Home » New Year : न्यू इअर पार्टीसाठी ट्राय करा ‘या’ भन्नाट मॉकटेल रेसिपी

New Year : न्यू इअर पार्टीसाठी ट्राय करा ‘या’ भन्नाट मॉकटेल रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
New Year
Share

न्यू इयरच्या पार्टीसाठी आता सर्वच उत्सुक झाले आहे. जसजसे ३१ तारीख जवळ येत आहे, तसतसे तरुणाईच्या उत्साहाला उधाण येत आहे. २०२५ ला टाटा करत २०२६ चे स्वागत करण्यासाठी सर्वच सज्ज झाले आहेत. आता थर्टी फर्स्ट म्हटल्यावर सगळीकडे पार्ट्या होताना दिसतात. पार्टीशिवाय थर्टी फर्स्ट साजरा होत नाही. त्यामुळे सगळ्यांच्याच या न्यू इअर पार्टीचे विविध प्लॅन्स तयार झाले आहेत. आता पार्टी म्हटल्यावर ड्रिंक्स आणि नॉनव्हेज आलेच. मात्र सर्वच लोकं ड्रिंक्स अर्थात दारू पितात असे नाही. अनेक लोकं नॉन अल्कोहोलिक असतात. हे लोकं पार्ट्यांमध्ये दारूचे सेवन न करता फ्रुट ज्यूस पिऊन आपला आनंद साजरा करतात. मात्र आज आम्ही अशाच ड्रिंक्स न करणाऱ्या नॉन अल्कोहोलिक लोकांसाठी भन्नाट मॉकटेल्सच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. हे मॉकटेल्स नॉन अल्कोहोलिक लोकांचा पार्टीचा आनंद नक्कीच द्विगुणित करतील. यंदा तुम्ही देखील हे मॉकटेल्स तुमच्या दारू न पिणाऱ्या लोकांसाठी करू शकता. (New Year)

पर्पल पंच
पर्पल पंच २ लिटर जग बर्फाने भरा आणि त्यात १५०ml नॉन-अल्कोहोलिक जिन, ६०ml ब्लू कुराकाओ सिरप आणि लिंबाचा रस घाला. मिश्रण चांगले मिसळा आणि २०० मिली सोडा घाला. गार्निशसाठी लिंबाचे तुकडे घ्या आणि फॅन्सी ग्लासमध्ये सर्व्ह करा. (Marathi)

ट्रिपल मॉकटेल
शेक ग्लासमध्ये पायनॅपल ज्यूस, शुगर सिरप, लिची क्रश, ऑरेंज, लेमन ज्यूस आणि बर्फाचे तुकडे एकत्र करून चांगले शेक करून घ्या. शेक केल्यानंतर हे मिश्रण एका ग्लासमध्ये भरा. त्यावरून आवडीनुसार सोडा वॉटर टाका. ग्लासच्या वरच्या बाजूला पायनॅपलची एक स्लाइस लावून सर्व्ह करा. (Social Updates)

गुलकंद स्पिरिट
गुलकंद स्पिरिट बनवण्यासाठी, बर्फाने भरलेल्या कॉकटेल शेकरमध्ये, ६० मिली गुलाबजल, १ टेबलस्पून गुलकंद, १५ मिली लिंबाचा रस आणि चवीनुसार मध एकत्र करा आणि चांगले हलवा. सर्व्ह करण्यासाठी, मिश्रण बर्फाने भरलेल्या उंच ग्लासमध्ये गाळून घ्या आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा. (Todays Marathi Headline)

ऑरेंज मॉकटेल
एका मोठ्या भांड्यात संत्र्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करा. त्यात साखर किंवा मध घालून ते विरघळेपर्यंत चांगले मिसळा. आता त्यात थंड पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करा. ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि तयार केलेले मॉकटेल त्यात ओता. सजावटीसाठी संत्र्याची फोड आणि पुदिन्याची पाने वापरा आणि सर्व्ह करा. (Marathi Trending News)

New Year

फ्रुट पंच
मिक्सरमध्ये लिची क्रश १० मिली, अॅपल, ऑरेंज, मँगो, पायनॅपल ज्यूस प्रत्येकी ६० मिली, स्ट्रॉबेरी क्रश २० मिली आणि व्हॅनिला आइस्क्रीम एकत्र करून मिक्सरमधून व्यवस्थित एकजीव फिरवून घ्या. नंतर एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर स्ट्रॉबेरी क्रश घाला. नंतर त्यावर मिक्सरमधून एकजीव करून घेतलेले मिश्रण घाला. आणि त्यावर एक चमचा व्हॅनिला आइस्क्रीम घालून सर्व्ह करा. (Top Marathi News)

किवी मॉकटेल
लेमन ज्यूस १ चमचा, किवी ज्यूस ३ चमचे, किवी क्रश २ चमचे, शुगर सिरप १ चमचा, किवी क्रश १ चमचा घ्या आणि एका शेकरमध्ये मिक्स करून घ्या. नंतर एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घाला. नंतर शेकरमध्ये मिक्स केलेलं मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये टाका. ग्लासला वरच्या बाजूने किवी स्लाइस लावून सर्व्ह करा. (Latest Marathi Headline)

स्ट्रॉबेरी लेमोनेड
२०० ग्रॅम स्ट्रॉबेरी ब्लेंडरमध्ये चांगले बारीक करून गाळून घ्या. स्ट्रॉबेरीचा रस एका भांड्यात हलवा. साखर पाण्यात चांगली विरघळवा. साखरेचे पाणी थंड करा आणि स्ट्रॉबेरीमध्ये घाला. स्ट्रॉबेरीच्या रसात लिंबाचा रस घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा. सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासमध्ये बर्फाचा चुरा करून त्यात स्ट्रॉबेरी ड्रिंक टाका आणि आता वर सोडा टाकून सर्व्ह करा. (Marathi News)

कॉकटेल शेक
एका ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी क्रश घालून तो ग्लास फ्रिजमध्ये पाच मिनिटं ठेवा. नंतर मिक्सरमधून ऑरेंज क्रश २ चमचे. किवी क्रश १ चमचा, पायनॅपल क्रश ३ चमचे, स्ट्रॉबेरी क्रश २ चमचे हे सर्व चांगले एकजीव करून घ्या. नंतर त्यात व्हॅनिला आइस्क्रीम टाकून हलवून घ्या. फ्रिजमध्ये ठेवलेला स्ट्रॉबेरी क्रशचा ग्लास काढून त्यात बर्फाचे तुकडे घालून त्यात मिक्सरमधून काढलेला मॉकटेल शेक घाला आणि सर्व्ह करा. (Social News)

=======

New Year : पार्टीच्या दुसऱ्या दिवशी हँगओव्हर उतरवायचा मग करा ‘हे’ सोपे उपाय

New Year : नवीन वर्षात ‘हे’ संकल्प करून २०२६ चे करा दणक्यात स्वागत

=======

ऑरेंज काफिर चुना कूलर
एका मिक्सिंग ग्लासमध्ये २०० मि. ली. संत्रा रस आणि १५ मि.ली तौरानी स्विट हिट मिक्स एकत्र करा आणि चांगले मिसळा. दुसऱ्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि त्यात मिश्रित रस घाला. २-३ काफिर लिंबाची पाने घाला आणि हळूहळू ढवळा. (Top Stories)

व्हर्जिन पिना कोलाडा
२ कप अननसाचा रस १ कप नारळाच्या दुधात आणि 1 कप व्हॅनिला आइस्क्रीम मिसळा आणि अननसाच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.