अनेक लोकांना रात्री झोपेत चालण्याची, बोलण्याची, हात पाय मारण्याची सवय असते. मात्र यामध्ये सर्वात जास्त समस्या असते ती घोरण्याची. रात्री किंबहुना झोपेत घोरण्याचा त्रास सगळ्यांना असतो. याला महिला किंवा पुरुष असा कोणताही अपवाद नाही. अनेकदा झोपेत आपले नाक बंद होते आणि आपण तोंडाने श्वास घेण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपोआप घोरण्यास सुरुवात होते. याशिवाय लठ्ठपणा, सर्दी, तणाव, थकवा, धूम्रपान, नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यामुळेही घोरण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीला त्रास तर होतोच, पण त्याच्यासोबत झोपलेल्या व्यक्तीची झोपही बिघडते. वास्तविक, झोपेत असताना श्वसनसंस्थेत अडथळा निर्माण झाल्यास घोरणे उद्भवते. (Health)
खरे तर घोरणे हा एक प्रकारचा आवाज आहे. जेव्हा एखादी व्यक्ती झोपेच्या वेळी त्याच्या नाकातून आणि घशातून मुक्तपणे हवा जाऊ शकत नाही तेव्हा हा आवाज तयार होतो. हवेच्या प्रवाहामुळे घशाच्या त्वचेत असलेल्या ऊतींमध्ये कंपने होतात. जे लोक वारंवार घोरतात त्यांच्या घसा आणि नाकाच्या ऊतींमध्ये जास्त कंपन होते. याशिवाय व्यक्तीच्या जिभेच्या स्थितीमुळे श्वास घेण्यात अडथळे येतात, त्यामुळे घोरण्याची समस्या उद्भवते. घोरणे ही जरी सामान्य समस्या असली तरी त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. या समस्येवर काही घरगुती उपाय करणे सोयीस्कर आहे. मात्र याने देखील फरक पडत नसेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. (snoring)
घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय
ऑलिव्ह ऑइल
घोरण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाकामध्ये ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाका. यामुळे श्वासोच्छवासाची समस्या दूर होते आणि घोरण्यापासून आराम मिळू शकतो. (Health News)
हळद
हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे. (Marathi News)
पेपरमिंट ऑइल
पेपरमिंटमध्ये अनेक घटक असतात जे घसा आणि नाकपुड्याची जळजळ कमी करण्यासाठी काम करतात. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते. झोपण्यापूर्वी पाण्यात पेपरमिंट तेलाचे काही थेंब टाकून गार्गल करा. हा उपाय काही दिवस चालू ठेवा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. उकळत्या पाण्यात एक कप घ्या. त्यात 10 पुदिन्याची पाने टाका आणि थंड होऊ द्या. हे पाणी पिण्यायोग्य झाल्यावर ते न गाळता किंवा गाळून प्यावे. यामुळे काही दिवसात घोरण्याच्या समस्येपासून सुटका होईल. (Todays Marathi Headline)

मध
घोरण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. यात दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या दूर होतात. यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला लवकरच फायदे मिळू शकतात. (Top Marathi News)
साजूक तूप
तज्ञ्जांनुसार नाक साफ नसल्यास तुम्हाला घोरण्याची समस्या असू शकते. त्यामुळे नाक साफ असणे फार गरजेचं आहे. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी देशी तूप जरा कोमट गरम करा आणि ते नाकात टाका. यामुळे घोरण्याची समस्या कमी होईल. (Latest Marathi Headline)
लसूण
घोरण्याच्या समस्येवर लसून हे रामबाण उपाय आहे. लसूनचं सेवन केल्यामुळे तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्ता मिळू शकता. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत दोन तीन लसून खा. (Top Stories)
वेलची
वेलची सर्दी आणि खोकल्याच्या औषधाचे काम करते. हे श्वसनसंस्था उघडण्याचे काम करते. त्यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया सुलभ होते. कोमट पाण्यात वेलचीचे दाणे मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे समस्येपासून आराम मिळतो. झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे हा उपाय करा. (Top Trending News)
=======
Health : सावधान! चहासोबत बिस्किट खाल्ल्याने आरोग्यावर येत आहे धोक्यात
Breakfast : जाणून घ्या सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ आणि नाश्ता करण्याचे फायदे
=======
पुदीना
पुदीनाचाही खूप फायदा आहे. पुदीनाला पाण्यामध्ये उकळा त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याने गुळण्या करा. अगदी हे पाणी प्यायला तरी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे रोज रात्री हा उपाय केल्यास काही दिवसांनी तुमची घोरण्याची समस्या कमी होईल. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
