व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी या अमेरिकेच्या तुरुंगात आहेत. ड्रग्ज व्यापाराला हातभार लावला म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ज ट्रम्प यांच्या आदेशानं त्यांना अटक करण्यात आली आहे. आता मादुरो यांच्यावर अमेरिकेच्या न्यायालयात खटला चालवण्यात येत आहे. मॅनहॅटनमधील अमेरिकन फेडरल कोर्टात मादुरो यांच्यावर हा खटला सुरु आहे. या खटल्याच्या पहिल्याच दिवशी मादुरो यांनी, आपण कोणताही अपराध केलेला नाही, शिवाय एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अशाप्रकारे अटक करण्याबाबतही न्यायालयात नाराजी व्यक्त केली. मादुरो यांच्या या नाराजीची शिक्षा त्यांना ट्रम्प यांनी दिली असून त्यांची रवानगी थेट ब्रुकलिन तुरुंगात करण्याचे आदेश दिले आहेत. ( Brooklyn’s Metropolitan Detention Center )

Brooklyn’s Metropolitan Detention Center
ब्रुकलिन तुरुंगाचे नाव ऐकल्यावर अमेरिकेच्या अट्टल गुन्हेगारांनाही घाम फुटतो. कारण हा तुरुंग टॉर्चर जेल म्हणून ओळखला जातो. येथे आणण्यात आलेल्या आरोपींना त्यांचा गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांचा अनेक मार्गांनी छळ कऱण्यात येतो. बहुधा ब्रुकलिन जेलमध्ये दरोडेखोर, बलात्काराचे आरोपी, देशद्रोही गुन्हे असलेले गुन्हेगार यांना ठेवण्यात येते. अशा तुरुंगात आता निकोलस मादुरो यांची रवानगी करण्यात आली आहे. ड्रग्ज व्यवसायाबाबत मादुरो हे अद्याप पुरेशी माहिती देत नसल्यामुळे त्यांना ब्रुकलिन जेलमध्ये ठेवण्याचे योग्यच असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. ब्रुकलिन जेल हा पृथ्वीवरील नरक म्हणून कुप्रसिद्ध आहे. या जेलमध्ये ट्रम्पनी मादुरोंची रवानगी केल्यामुळे ट्रम्प सहजासहजी मादुरो यांची सुटका करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. ( Brooklyn’s Metropolitan Detention Center )
पृथ्वीवरील नरक, टॉर्चर जेल अशा नावांनी कुप्रसिद्ध असलेल्या ब्रुकलिन जेलमध्ये सध्या निकोलस मादुरो यांना ठेवण्यात आले आहे. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अशाप्रकारे, ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा ब्रुकलिन जेल इतका बदनाम आहे की, अमेरिकेच्या मान्यवर न्यायाधीशांनी या जेलमध्ये कैद्यांना पाठवू नये, असा शेरा दिलेला आहे. मानवाधिकारी संघटनेचे कार्यकर्तेही या तुरुंगात जाण्यासाठी टाळाटाळ करतात. या तुरुंगात एकेकाळी संगीत स्टार आर. केली आणि शॉन ‘डिडी’ कॉम्ब्स सारखे प्रसिद्ध कैदी होते. त्यांना आलेले अनुभव हे नरकासारखे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १९९० च्या दशकात हा ब्रुकलिन तुरुंग तयार झाला. त्यानंतर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिनमधील सनसेट पार्क येथे असलेला ब्रुकलिन जेल हा अमेरिकेतील सर्वात कुप्रसिद्ध संघीय तुरुंगांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला.
आता त्यात मादुरोंसह १,००० कैदी आहेत. यातील बहुतांश कैदी हे अट्टल गुंड आणि ड्रग्ज तस्कर आहेत. होंडुरनचे माजी अध्यक्ष जुआन ऑर्लँडो हर्नांडेझ यांनाही याच तुरुंगात कोकेनच्या व्यापारात दोषी असल्याचे सांगून टाकण्यात आले होते. त्यांना ४५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु डिसेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक जुआन हे दोषी नसल्याचा साक्षात्कार झाला, आणि जुआन या बदनाम तुरुंगातून बाहेर पडले, त्यांच्या जागी आता निकोलस मादुरो तुरुंगात आहेत. ( Brooklyn’s Metropolitan Detention Center )
=======
हे देखील वाचा : Viral Nike Tracksuit : कोणाचं काय आणि कोणाचं काय….
=======
लीगल एड सोसायटीसारख्या संघटनेने या तुरुंगाचा “अमानवीय” आणि “मानवी हक्क उल्लंघनांचे केंद्र” म्हणून उल्लेख केला आहे. ब्रुकलिन जेल हे त्यामध्ये होणा-या कैद्यांच्या मारामा-यांसाठीही ओळखला जातो. या तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या अनेक गॅग आहेत. यातील बहुतांश गॅंग या कोकेन, ड्रग्ज यांचा व्यापार करतात. तुरुंगातही हे गुंड ड्रग्ज आणण्यात यशस्वी होतात. त्यावरुनच त्यांच्यात कायम हाणामारी होते. येथील कैद्यांच्या या वादाला कंटाळून तुरुंग अधिकारी अनेक उपाय करतात, हे उपाय ऐकले तरी सामान्यांना घाम फुटतो.
२०१९ मध्ये या तुरुंगाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यावेळी सर्वत्र अंधार आणि कमालीचा गारठा यात कैदी राहिले. २०२४ मध्ये येथील कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये दोन कैद्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगात कैद्यांची संख्याही मर्यादित करण्यात आली आहे. पण येथील कैद्यांच्या मारामारीला पायबंद बसलेला नाही. आता अशाच बदनाम तुरुंगात फक्त मादुरोच नाही, तर त्यांच्या पत्नीलाही ठेवण्यात आल्यानं त्यांच्या समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रुकलिनच्या मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या या मादुरो आणि सिलिया फ्लोरेस यांची चौकशी तेथील अधिकारी करीत आहेत. ( Brooklyn’s Metropolitan Detention Center )
सई बने…
