस्था राखणे, मतभेद दडपणे, नैतिकतेचे पोलिसिंग करणे आणि सामाजिक सेवा प्रदान करणे या नावावर हे बासीज सैनिक मानवी हक्कांचे उल्लंघन आणि निदर्शकांचे क्रूर दमन करण्यासाठी ओळखले जातात. २०२२ मधील आंदोलन दडपतांना अनेक महिलांवर या बासीज सैनिकांनी अत्याचार केल्याच्या घटनाही झाल्या आहेत. ( Iran’s Anti-Government Protests )
आता खामेनी यांनी आंदोलकांची सर्व सूत्र याच बासीजच्या हातात दिल्यामुळे इराणच्या रस्त्यावर पुन्हा रक्ताचे सडे पडणार अशी भीती व्यक्त होत आहे.
इराणमध्ये सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याविरोधात सुरु झालेले आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. आता या आंदोलकांना उघडपणे अमेरिका पाठिंबा देत असल्यामुळे आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे.

अशात इराणच्या प्रत्येक शहरात सुरु असलेले आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी अयातुल्ला अली खामेनी यांनी अखेर त्यांच्याकडील शेवटचे आणि अत्यंत निष्ठुर शस्त्र बाहेर काढले आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या सरकारने बासीज या निमलष्करी गटाला आंदोलन नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. ( Iran’s Anti-Government Protests )
बासीज सैनिकांनी हे आदेश मिळाल्यावर काही तासातच ५०० आंदोलकांना ठार मारल्याची माहिती आहे. इराणमध्ये सुरु असलेले आंदोलन आपल्या हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाल्यावर खामेनी यांनी देशाला संबोधित केले. त्यात त्यांनी आंदोलकांचे वर्णन अमेरिकन अजेंडा म्हणून केले.
त्यावेळी त्यांनी इराण कोणासमोरही झुकणार नाही असे सांगून इराणी संसदेच्या शिफारशीनुसार बासीज गटाला रस्त्यावर तैनात केले. त्यामुळे खामेनी यांनी आता या आंदोलकांना थेट मारण्याच्या सूचना दिल्याचेही स्पष्ट झाले. ( Iran’s Anti-Government Protests )
बासीज गटाची स्थापना १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीनंतर करण्यात आली. इराणचे अमेरिकेपासून रक्षण करण्यासाठी या बासीजची स्थापना झाली. त्यामुळेच की काय, अमेरिका या बासीज गटाला अतिरेकी गट म्हणून संबोधिते.
बासीजमध्ये फक्त ग्रामीण इस्लामिक रूढीवादी पार्श्वभूमीतील लोक असतात. स्थानिक पातळीवर, ही संघटना मशिदींद्वारे लोकांवर नियंत्रण ठेवते. या संघटनेत अंदाजे २० दशलक्ष सैनिक असल्याचा दावा करण्यात येतो. या सर्वंचे वय १८ ते ५० वर्षे असते.
जगापुढे बासीज गटाचे क्रौर्य २००९ आणि २०२२ या वर्षातील आंदोलनातून पुढे आले. ही आंदोलने चिरडून टाकण्यासाठी बासीजनं अत्यंत क्रूरपणे आंदोलकांना मारले आहे. यात अनेक महिलांचाही समावेश आहे. ( Iran’s Anti-Government Protests )
=======
हे देखील वाचा : Iran Protests : इराणमधील मशिदी मशिदींना लागले टाळे
=======
बासीज सैनिक हे कट्टरतावादी आणि इस्लामिक रिपब्लिकशी अत्यंत निष्ठावान आहेत. संपूर्ण काळ्या पोशाखातील बासीजचे सैनिक शहरात कुठेही गस्त घालू शकतात. त्यांच्याजवळ कायम शस्त्र असते, या शस्त्रांनी त्यांनी कोणाला मारल्यास तो गुन्हा ठरत नाही.
कधीही, कोणाचीही, तपासणी करण्याचा अधिकार त्यांना आहे. बासीजवर मानवी हक्कांचे उल्लंघन, छळ, बलात्कार आणि नागरिकांविरुद्ध हिंसाचाराचे आरोप आहेत. अमेरिकेसह अनेक देश बासीजचा उल्लेख दहशतवादी संघटना म्हणून करतात.
आता हिच घातक बासीज सेना इराणच्या रस्त्यावर आंदोलकांना धमकावत असून आत्तापर्यंत त्यांनी ५०० आंदोलकांना ठार मारले आहे. ( Iran’s Anti-Government Protests )
सई बने
