Home » Parenting Tips : मुलांचे मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स आजमावून पाहाच

Parenting Tips : मुलांचे मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स आजमावून पाहाच

by Jyotsna Kulkarni
0 comment
Parenting Tips
Share

मोबाइल ही माणसाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी गरज बनली आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचे व्यसन जडल्याचे चित्र आहे. गरज म्हणून मोबाइल आपल्या आयुष्यात आला आणि व्यसन बनून राहिला. आज प्रत्येकाच्याच हातात आपल्याला मोबाइल दिसून येतो. लहान २/३ वर्षाची मुलं देखील मोबाईलसाठी वेडी झाली आहेत. मोबाइलमधले काही कळत नसताना देखील ही लहान मुलं मोबाईलसाठी हट्ट करताना दिसतात. आजच्या पिढीतील मुलं तासंतास मोबाइलमध्ये व्हिडिओ बघण्यात बिझी असतात. काही मुलं तर मोबाइलशिवाय जेवत देखील नाही. (Parenting Tips)

अशा या मोबाइलच्या हट्टामुळे मुलांना अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. अनेक प्रयत्न करून देखील मुलांचे हे मोबाइल वेड पालकांना कमी करता येत नाहीये. मोबाइल हातातून घेतला की, नुसता धिंगाणा करतात, रडारड करतात. याला घाबरून पालक मोबाइल पुन्हा मुलांना देतात. मात्र असे करणे खूपच चुकीचे आहे. मुलांमध्ये असलेले मोबाइल वेड जर खरंच पालकांना कमी करायचे असेल तर यासाठी काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Mobile)

वाढत्या स्क्रीन टाइमचे अनेक दुष्परिणाम हेत. जसे की, पाठदुखी, वजन वाढणे, याबरोबरच चष्मा लागणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, झोपेच्या अनियमित वेळा, भुकेचे चक्र विस्कटणे, करिअर आणि नातेसंबंध याकडे दुर्लक्ष झाल्याने दुरावा निर्माण होणे, चिंता लागून राहणे, औदासिन्य, मूड बदलणे किंवा मनाच्या स्थितीमध्ये वारंवार बदल होणे या समस्या यामुळे उद्भवू लागतात. (social Updates)

निश्चित स्क्रीन टाइम
मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी, मुलांसाठी स्क्रीन टाइमचा नियम बनवा. दररोज मोबाईल वापरण्यासाठी एक वेळ निश्चित करा जेणेकरून मुल संपूर्ण दिवस मोबाईल वापरू नये तर फक्त त्या वेळेसाठीच वापरेल. यामुळे हळूहळू त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर होतील. (Marathi)

मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करा
मोबाईल वापरण्याऐवजी, त्यांना क्रिकेट, फुटबॉल किंवा सायकलिंगसारख्या मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करा. यामुळे त्यांचे लक्ष मोबाईलवरून हटेल आणि त्यांची शारीरिक क्षमता सुधारेल. (Todays Marathi HEadline)

Parenting Tips

वाचन
मुलांना मोकळ्या वेळेत पुस्तके वाचायला द्या. अनेक पालकांना वाटेल लहान मुले पुस्तके नाही वाचणार. पण आजची पिढी ही नवी पिढी आहे. आतापासून जर तुम्ही तुमच्या मुलामध्ये पुस्तक वाचनाची सवय लावली तर ती तुमच्यासाठी आणि मुलासाठी फायद्याची ठरेल. याशिवाय तुम्ही मुलांना मैदानी खेळ, चित्रकला, रेखाचित्रे, कथा पुस्तके किंवा संगीत असे पर्याय देऊ शकता. या कामांमध्ये रस निर्माण करून, तुम्ही त्याचे लक्ष मोबाईलवरून वळवू शकता. (Marathi NEws)

कुटुंबाला प्राधान्य द्या
रोज काही वेळ कुटुंबासोबत खेळण्यात, बोलण्यात किंवा इतर क्रियाकलापांमध्ये घालवा. जेव्हा मुले घरात व्यस्त राहतील, तेव्हा त्यांना मोबाईलची गरज कमी वाटेल. यामुळे कुटुंबातील संबंधही अधिक मजबूत होतील. (Top Trending Headline)

चुकीचे हट्ट पुरवू नका
मुलाने कितीही तुमच्यासमोर हट्ट केला किंवा नाराजी व्यक्त केली तरी तुम्ही फोन वापरायला देऊ नका. जर मुल रडायला लागले आणि त्याला गप्प करण्यासाठी जर तुम्ही त्यांना फोन वापरायला दिला तर कदाचित त्यांच्या सवयीत सुधार होण्याऐवजी सवय बिघडली जाईल यामुळेच अनेक परिणामांना सोमोरे जावे लागेल. (Top Marathi News)

मुलांसोबत वेळ घालवा
एकटेपणा किंवा भावनिक अंतरामुळे मुले मोबाईलकडे आकर्षित होतात असे अनेकदा दिसून येते. म्हणून, पालकांनी दररोज त्यांच्या मुलांसोबत काही वेळ घालवावा. एकत्र जेवणे, बोलणे किंवा खेळणे – हे सर्व मुलाचे लक्ष मोबाईल फोनवरून वळवून नातेसंबंधांवर केंद्रित करण्याचे मार्ग आहेत. (Latest Marathi Headline)

स्वतः मोबाईलचा वापर मर्यादित करा
मुले जे पाहतात तेच शिकतात अशी एक म्हण आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतः दिवसभर मोबाईलवर राहिलात तर मुलेही तेच करतील. म्हणून, स्वतः मोबाईल वापर मर्यादित करा.जेणे करून ते मोबाइलपासून दूर राहतील. (Top Stories)

=========

Parenting Tips : नव्या वर्षात मुलांसोबत मैत्रीचे नाते तयार करण्यासाठी वापरा या 7 टिप्स

=========

इनडोअर गेम्स
इनडोअर गेम्स पावसाळ्यात बाहेर जाणे शक्य नसते. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मुलांसोबत इनडोअर गेम्सचे नियोजन करू शकता. घरच्या घरी असे काही खेळ खेळा, ज्यामुळे त्यांची आवड वाढते आणि त्यात त्यांचा सहभाग असतो, काही खेळ ज्ञानाचेही असू शकतात, ज्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो. (Top Trending News)

स्क्रीन टाइमचे तोटे सांगा
मुलांना सोप्या भाषेत सांगा की, जास्त मोबाईल वापरल्याने डोळे कमकुवत होतात, झोप बिघडते आणि मेंदूवर परिणाम होतो. जेव्हा त्यांना कारणे स्वतःहून समजतील, तेव्हा ते मोबाईलचा वापर कमी करतील. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.