Home » Indian Army : भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देणारा ‘आर्मी डे’

Indian Army : भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देणारा ‘आर्मी डे’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Indian Army
Share

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश. भारत संपूर्ण जगामध्ये विविध कारणांमुळे ओळखला जातो. भारताची संस्कृती, भारतामध्ये असलेली विविधता, ऐकता, भारतीय खाद्यपदार्थ आदी अनेक वैशिष्ट्यांमुळे भारत संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र यासोबतच भारताचे सर्वात मोठे आणि सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे भारताकडे असलेले सैन्यबळ. हो…भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लष्कर आहे. मुख्य म्हणजे भारतीय लष्कराला फार मोठा इतिहास आहे. सेवा परमो धर्म: हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य असलेले भारतीय लष्कर आपले ब्रिदवाक्य कायम खरे करत आले आहे. आज १५ जानेवारी, आजचा दिवस संपूर्ण भारतामध्ये भारतीय सेना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. (Army Day)

आपण कायमच भारतीय सैन्याच्या शौर्याचे किस्से, गोष्टी ऐकत आलो आहोत. सर्जकिल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण या गोष्टी पहिल्या आणि अनुभवल्या देखील आहेत. असे हे भारतीय लष्कर कायम भारताला शत्रूपासून वाचवते. मग ५० ते ५५ डिग्री तापमान असो किंवा -५५ डिग्री तापमान असो. आपले जवान कायमच आपल्या देशाचे रक्षण करण्यात कधीही हयगय करत नाही. आजच्या दिवशी भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला घाबरून न जाते केवळ आपले कार्य करणाऱ्या आपल्या भारतीय सेनेबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाला गर्व आहे. (Marathi)

यावर्षी भारत आपला ७८ वा लष्कर दिन साजरा करत आहे. भारतात हा दिवस साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. भारतीय सेना दिवस साजरा करण्यामागे एक मोठा आणि महत्वाचा इतिहास आहे. आजचा हा दिवस आपल्याला भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनेची आठवण करून देतो. चला जाणून घेऊया भारतीय सेना दिवसाचा इतिहास आणि माहिती. भारतीय सेना दिन फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी लष्करावर ब्रिटिश सेनापतीचा ताबा होता. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. तरीही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्याच व्यक्तीकडे सोपवण्यात आले होते. १९४९ मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. (Todays Marathi Headline)

Indian Army

पुढे बुचर यांच्या जागी भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांची नेमणूक करण्यात आली. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. खास बाब म्हणजे करिअप्पा हे १५ जानेवारी १९४९ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. म्हणूनच हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ब्रिटीशांच्या जवळपास २०० वर्षांच्या राजवटीनंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याची सर्व सूत्रे १५ जानेवारी १९४९ रोजी एका भारतीय व्यक्तीकडे सोपवण्यात आली. ही भारतीय इतिहासातील खूप मोठी घटना होती. करिअप्पा लष्करप्रमुख झाले तेव्हा भारतीय सैन्यात सुमारे २ लाख सैनिक होते. (Latest Marathi HEadline)

केएम करियप्पा हे ‘किप्पर’ या नावानेही ओळखले जायचे. १९४७ च्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तान विरोधातील युद्धात लेफ्टनंट जनरल करियप्पा यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. १४ जानेवारी १९८६ रोजी ते फील्ड मार्शलच्या उपाधीसह भारतीय सैन्याचे दूसरे सर्वोच्च रँकिंग अधिकारी बनले होते. करिअप्पा १९५३ मध्ये निवृत्त झाले आणि १९९३ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आर्मी डे च्या निमित्ताने संपूर्ण देश आपल्या जवानांच्या असामान्य धैर्य, साहस, शहीद जवानांचे बलिदान याची आठवण काढली जाते. या दिवशी देशातील सर्व कमांड मुख्यालयासह नवी दिल्लीत भारतीय सैन्याच्या मुख्यालयात सेना दिवस साजरा केला जातो. यावेळी सैन्य परेड होते. तसंच या दिवशी भारतीय सैन्याने मिळवलेल्या किंवा सैन्यात सहभागी केलेल्या नव्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केले जाते. तसंच फील्ड मार्शल एम करियप्पा परेड ग्राऊंडवर कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. भारतीय लष्करातील जवानांची संख्या जवळपास १४ लाख आहे. (Top Stories)

=========

Marathi Legends : या तिन्ही मराठी दिग्गजांनी साऊथचं अख्खं मार्केट खाल्लय !

BMC Election : मुंबईत खरंच अटीतटीची लढत की महायुतीसाठी एकतर्फी विजय ?

=========

ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता येथे १७७६ मध्ये भारतीय लष्कराची स्थापना केली. भारतीय लष्करात देशभरात ५३ कॅन्टोन्मेंट आणि नऊ तळ आहेत. भारतीय लष्कर दिनाचा मुख्य हेतू म्हणजे भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या बलिदान देणाऱ्या या शूर वीरांना श्रद्धांजली वाहणे. आजचा दिवस हा देशाला समर्पण व प्रेरणेचा एक पवित्र दिवस मानला जातो. मानवी आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करून भारतीय सैन्याने खूप वेळा आपल्या देशाची मदत केली आहे. आपल्या देशातील लोक आनंदात राहतात कारण आपल्या सैन्याने आपल्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. उद्याचा दिवस आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आज त्यांनी स्वत:ला देशसेवेसाठी अर्पण केले आहे. यासाठी आपण त्यांचे आभारच मानले पाहिजेत. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.