आज सर्वत्र मकरसंक्रांतीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. मकर संक्रांती हा नव वर्षातील पहिला सण आहे. हा सण तिळगूळ वाटून, पतंग उडवून आनंदात साजरा केला जातो. या दिवशी सूर्य पूजेचे विशेष महत्त्व असते. सकाळी उठल्यानंतर सूर्य देवाला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात केली जाते. यासोबतच आजच्या दिवशी अजून एक प्रथा पाळली जाते. आज सुवासिनी सुगड पूजन करतात आणि एकमेकींना वाण देतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याची खूपच जुनी आणि प्रचलित प्रथा आहे. ‘सुघट’ म्हणजे शेतीमध्ये पिकणाऱ्या वस्तुंनी भरलेला घट. पुढे याच सुघट शब्दाचा अपभ्रंश ‘सुगड’ असा झाला. (Sankranti 2026)
सुगड पूजन किंवा ‘बोळकी पूजन’ करण्याला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. हे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. सुगड हे धनधान्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट ज्यांना आपण सुगड म्हणतो त्यांना पुजले जाते. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते. तेव्हा घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती. मात्र जानेवारी महिना लागला की बाजारात मकर संक्रांतीसाठी लागणारे तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतातील धान्य भरुन त्याची पूजा केली जाते. मात्र ही सुगड पूजा कशी केली जाते? जाणून घेऊया. (Marathi)
सुगड पूजेसाठी मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं आदी साहित्य लागते. ज्या ठिकाणी सुगड पूजा करायची असते, तिथे वरील सर्व साहित्य जमा करुन ठेवावे. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगूळ-लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य एकत्र ठेवावे. (Todays Marathi Headline)

मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची?
मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे. नंतर पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. समई तयार करून प्रज्वलित करावी. उदबत्ती लावून घ्यावी. आता सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, मटार शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, शेंगदाणे इत्यादी भरावे. असे पाच सुगड तयार करून घ्यावे. तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगड ठेवावे. आता सुगड यांना हळदी, कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळी लावावे. तसेच अक्षदा अर्पण कराव्या. हारफुले अर्पण करावीत, तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा. निरांजन तयार करून ओवाळावी. मनोभावे नमस्कार करावा. आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावा. नंतर पाच सवाष्णींना वाण-वसा करावा. घरातील सर्व थोरामोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. (Top Marathi News)
नवरीचा ववसा म्हणजे काय?
नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदीकुंकूच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. लग्नांनंतर पहिले पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर सुवासिनींना वाण म्हणून दिल्या जातात. (Latest Marathi Headline)
कोकणात नवरीचा ववसा भरला जातो. पहिला ववसा हा पाच किंवा २५ चा असतो. पाचचा ववसा म्हणजे त्यात पाच विड्याची पाने, पाच सुपारी, पाच खारी, पाच वेलची, पाच लवंग, पाच हळकुंड, पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात. तर २५ च्या ववसात हे साहित्य २५ असतात. पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा ववसा तुम्ही आई, काकी, सासू, नंदन, मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही घेऊ शकतो. ववसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. (Top Trending News)
========
Sankranti : संक्रांतीच्याच दिवशी झाला होता भीष्म पितामह यांचा मृत्यू
Makar Sankranti Yogas 2026 : यावर्षीची मकर संक्राती दुर्मिळ योगांची
========
सुगड पूजनाचे महत्त्व
सुगड पूजन म्हणजे नवीन पीक घरात आल्याचा आनंद साजरा करणे होय. मातीच्या भांड्यात हे धान्य ठेवून आपण पृथ्वीमातेचे आभार मानतो. ही पूजा शक्यतो संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी केली जाते. सुगड पुजल्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया एकमेकींना हे बोळके देतात. शिवाय वाण देखील देतात ज्यामध्ये एखादी वस्तू किंवा सौभाग्य अलंकार दिला जातो. हा सण निसर्गाच्या बदलाचा आणि पिकांच्या कापणीचा उत्सव असतो. बोळक्यांमधून नवीन पिकांचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून वाण दिले जाते. याला ‘संक्रांतीचा वाण’ असेही म्हणतात. बोळके आणि सुगड पूजा हा या सणाचा सकारात्मक आणि आनंदी भाग आहे, जो समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. (Social News)
(टीप : वर दिलेली माहिती सामान्य धार्मिक श्रद्धा आणि पंचांगावर आधारित आहे. या माहितीच्या अचूकतेबद्दल किंवा पूर्णतेबद्दल आम्ही कोणतीही हमी देत नाही. कोणत्याही अधिक माहितीसाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
