Home » Makar Sankranti Yogas 2026 : यावर्षीची मकर संक्राती दुर्मिळ योगांची

Makar Sankranti Yogas 2026 : यावर्षीची मकर संक्राती दुर्मिळ योगांची

by Team Gajawaja
0 comment
Makar Sankranti Yogas 2026
Share

मकर संक्रांतीचा सण अगदी काही उद्यावरच आला आहे. हा सण संपूर्ण भारतात सूर्यदेवाची पूजा, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि घरात तीळ-गुळ घातलेले पदार्थ करुन साजरा करण्यात येतो. देशभरात या सणाला वेगवेगळ्या नावानं संबोधण्यात येतं. मात्र देशभरात हा सण साजरा होतांना त्यामागची भावना ही अतिशय मंगल अशीच असते.

यावर्षी साजरी होणारी मकरसंक्रात तर ही अतिशय दुर्मिळ असल्याची माहिती आहे. यावर्षी मकर संक्रात १४ जानेवारी रोजी आहे. या दिवशी षट्ठीला एकादशी, सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग यासारखे योग असून अत्यंत फलदायी युती तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी पूजा, दान आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चागंला मुहूर्त असल्याचे सांगण्यात आले आहे. याच दिवसानंतर खरमासही संपत असल्यामुळे शुभ कार्यही करता येणार आहेत. शिवाय घर, व्यवसाय, विवाहासाठीचे मुहूर्त या दिवसापासून सुरु होतील. यावर्षी येणारी संक्रात ही भरभराटीचा संदेश घेऊन येत आहे. संक्रात साजरी करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्येही विशेष पुजाअर्चनांचे आयोजन करण्यात आले आहे. ( Makar Sankranti Yogas 2026 )

Makar Sankranti Yogas 2026

Makar Sankranti Yogas 2026

यावर्षी साजरी होणारी मकरसंक्रात ही खास आहे. कारण जवळपास २३ वर्षांनंतर षट्ठीला एकादशीची दुर्मिळ घटना यावेळी होणार आहे. त्यामुळे संगमतीरावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. संक्रातीच्या दिवशी पवित्र गंगा स्नान कऱण्याचे महत्व हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. यादिवशी पवित्र नदिमध्ये स्नान, दान आणि पूजा यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. यावर्षी येत असलेल्या मकर संक्रातीला या सर्वांचे महत्त्व त्याच्या षट्ठी योगामुळे वाढणार आहे. याशिवाय १४ तारखेबरोबरच १५ तारखेलाही मकर संक्रात साजरी करता येणार आहे.

सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग यासारखे शुभ योग या संक्रातीच्या दिवशी आहेत. सोबतच चालू असलेला खरमास मकर संक्रांतीच्या दिवशी संपणार आहे. त्यामुळे या दिवसापासून लग्न, गृहप्रवेश, मुंडन समारंभ आणि नवीन व्यवसाय यासारख्या सर्व शुभ कार्यक्रमांना सुरुवात करता येणार आहे. या सर्वांसोबत तीळ, गुळ, अन्न आणि कपडे यांचे दान केल्यास हा दिवस अधिक प्रभावी होईल, असेही सांगण्यात आले आहे. या सर्वात भगवान सूर्य देव आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचे महत्त्वही धार्मिक ग्रंथात सांगण्यात आले आहे. ( Makar Sankranti Yogas 2026 )

१४ जानेवारी रोजी साजरी होत असलेली मकर संक्रात ही मंदाकिनी नावाच्या कुमारीवर येत असल्याची माहिती आहे. या कुमारीला जाईच्या फुलानं सजवलेले आहे, आणि तिच्या हातात गोड खिरीचे भांडे आहे. त्यावरुन यावेळेची संक्रात ही शुभ असल्याचे सांगण्यात आले आहे. गोड खिरीचे भरलेले भांडे हे समृद्धीचे प्रतिक आहे. याच दिवशी सूर्यदेव उत्तरायण सुरू करतात, त्यामुळे दिवस मोठा होतो आणि हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते. १४ जानेवारी रोजी पुण्यकाळ हा दुपारी ३:१३ वाजता सुरू होईल आणि ४:५८ वाजता महापुण्यकालपर्यंत चालू राहील. हा सर्व काळ दानासाठी शुभ मानला जातो. विशेषतः तीळ, गूळ आणि उबदार कपड्यांचे दान यावेळी फायदेशीर मानण्यात येते. 

=======

हे देखील वाचा : Sankranti : मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे काय आहे कारण?

=======

मकर संक्रातीच्या दिवशी प्रयागराजमध्ये होत असलेल्या माघमेळ्यात पवित्र स्नानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधू संतही येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र घाट तयार करण्यात येत आहेत. याशिवाय भारतभरातील मंदिरांमध्ये या दिवशी विशेष पूजा केल्या जातात. जगन्नाथ मंदिर, पुरी येथे विशेष विधी करण्यात येतात. त्यावेळी हजारो भाविक गर्दी करतात. काशी विश्वनाथ मंदिर, येथेही अशीच पूजा करण्यात येते आणि काशीच्या घाटावर रात्री रोषणाई करण्यात येते. ( Makar Sankranti Yogas 2026 )

हरिद्वार येथील हर की पौडी येथे होणा-या गंगा आरतीला या मकर संक्रांतीच्या दिवशी हजारो भाविक उपस्थित असतात. शबरीमाला मंदिर, केरळ येथे मकर संक्रांतीला ‘मकरविलक्कू’ उत्सव साजरा केला जातो आणि सबरीमाला मंदिरात मकर ज्योतीचे दर्शन होते. गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरामध्ये या दिवशी मिळणारा खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक जमतात. देशभरात हा सण पोंगल, बिहू, लोहरी आणि उत्तरायण अशा विविध नावांनी साजरा होतो.

सई बने….


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.