संक्रांत जवळ येऊ लागली की, आकाशांमध्ये हळूहळू पतंग दिसू लागतात. हे पतंग संक्रांत आल्याचे संकेत देतात. संक्रांत आणि पतंग हे अतिशय जुने आणि प्रसिद्ध समीकरण आहे. पतंग उडवल्याशिवाय संक्रांतीचा सण पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. संक्रांतीच्या दिवशी तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. गुजरातमधील पतंग महोत्सव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये देखील पतंगाला मोठे महत्त्व तर आहे, सोबतच पतंग उडवण्याची आवड देखील सगळ्यांना आहे. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की, फक्त संक्रांतीलाच पतंग का उडवली जाते? पतंग उडवण्यामागे नक्की कोणते कारण, शास्त्र असेल? (Sankranti)
मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका आहे. तमिळच्या तंदनान रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकरसंक्रांतीवर पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. असे म्हटले जाते की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोचला. स्वर्गात पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला. त्याला पतंग खूप आवडला आणि तो त्याने आपल्याकडे ठेवला. जयंतच्या पत्नीने विचार केला की, ज्याचा हा पतंग आहे तो घायला नक्कीच येईल. तिकडे भगवान रामाने हनुमानजीला पतंग आणण्यासाठी पाठविले. हनुमानजींनी जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी भगवान रामला भेटण्याची इच्छा केली. ती म्हणाली की ती श्रीरामांच्या दर्शनानंतरच पतंग परत करेल. (Marathi News)

हनुमानजींनी भगवान रामाला संपूर्ण प्रसंग सांगितला. भगवान राम म्हणाले की ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानजीला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठविले. जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन हनुमानजींनी भगवान रामाचा आदेश सांगितला. त्यानंतर त्यांनी पतंग परत केला. पतंग उडवण्याच्या परंपरेमागे उत्तम आरोग्याचं रहस्य दडलेलं असल्याचं मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. वैज्ञानिक दृष्टीकोनातून या दिवशीची सूर्यकिरणे शरीरासाठी अमृताप्रमाणे असतात, ही सूर्यकिरणे विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे या दिवशीचा सर्यप्रकाश घेणे, खूप लाभदायी ठरते. (Latest Marathi News)
थंडीच्या काळात खोकला, सर्दी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक असतो. मकर संक्रांतीच्या दिवशीची किरणे शरीरासाठी औषधाचं काम करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्याने शरीर सूर्याच्या किरणांच्या संपर्कात राहते आणि याचा शरीराला फायदा होतो. पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो. मकर संक्रांतीचा सण थंडीमध्ये पडल्याने शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डी देखील मिळतो. याव्यतिरिक्त सर्दी खोकला यापासून बचाव होतो. (Top Trending HEadline)
========
Sankranti : अशुभ रंग असूनही संक्रांतीला का आहे काळ्या रंगाचे महत्त्व?
========
मकर संक्रांतीच्या दिवशी लोक पतंग उडवण्यासाठी एकत्र येतात. ज्यामुळे सामाजिक एकता वाढते. पतंग उडवणे हा मुलांसाठी एक मजेदार मनोरंजन आहे, जो त्यांच्या बालपणीच्या आठवणी निर्माण करतो आणि प्रौढांसाठी बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो. पतंग उडवण्यास आता अंतरराष्ट्रीय महत्त्व निर्माण झाले आहे. देशात १९८९ पासून, अहमदाबाद शहर उत्तरायणाचा अधिकृत उत्सव म्हणून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करत आहे. गुजरातमध्ये आता पतंग उडवण्याच्या स्पर्धाही होत असतात. या महोत्सवात जगभरातील पतंग बनवणारे आणि पतंग उडवणारे सहभागी होतात. (Social News)
(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
