चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘RRR’ देशभरातील ३२०० हून अधिक स्क्रीन्सवर हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच बुकिंगच्या बाबतीत चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने एंडवांस बुकिंगच्या बाबतीत सर्वच चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. मग ते साऊथचे चित्रपट असोत की बॉलिवूडचे. एंडवांस बुकिंगच्या बाबतीत चित्रपटाने 6 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची 2 लाख तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, एंडवांस बुकिंगच्या बाबतीत चित्रपटाने 6 कोटींचा टप्पा पार केला आहे. यासह, हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक बुकींग करणारा चित्रपट बनला आहे.
====
हे देखील वाचा: आरआरआर रिलीजहोण्याआधी चित्रपटगृहे सतर्क, स्क्रिनसमोर ठोकले खिळे
====
राष्ट्रीय आणि गैर-राष्ट्रीय मल्टिप्लेक्स साखळींमध्ये RRR साठी सरासरी तिकिटाची किंमत सुमारे ३०० रुपये आहे. टियर वन शहरांचा विचार केला तर, RRR साठी मल्टिप्लेक्समध्ये सरासरी तिकीटाची किंमत रु. ३७५ पेक्षा जास्त आहे, जे हिंदी सिनेसृष्टीतील चित्रपटासाठी विकले जाणारे सर्वात महाग तिकीट आहे.
हिंदी पट्ट्यात आरआरआरची सुमारे २ लाख तिकिटे विकली गेली आहेत. या सर्व बाबी पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी १३ ते १४ कोटींचा व्यवसाय करू शकतो, असे मानले जात आहे.
स्पॉट बुकिंग देखील सिंगल स्क्रीनवर पाहावे लागेल. चित्रपटाच्या बुंकिंगचा वेग बघितला तर पहिल्याच दिवशी चित्रपटाची कमाई १५ ते १६ कोटींपर्यंत जाऊ शकते.
#RRR hindi 6 cr+ mark crossed. Highest advance bookings for any Hindi release 2022 including Bollywood movies.
— Indian Box Office (@box_oficeIndian) March 24, 2022
राजामौली यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. काहीही असो, चांहत्याचे आवडते स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यामध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्ट देखील आहेत.
====
हे देखील वाचा: ‘Soorarai Pottru’च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार सोबत दिसणार राधिका मदन?
====
अजय देवगण आणि आलिया भट्ट यांचा हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट आहे. आलिया आणि अजयच्या चाहत्यांना साऊथ चित्रपटात पदार्पण पाहण्यासाठी सगळेच उत्सुकता आहे.