Home » Devghar : वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर नेमके कुठे असावे? काय आहेत देव्हाऱ्याचे नियम?

Devghar : वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर नेमके कुठे असावे? काय आहेत देव्हाऱ्याचे नियम?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Devghar
Share

आपण कायम नवीन घर घेताना किंवा घर बांधताना सर्वात आधी विचार करतो तो देवघर कुठे आणि कसे असावे याचा. आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घरातील देवघर. आपल्या घराला सकारात्मक ऊर्जा देणारे, प्रसन्न वातावरण निर्माण करणारे देवघर कायम प्रशस्त आणि योग्य ठिकाणी असल्यास त्याचा आपल्या घरावर आणि घरातील सदस्यांवर उत्तम परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी असले तर ते लाभदायक ठरते अन्यथा त्याचे चुकीचे परिणाम आपल्याला दिसून येतात. मग नक्की वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे आणि कसे असले पाहिजे चला जाणून घेऊया. (Devghar)

घरात देवघर कुठे असावे आणि त्याची दिशा कोणती असावी, याबाबत वास्तुशास्त्रात काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. योग्य ठिकाणी देवघर स्थापन केल्याने घरात सुख-समृद्धी, शांती आणि सकारात्मकता टिकून राहते. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरात देवघर असतेच असते. घरातील देवघराची मांडणी ही चुकीची असल्यास त्या घरातील व्यक्तींना विविध प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. मात्र जर तुम्ही देवघराशी संबंधित काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले तर नक्कीच तुम्हाला तुम्च्या पूजेचे योग्य ते फळ प्राप्त होते. मग देवघर तयार करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे चला जाणून घेऊया. (Devghar and Vastushastra)

वास्तुशास्त्रानुसार, देवघर ठेवण्यासाठी उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशा सर्वोत्तम मानली जाते. ही दिशा शुभ आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी आहे. या दिशेला देवतांची दिशा मानले जाते, त्यामुळे या ठिकाणी देवघर असले तर चांगले परिणाम मिळतात. ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते. देवघर हे ईशान्य दिशेला असेल तर त्यामुळे तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहाते, वाईट गोष्टींपासून तुमचं संरक्षण होतं. घरात स्थिरता राहाते, आर्थिक अडचणी येत नाहीत. हे शक्य नसल्यास पश्चिम दिशेला देवघर बनवू शकता. (Marathi News)

तर पूर्व दिशा ही सूर्यची दिशा असून ती शुभ मानली जाते. जर ईशान्य दिशेत जागा उपलब्ध नसेल, तर देवघर पूर्व दिशेला ठेवले तरी चालते. याशिवाय तुम्ही उत्तर दिशेलाही देवघर ठेवले तरी चालते. ही दिशा सकारात्मक ऊर्जा मानली जाते आणि धनसंपत्ती वाढवणारी आहे. घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते. (Todays Marathi HEadline)

Devghar

मात्र देवघर दक्षिणेकडे किंवा नैऋत्य कोपऱ्यात असू नये. या दिशांमध्ये देवघर ठेवल्यास नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. शयनगृह, बाथरूम किंवा स्वयंपाकघरात देवघर ठेवणे टाळावे. विशेषतः बाथरूमच्या जवळ देवघर असू नये. वास्तुशास्त्रानुसार कधीही तुमच्या बेडरूममध्ये तुमचं देवघर नसावं, त्याचा नकारात्म परिणाम हा तुमच्यावर होतो, घरात गृहकलह वाढतात. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार देवघरात चुकूनही पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पूर्वजाचे फोटो हे तुमच्या घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावेत. (Top Stories)

या गोष्टी लक्षात ठेवा
– देवघरात शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत, असे सांगितले जाते. शिवाय देवघरात शनीची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात ठेवू नये, असे म्हटले जाते. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. यासोबतच गुरू आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, असे सांगितले जाते. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तर हरकत नाही. (Top Trending News)

– देवघरातील मूर्ती किंवा फोटोचे तोंड अशा पद्धतीने असावे जे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला येतील असे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे.

– घरातल्या देवघरामध्ये लाल रंगाचं कापड घालू नये असं वास्तुशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. – देवघरात कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये. लाल रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात. देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते. (Top Marathi News)

– देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे, असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. (Latest Marathi HEadline)

========

Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थीला करा ‘हे’ उपाय आणि मिळवा इच्छित लाभ

Angarki Chaturthi : २०२६ सालातील पहिलीच अंगारकी संकष्टी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

========

– देवघर लाकडाचे असणे श्रेयस्कर मानले जाते. मेटल किंवा लोखंडी देवघर टाळावे. देवघराच्या दरवाजे आणि खिडक्या असाव्यात जेणेकरून सकारात्मक ऊर्जा घरात संचार करू शकेल. देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे. (Top Trending Headline)

– देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे, असे सांगितले जाते. (Social News)

(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.