आज मकर संक्रांती. नवीन वर्षातला पहिला मोठा आणि महत्त्वाचा सण. आजच्या दिवशी सगळीकडे तिळगुळ वाटला जातो, तिळगुळाची पोळी केली जाते, जल्लोषात पतंग उडवली जाते, सूर्यदेवाची पूजा केली जाते. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांतीच्या सणाला जेवढे महत्त्व धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच महत्त्व वैज्ञानिक दृष्ट्या देखील आहे आणि ज्योतिष्याच्या दृष्टीने देखील आहे. शास्त्रांमध्ये हा देवांचा काळ मानला जातो. पुराणानुसार महाभारत युद्धानंतर, भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर ५८ दिवस मृत्युची वाट पाहत होते. इच्छेनुसार मृत्युचे वरदान असूनही, त्यांनी उत्तरायण महिना निवडला. मकरसंक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी प्राण सोडले होते. (Sankranti)
पौराणिक मान्यतेनुसार, खरमासात सूर्य दक्षिणायनात असतो आणि तेजविरहित असतो, म्हणून 58 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भीष्मांनी सूर्य उत्तरायणाच्या दिवशी प्राणत्याग केला. महाभारतातील सर्वात महत्त्वाचे आणि मोठे पात्र म्हणून भीष्म पितामह यांना ओळखले जाते. भीष्म पितामह एकमेव असे पात्र आहेत, जे महाभारताच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित होते. न्याय आणि अन्यायाचे ज्ञान असूनही राजधर्माचे पालन करताना त्यांना नाईलाजाने कौरवांच्या बाजूने युद्धात लढावे लागले. (Marathi News)
महाभारत युद्धादरम्यान, कुरुक्षेत्रावर युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुन आणि शिखंडी यांनी मिळून बाणांनी भीष्म यांना छन्नी केले. भीष्म पितामह यांचे संपूर्ण शरीर बाणांनी व्यापले होते. मात्र तरीही त्यांनी हा त्रास तब्बल ५८ दिवस सहन केला. ते ५८ दिवस बाणांच्या शय्येवर पडले होते. मुख्य म्हणजे त्यांना इच्छामरणाचे वरदान लाभले होते. मात्र तरीही त्यांनी एवढे बाण लागूनही त्यांनी जीवनाचा त्याग केला नाही. त्यांनी एवढा त्रास का झाला? १५० वर्षांचे भीष्म खरमासभर बाणांच्या शय्येवर होते. (Todays Marathi Headline)

महाभारताच्या कुरुक्षेत्र युद्धात भीष्मांचा पराभव करण्यासाठी, युद्धाचे नियम मोडून अर्जुनने शिखंडीच्या वेषात गुप्तपणे भीष्मांवर बाण सोडले. महाभारताच्या कथेनुसार भीष्म १५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि त्यांची दृष्टी क्षीण होत होती. अर्जुन आणि शिखंडीच्या बाणांचा रंग सारखाच असल्याने भीष्मांना अर्जुनचा हल्ला समजू शकला नाही. अशाप्रकारे भीष्मांवर एकामागून एक अगणित बाण लागले आणि बाण त्यांच्या संपूर्ण शरीरावर आदळल्यामुळे भीष्मांचा तोल गेला. बाण लागल्याने भीष्मांची अवस्था अशी झाली की त्यांना जमिनीवर नीट झोपताही येत नव्हते. अशा स्थितीत अर्जुनाने भीष्मासाठी बाणांचा पलंग बनवला, ज्यावर भीष्म ५८ दिवस पडून त्यांच्या मृत्यूची वाट पाहू लागले. (Top Marathi News)
महाभारताच्या कथेनुसार कुरुक्षेत्र युद्धाच्या १० व्या दिवशी भीष्म जखमी झाले होते. बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्मांची अवस्था अत्यंत दयनीय होती तरीही त्यांनी प्राण सोडले नाहीत. याचे कारण असे की खरमास महिन्यात सूर्य दक्षिणायनमध्ये असल्यामुळे कमी तेजस्वी असतो. दक्षिणायन म्हणजे सूर्याची दक्षिणेकडे हालचाल. धार्मिक श्रद्धेनुसार दक्षिणायनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतर नरकात जाते. या कारणास्तव भीष्मांनी संपूर्ण खरमासासाठी आपले प्राण रोखून धरले आणि सूर्य उत्तरायणाची वाट पाहत ५८ दिवस दुःख सहन केले. शेवटी भीष्मांनी उत्तरायणाच्या दिवशी माता गंगेच्या कुशीत बलिदान दिले. (Latest Marathi Headline)
भीष्म पितामह पूर्वजन्मात वसु नावाचे एक देवता होते. त्यांनी बळजबरीने ऋषी वशिष्ठ यांच्या गायीचे हरण केले होते, ज्यामुळे क्रोधीत होऊन ऋषी विशिष्ठ यांनी त्यांना मनुष्य रुपात जन्म घेण्याचा आणि आजीवन ब्रह्मचारी राहण्याचा शाप दिला होता. भीष्म हे राजा शांतनु व गंगा यांचे आठवे आपत्य होते. बालपणी यांची नाव देवव्रत होते. भगवान परशुराम हे यांचे गुरु होते. एकदा देवव्रतने बाण सोडून गंगा नदीचा प्रवाह अडवला होता. देवव्रतची योग्यता पाहून शांतनू यांनी त्याला युवराज घोषित केले. (Top Trending News)
========
Sankranti : अशुभ रंग असूनही संक्रांतीला का आहे काळ्या रंगाचे महत्त्व?
Kinkrant : जाणून घ्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या किंक्रांतचे महत्त्व
========
याच भीष्म यांनी शंतनुचे सत्यवतीशी लग्न करण्यासाठी आयुष्यभर अविवाहित राहण्याची भयंकर प्रतिज्ञा घेतली होती. त्यानंतर त्याचे नाव भीष्म ठेवण्यात आले. भीष्मांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या वडिलांच्या वंशाचे रक्षण केले. कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरु होण्यापूर्वी युधिष्ठीर भीष्म पितामह यांच्याकडे युद्ध करण्याची आज्ञा घेण्यासाठी आले. प्रसन्न होऊन भीष्म यांनी त्यांना युद्धामध्ये विजय होण्याचा आशीर्वाद दिला. आपल्या मृत्यूचे रहस्यसुद्धा स्वतः भीष्म यांनी पांडवांना सांगितले होते. (Social News)
(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
