Home » Sankranti : सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे असण्यामागे आहे ‘हे’ महत्त्वाचे कारण

Sankranti : सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे असण्यामागे आहे ‘हे’ महत्त्वाचे कारण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sankranti
Share

आज संक्रांतीचा सण साजरा होत आहे. संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश. संकांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन गोड बोलण्यास सांगितले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवसापासून सूर्य त्याचे “उत्तरायण” सुरू करतो, म्हणजेच त्याची उत्तरेकडे हालचाल सुरु होते. असे मानले जाते की उत्तरायणाच्या वेळी देवांचा दिवस सुरू होतो आणि स्वर्गाचे दरवाजे उघडतात. संक्रांतीचा सण हा सूर्य देवांना समर्पित आहे. ऊर्जेचा स्रोत आणि सर्व सजीवांचे पालनपोषण करणारे आहेत. (Sankranti)

सूर्यदेवांना प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जाते, जे आरोग्य, तेज आणि सकारात्मक ऊर्जा देतात. त्यांची पूजा केल्याने आरोग्य लाभतो, असे मानले जाते, आणि सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. धार्मिक मान्यतेनुसार आणि पौराणिक कथांनुसार सूर्यदेव कायम त्यांच्या रथावर स्वार होऊन प्रवास करत असतात. सूर्य देवांचा रथ हा घोड्यांचा असून त्यांच्या रथाला सात घोड्यांची साथ असते. मात्र आपण कधी याचा विचार केला आहे का की सूर्यदेवाच्या रथाला ७ घोडेच का असतात? (lord Surya)

पुराणांमधील माहितीनुसार सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात घोडे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आहेत. याचा अर्थ असा की सूर्यदेव सतत गतीमध्ये राहून काळाचे चक्र नियंत्रित करतो. सात घोड्यांच्या रंगात सूक्ष्म फरक आहे,अरुण देव त्यांचा लगाम सांभाळतात. हे घोडे आणि सूर्यदेव स्वतः रथाच्या मागे स्वार होतात. धार्मिक कथांनुसार या घोड्यांची नावे गायत्री, भारती, उष्णिक, जगती, त्रिस्तप, अनुस्तप आणि पंक्ती अशी आहेत. असे मानले जाते की हे सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात. शिवाय हे सात घोडे वेदांच्या सात प्रमुख श्लोकांचे प्रतीक आहेत. (Top Marathi News)

Sankranti

मान्यतेनुसार, हे सात घोडे आठवड्यातील वेगवेगळ्या दिवसांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा उगम स्वतः सूर्यदेवाच्या किरणांपासून होतो. तसेच, सूर्यदेवाचे हे सात घोडे इंद्रधनुष्याच्या सात रंगांशी संबंधित असल्याचे दिसून येते. कारण या सात घोड्यांचे रंग एकमेकांपेक्षा वेगळे आहेत आणि हे सर्व घोडे एकमेकांपासून वेगळे दिसतात. परंतु हे सर्व घोडे स्वतःच सूर्यप्रकाशाचे प्रतीक आहेत. त्यानुसार, सूर्य सात घोड्यांच्या या रथावर स्वार होतात. सूर्यदेवाच्या अनेक मंदिरांमध्ये त्यांच्या सात घोड्यांच्या रथासह मूर्ती स्थापन केल्या आहेत. यातील विशेष बाब म्हणजे त्यांच्या रथासोबतच त्यांच्या सर्व मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोणार्क मंदिर. या मंदिरात सूर्यदेवाची मूर्ती असून त्यासोबतच एका विशाल रथावर सात घोडे असलेल्या रथाचे सारथी अरुणदेव आहेत. अरुणदेव हा भगवान सूर्याचा सारथी आहे आणि पक्षी राजा गरुडाचा मोठा भाऊ आहे. (Latest Marathi Headline)

सूर्यदेवाच्या रथाच्या घोड्यांप्रमाणेच त्यांच्या रथाच्या चाकांनाही विशेष अर्थ आहे. सूर्याच्या रथाला फक्त एकच चाक आहे, ज्याला “संवत्सर” म्हणतात. त्याच्या रथाचे चाक १ वर्षाचे प्रतीक मानले जाते आणि चाकामध्ये बनवलेल्या १२ ओळी वर्षाच्या १२ महिन्यांचे प्रतीक मानल्या जातात. सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना दोन्ही हातांनी तांब्याचे भांडे धरून डोक्यावरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भांड्यात पाण्यासोबत लाल फुले, कुंकू आणि तांदूळ घाला. (Top Trending Headline)

=======

Sankranti : जाणून घ्या यावेळच्या मकर संक्रांतीचे वाहन काय?

Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व

=======

पहाटे उगवत्या सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सुख, सौभाग्य आणि आरोग्य लाभते, असे मानले जाते. सूर्याची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो, अशा स्थितीत सूर्याची शुभ प्राप्ती करण्यासाठी पाण्यात थोडा गूळ मिसळून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या मध्यभागी सूर्यकिरण येत असल्याचे पाहा. पाणी देताना सूर्याच्या मंत्राचा जप करावा. सारथी अरुण सूर्यदेवाच्या अगदी विरुद्ध स्थानावर आहे. तो सूर्याची तीव्र उष्णता सहन करतो जेणेकरून पृथ्वीवर थेट पोहोचणारी तीव्रता कमी होईल आणि जीवनाचे रक्षण होईल. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.