आज संक्रांतीचा सण साजरा होत आहे. संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश. संकांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन गोड बोलण्यास सांगितले जाते. संक्रांतीचा सण जल्लोषात साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ती किंक्रांत. संक्रांतीचा सण किंक्रांत म्हणून किंवा कर दिन म्हणून ओळखला जातो. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच पौष शुक्ल षष्ठीचा दिवस हा किक्रांत म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करण्यास मनाई आहे. किंक्रांतीच्या दिवशी अनेक भागांमध्ये धिरडे बनवण्याची प्रथा असते. याला कर उठवणी असे म्हटले जाते. (Kinkrant)
दरवर्षी किंक्रांतीचा दिवस १५ जानेवारीला साजरा करण्यात येतो. किंक्रांतच्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी याचे महत्त्व आहे. तसेच या दिवशी देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. पौराणिक कथेनुसार संकारसुर नावाचा राक्षस होता. तो गरीबांना प्रचंड प्रमाणाता त्रास देत असे. त्याचा वध करण्यासाठी देवीनो संक्रांतीचे रुप घेतले. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूराचा वध केला. हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. किंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या. (Latest Marathi Headline)
ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये. कोणतेही शुभ काम या दिवशी करु नये. तसेच गावातील मंडळींनी खास करुन स्त्रियांनी शेणात हात घालू नये. किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास टाळावा. या दिवशी केर काढण्यापूर्वीच केस विंचरावे. कारण मोकळ्या केसांनी किंक्रांतीला कामं करणं वर्ज्य मानलं जाते. कर दिनाच्या दिवशी स्वयंपाक घरात काही कापाकापी करत नाही. शिवाय अनेक ठिकाणी या दिवशी तिळगुळ वाटल्या जात नाही. कर दिन अशुभ असल्याने या दिवशी लहान बाळांना, नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांना किंवा लग्न ठरलेल्या लोकांना घरातून बाहेर जाऊ दिले जात नाही. (Marathi News)

किंक्रांतीच्या दिवशी आपल्या कुलदैवताची आणि देवाची पूजा करून त्यांचे दिवसभर नामस्मरण केले जाते. तसेच किंक्रांतीच्या दिवशी पूजा करुन देवाला तिखट आणि गोड धिरड्यांचा किंवा आपल्या प्रथेनुसार नैवेद्य दाखवला जातो. यादिवशी घरात वादविवाद टाळावे, मन शांत ठेवावे. सर्वांशी आदराने वागावे. कोणाचाही अपमान करू नये. अनेक ठिकाणी हा अशुभ दिवस असला तरी या दिवशी या दिवशी सवाष्ण बायकांना बोलवून हळदी कुंकू समारंभ करून इच्छेनुसार सवाष्णींना वाण दिले जाते. लहान मुलांचे बोरन्हाण देखील या दिवशी केले जाते. (Top Stories)
बेसनाचे धिरडे रेसिपी
साहित्य:
२ कप बेसन, २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या, १ टीस्पून चाट मसाला, अर्धा चमचा टीस्पून लाल तिखट, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल
कृती
एका भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ घालून मिक्स करा. (पाहिजे असल्यास यात तुम्ही बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता) आता बेसनात थोडे पाणी घालून त्याचे द्रावण तयार करा. त्यात गुठळ्या पडता कामा नये. यानंतर गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करा. तव्यावर तेल टाकून ग्रीस करा. नंतर बेसनाचे मिश्रण तव्यावर ओतून चमच्याने गोल व पातळ पसरावे. आता वरील बाजूला तेल शिंपडावे नंतर ते उलटावे. धिरडं दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या. एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे सर्व धिरडे तयार करा. गरमागरम धिरडे सॉस, चटणी किंवा लोणचेसोबत सर्व्ह करा. (Top Trending Headline)
==========
Kinkrant : जाणून घ्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या किंक्रांतचे महत्त्व
==========
गोड धिरडे
साहित्य :
२ कप कणिक , आवडीनुसार गूळ, वेलची पूड, पाणी, तूप, चिमूटभर मीठ
कृती:
गूळ पाण्यात भिजत घालावा आणि कणिक चाळून घ्यावी. आता कणिकेमध्ये मीठ, वेलचीपूड घालून नीट मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात हळूहळू गूळ विरघळून घेतलेले पाणी घालावे. गुठळ्या न पडू देत सतत मिक्स करत राहावे. पीठ जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असे ठेवावे. डोसा पिठासारखे हे पीठ करावे. आता तवा कोमट झाला की, त्यावर हे पीठ घालावे आणि वरून आवडीनुसार तूप टाकावे. दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यावे. (Social News)
(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
