Home » Sankranti : संक्रांत स्पेशल: तिळगुळाच्या पोळीची सोपी रेसिपी

Sankranti : संक्रांत स्पेशल: तिळगुळाच्या पोळीची सोपी रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sankranti
Share

मकर संक्रांतीचा सण तोंडावर आला आहे. नवीन वर्षातला पहिलाच सण असल्याने संक्रांतीसाठी एक वेगळीच उत्सुकता सगळीकडे दिसून येते. मकर संक्रांतीच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू झाली आहे. घरांमध्ये तिळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की बनवण्याची तयारी देखील सुरु झाली असेल. आता संक्रांतीचा सण म्हटल्यावर तिळगुळाची पोळी केली जाणार नाही तर विशेष. संक्रांतीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये तिळगुळाची पोळी केली जाते. या संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंतचाय काळात अनेक घरांमध्ये तिळपोळी बनवली जाते. (Sankranti)

संक्रांतीमध्ये या पोळीचे खास महत्त्व आहे. संक्रांतीचा सण हिवाळ्यात येतो आणि या दिवसांमध्ये आपल्या शरीराला गरम ठेवणे आवश्यक असते. तीळ आणि गुल हे दोन्ही पदार्थ उष्ण गुणधर्माचे आहे. त्यामुळेच संक्रातीमध्ये तिळगुळ पोळीला महत्त्व दिले आहे. आता अनेक महिलांना तिळगुळ पोळी करता येत नसेल. यासाठीच या पोळीची अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही अतिशय चविष्ट अशी तिळगुळ पोळी बनवू शकता. (Marathi News)

साहित्य:
पारीसाठी: मैदा १ वाटी, कणिक १ वाटी, मीठ चिमूटभर, तेल २ टी स्पून, गरजेनुसार पाणी
सारणासाठी: तीळ १५० ग्रॅम, गूळ १५० ग्रॅम, सुके खोबरं कीस ३ टेबल स्पून, शेंगदाण्याचं कूट २ टेबल स्पून, खसखस १ टी स्पून, वेलची पूड १ टी स्पून, साजूक तूप १ टी स्पून सारणासाठी आणि वरून लावण्यासाठी आवश्यकतेनुसार. (Todays Marathi Headline)

Sankranti

कृती:
कृती: प्रथम पारीसाठी मैदा १ वाटी, कणिक १ वाटी, मीठ चिमूटभर, तेल २ टी स्पून हे सर्व साहित्य एकत्र करून नीट मऊ असे पीठ मळून घ्यावे. हे पीठ १५ मिनिटं झाकून ठेवावे. सारणासाठी तीळ, खोबरे, खसखस वेगवेगळे भाजून, याची मिक्सरमधून पूड करून घ्यावी. त्यात भाजलेल्या दाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. मग बाऊलमध्ये हे पीठ काढून त्यात वेलची पूड मिक्स करून घ्यावी. आता हाताला तूप लावून सारणाचे छोटे गोळे तयार करून ठेवावे. पारीसाठी केलेल्या पिठातून पोळीसाठी गोळे तयार करून प्रत्येक गोळ्याची पारी करून त्यात सारणाचा गोळा भरून बंद करून हलक्या हाताने पोळी लाटावी. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे-थोडे तूप सोडून भाजून घ्यावी. खरपूस तिळगुळ पोळी तयार. (Top Trending News)

पद्धत २

साहित्य :
अर्धा किलो गुळ किसलेला, अर्धा वाटी भाजलेल्या तिळाची पूड, अर्धी वाटी डाळीचे पीठ, एक लहान चमचा वेलची पूड, ६ वाट्या गव्हाची कणिक, पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन, पीठ भाजण्यासाठी अर्धी वाटी तेल, चिमूटभर मीठ (Latest Marathi Headline)

=========

Shami Tree: श्रीरामांनी पुजलेल्या शमी वृक्षाला धार्मिकसोबतच आहे आयुर्वेदिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व

=========

कृती:
सर्वप्रथम डाळीचे पीठ तेलावर नीट भाजून गार करुन घ्यावे. आता किसलेल्या गुळात डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून सर्व मिश्नरण एकजीव करावे. आता कणिक चाळून घ्यावी आणि त्यात तेलाचे मोहन, मीठ घालून नीट भिजवून घ्यावी. तेलाचा हात लावून हे पीठ थोडा वेळ बाजूला ठेवावे. कणकेचे दोन गोळे घ्यावेत. एका गोळ्याएवढा गुळाचा गोळा घ्यावा. दोन्ही पाऱ्या छोट्या छोट्या लाटून घ्यावा. पहिल्या पारीवर गुळाचे सारण ठेऊन नीट शेवटपर्यंत पसरून घ्यावे. आता त्यावर कणकेची दुसरी पारी ठेवावी. कडा दाबून पिठीवर पातळ पोळी लाटावी. पाहिजे असल्यास लाटून झाल्यावर कडा काढून टाकाव्या. आता ही पोळी चांगली खमंग भाजावी. तव्यावर पोळी तूपात भाजून घ्यावी. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.