Home » Health Care : सावधान! अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त घातक, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

Health Care : सावधान! अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त घातक, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health Care
Share

सर्वच लोकांच्या घरातील सकाळ म्हणजे अंघोळ झाल्यानंतर घरातील देवासमोर दिवा लावणे, देवाची पूजा करणे आणि संपूर्ण घरामध्ये अगरबत्ती आणि धूप फिरवणे. यामुळे वातावरण अगदीच प्रसन्न होते. सकाळची सुरुवात देखील अतिशय सकारात्मक आणि एनर्जीने परिपूर्ण अशी होते. संपूर्ण घरामध्ये एक वेगळीच वाईब असते, ज्यामुळे समाधान मिळते. केवळ सकाळ नाहीतर संध्याकाळी देखील देवासमोर दिवा लावून झाल्यानंतर घरामध्ये अगरबत्ती फिरून धूप जाळला जातो. ही भारतातील प्रत्येक घराची एक पद्धत आहे, एक अलिखित नियम आहे. (Health Care)

पूजा करताना नियमित छान सुगंधी वास असलेली अगरबत्ती लावली जाते. तर काही लोक अगरबत्तीचा वापर घरात सुवासिक वास येण्यासाठी करतात. बाजारात अगरबत्यांना मोठी मागणी आहे. मात्र अगरबत्ती आणि धूप जाळल्याने मनाला कितीही समाधान मिळत असले तरी शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. तसेच वेगवेगळ्या वास असलेल्या अगरबत्त्या बाजारात उपलब्ध आहेत. हे ऐकून अनेकांचे डोळे मोठे झाले असतील की, देवाजवळ अगरबत्ती आणि धूप लावल्यावर कोणते गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतील काहीही काय? पण हे खरे आहे. अगरबत्तीमधून निघणारा हा धूर सिगारेटपेक्षाही हानिकारक ठरू शकतो. (Marathi News)

अगरबत्ती म्हणजे सुवासिक पदार्थांच्या काड्या. अगरबत्ती तयार करण्यासाठी ज्वलनशील पदार्थ वापरले जातात. लाकूड किंवा लाकूड पावडरपासून बनवलेल्या अगरबत्तीला शंकूचा आकार दिला जातो. अशा पद्धतीने अगरबत्ती तयार केली जाते. मात्र या अगरबत्तीमधून निघणारा धूर शरीरासाठी जीवघेणा ठरू शकतो. चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जेव्हा अगरबत्ती जळत असते त्यावेळी धुराबरोबर काही अतिसूक्ष्म कण त्या धुराबरोबर बाहेर पडतात आणि ते हवेमध्ये मिसळले जात असतात. त्यामुळे सुगंध येणाऱ्या अगबत्तीमधील हे सूक्षम कण शरिरासाठी हानिकारक ठरून अंतर्गत अवयवांचे नुकसान किंवा रोगास कारणीभूत ठरू शकतात. (Side Effects of Agarbatti)

Health Care

अगरबत्ती लावल्यानंतर म्हणजे जाळल्यानंतर त्यातून निघणारा धूर आरोग्यासाठी अनेक मोठे धोके निर्माण करू शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अगरबत्ती आणि धूपबत्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलीएरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAH) चा फुफ्फुसांवर खूप वाईट परिणाम होतो. अगरबत्त्या ९६ टक्के लोकांच्या घरी वापरण्यात येतात. तीन तासांपर्यंत एका खोलीत या अगरबत्त्या जाळल्या गेल्या आणि २४ तासांसाठी त्या बंद खोलीत मानवी फुफ्फुसांच्या पेशी ठेवण्यात आल्या. अगरबत्त्यांच्या धुरामध्ये असणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसले. सिगारेटच्या धुरामुळेही अगदी असाच परिणाम होताना पाहायला मिळतो. (Latest Marathi Headline)

याशिवाय अगरबत्तीचा जास्त काळ वापर केल्याने डोळे आणि त्वचेशी संबंधित अॅलर्जी होऊ शकते. या गोष्टी जाळल्याने निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांना जळजळ होते. तर संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना या धुराच्या संपर्कात येताच त्वचेला खाज येऊ शकते. होतो सुगंधित उदबत्ती आणि धुपामधून निघणाऱ्या रासायनिक धुराचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Top Marathi HEadline)

या गोष्टींचा दीर्घकाळ वापर केल्याने डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका देखील वाढू शकतो. सीपीसीबी पॅनेलनुसार, या धुराचा श्वसनसंस्थेवरही परिणाम होतो. अनेक संशोधनांनुसार, अगरबत्तीच्या धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने श्वसन क्षमतेवर ३० टक्के परिणाम होऊ शकतो असही म्हटले जाते. अगरबत्तीच्या धुरात असलेले कण, वायू आणि सेंद्रिय संयुगे श्वसनमार्गाद्वारे शरीरात पोहोचल्यावर वायुमार्ग कमकुवत करतात. (Latest Marathi News)

========

Shami Tree: श्रीरामांनी पुजलेल्या शमी वृक्षाला धार्मिकसोबतच आहे आयुर्वेदिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व

Devghar : वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर नेमके कुठे असावे? काय आहेत देव्हाऱ्याचे नियम?

========

अगरबत्ती लावण्याचे अनेक तोटे असले तरी काही फायदे देखील आहेत. जसे की अगरबत्ती घरात लावल्याने घरातील वातावरण प्रसन्न होते. घरात मंद सुगंध दरवळू लागतो. एवढेच नाही तर, असे म्हणतात की अगरबत्ती लावण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. विशिष्ट प्रकारच्या सुवासाने डोकेदुखी आणि मेंदूशी निगडित सर्व रोगांचा नाश होतो. शिवाय गृहकलह आणि पितृदोष असल्यास ते देखील नाहीसे होतात आणि घरात शांती आणि भरभराट राहते. (Top Trending Headline)

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी किंवा ताण असल्यास घरात विशिष्ट्य प्रकारची सुवासिक उदबत्ती लावावी. या मुळे रात्री झोप देखील चांगली येते. अगरबत्ती लावण्याने पारलौकिक किंवा दैवीय शक्ती आकर्षित होतात आणि त्यामुळे त्यांचा कडून व्यक्तीला मदत मिळते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अगरबत्ती घ्यायला जाल तेव्हा सुगंधी अगरबत्ती घेताना एकतर त्या नैसर्गिकरित्या बनवलेल्या असतील याची खात्री करून घ्या किंवा घरात देवाला वाहिलेली फूले सुकवून त्यात तूप, कापूर, वैगरे नैसर्गिक घटक वापरून त्यापासून धुपकांडी तयार करू शकता. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.