सध्या बाजारात जिथे नजर जाईल तिथे हिरवेगार टम्म फुगलेले मटारचे दिसतात. मटार कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हिवाळा म्हणजे मटारचा सिझन म्हणूनच हिवाळ्यात मटार भरपूर आणि ताजे मिळतात. सुरुवातीला महाग वाटणारे मटार हळूहळू स्वस्त होऊ लागतात. मटारच्या या सीझनमध्ये प्रत्येक घरात आठवड्यातून दोन तीन वेळा तरी मटारच्या स्पेशल रेसिपी बनतातच. मात्र मटार पनीर, आलू मटार, मटार कचोरी, मटार पुलाव आदी तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला देखील कंटाळा आला असेल तर यंदाच्या या चालू असलेल्या सीझनमध्ये तुम्ही मटारच्या खास रेसिपी करू शकता. मटारच्या अतिशय युनिक आणि चवीष्ट रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या करून तुम्ही घरातल्या सर्व सदस्यांना खुश करू शकता. (Matar Recipe)
मेथी मटर मलाई
साहित्य :
वाटाणा – २ कप, मेथी – १ जुडी, मलई – १०० मिली, काजू पेस्ट – २ टीस्पून, कांदे – २, चवीनुसार मीठ, साखर – १ टीस्पून, तूप – १ टीस्पून
कृती
कांदा सोलून त्याचे २ तुकडे करून घ्या. आता तो उकडून घ्या. हा उकडवलेला कांदा थंड करून बारीक वाटून घ्या. मेथी १० सेकंद उकळत्या पाण्यात ठेवून बाहेर काढा आणि नंतर थंड पाण्यात टाका. आता कढईत तूप गरम करायला ठेवा, तूप पुरेसे गरम झाल्यावर त्यात कांद्याची पेस्ट घाला. त्याचे पाणी सुकल्यावर त्यात मेथी टाकून चांगली परतून घ्या. आता चवीनुसार मीठ आणि साखर टाका. आता त्यात मटार टाका आणि मटारमधून सोडलेले सर्व पाणी कोरडे होईपर्यंत शिजवून घ्या. त्यात क्रीम मिसळून झाकण ठेवून गॅस बंद करा. (Top Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________
मटार पुरी
साहित्य :
२ वाटी मटार, ३ चमचे रवा, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, १ वाटी कोथिंबीर, १ चमचा जिरे, १/२ चमचा धणे, १ चमचा बडिशेप, १/२ चमचा ओवा, तेल आवश्यकतेनुसार
कृती
कुरकुरीत मटार पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्समध्ये किंवा खलबत्त्यात जिरे, धणे, बडीशेप, ओवा बारीक करून घ्या. आता यात चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, मटार आणि पाणी घालून याची पेस्ट तयार करुन घ्या. यानंतर एका परातीत रवा, मीठ, हळद, कणिक आणि बारीक केलेले मसाले एकत्र करा आणि व्यवस्थित पीठ मळून घ्या. आता तयार पीठाचे लहान लहान गोळे तयार करा आणि याच्या पुऱ्या लाटून घ्या. शेवटी गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका. तेल गरम झाले की यात तयार पुऱ्या नीट तळून घ्या आणि बटर पेपरवर काढून ठेवा. तयार पुऱ्या तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. (Latest Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________

मटार खिमा
साहित्य :
तेल, जिरे, कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, मटार, मेथीची पाने, दही, काजूची पेस्ट, धनेपूड
कृती :
गॅसवर कढई गरम करा, त्यात तेल टाका. जिरं फोडणीला टाका. आता यात कांदा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो टाकून कांदा लाल होईपर्यंत आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्या. आता यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, मीठ टाकून परतून घ्या. आता मटार मिक्सरमध्ये असेच वाटून घ्या, ते कढईत टाका आणि त्याच्यासोबतच मेथीची पाने टाकून चांगले मिक्स करून घ्या. थोडी पाणी आणि अख्खे मटार टाकून झाकण मारून शिजवून घ्या, मटार शिजले की त्यात दही, काजूची पेस्ट, धनेपूड टाकून नीट मिक्स करा. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. (Top Trending News)
______________________________________________________________________________________________________________________________________
=============
Colombia Tensions : कोलंबियाच्या धोरणावर ट्रम्प यांचा युटर्न
=============
मटार नगेट्स
साहित्य:
मटार, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, बटाटा, पाणी, रवा, चिलीफ्लेक्स, हिरवी मिरची, मॅगी मसाला, तांदूळ, पीठ, धणे जिरं पावडर
कृती :
सर्वप्रथम, मटार स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा आणि पाणी घालून शिजण्यासाठी ठेवा. कुकरच्या ४ किंवा ५ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. बटाटा थंड झाल्यानंतर बारीक तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात मटार, हिरव्या मिरचीचे तुकडे,लसूण पाकळ्या घालून जाडसर वाटून घ्या. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात धणे, जिरे, तयार केलेली मटार पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात पाणी घालून उकळी काढा. एक उकळी आल्यानंतर त्यात रवा घालून घट्ट होईपर्यंत झाकण मारून शिजवा. त्यानंतर पीठ थंड होण्यासाठी ठेवा. थंड झालेल्या पिठात चमचाभर मैदा आणि बटाटा घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या. त्यानंतर पिठाचे मध्यम आकारात नगेट्स बनवा. कढईमधील गरम तेलात तयार केलेले मटार नगेट्स कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मटार नगेट्स. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
