हिवाळा म्हटले की, सर्दी, खोकला आदी आजार खूपच सामान्य आहेत. जसजशी थंडी वाढत जाते, तसतसे सर्दी खोकला होण्याचे प्रमाण देखील वाढते. मात्र यासोबतच थंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोटाशी संबंधित त्रास देखील वाढतात. पोट दुखणे, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता आदी अनेक त्रास हिवाळ्यात अनेकांना होतात. हिवाळ्यात पोटाचे त्रास होणे खूपच सामान्य आहे. हिवाळ्यात बर्याच लोकांचे मेटाबॉलिजम अर्थातच चयापचय प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे नियमितपणे मलत्याग करणे हे कठीण होते. याचमुळे पोटाचा त्रास होण्याचे प्रमाण वाढते. (Stomach Pain)
शिवाय हिवाळ्यामध्ये तापमानात घट झाल्यामुळे, आपल्याला तहानच कमी लागते आणि आपण पाण्याचे सेवन देखील कमी करतो. शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, आतड्यांना अन्न पचण्यास त्रास होतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता झाल्यामुळेच इतर पोटाच्या समस्या निर्माण होतात. शिवाय हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे अनेकांचे चहा सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढते. हिवाळ्यात शरीराला उब मिळते म्हणून चहाचे अधिक सेवन करतात. परंतु चहामध्ये असलेल्या कॅफिन आणि इतर काही घटकांमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे पोटाच्या समस्या आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. हिवाळ्यामध्ये पोटाच्या विविध समस्या निर्माण झाल्यावर त्यावर घरगुती उपाय करणे अगदी शक्य आहे. मग कोणत्या त्रासावर कोणता उपाय करावा पाहूया. (Winter Health)
– जास्त खाल्ल्याने गॅस, फुगणे इत्यादी समस्या सामान्य असतात. हे टाळण्यासाठी तुम्ही बडीशेप घेऊ शकता. त्यात ऍनेथोल, फेंचोन आणि एस्ट्रागोल असतात जे अँटिस्पास्मोडिक आणि दाहक-विरोधी म्हणून कार्य करतात. जेवणानंतर बडीशेप चावून खाणे पोटासाठी फायदेशीर आहे. (Health)
– पोट फुगण्याची समस्या कमी करण्यासाठी न्युट्रिशनिस्ट भरपूर पोटॅशियमचे सेवन करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत केळी, रताळी, राजगिरा यातून तुम्ही तुमच्या आहारात पोटॅशियमचा समावेश करू शकता. पोटॅशियम समृध्द अन्नपदार्थ सोडियमच्या प्रभावांना विरोध करतात आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतात. (Winter Care)
– मेथीला भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये काळे मिठ मिक्स करा. आता मेथीचे दाणे गरम पाण्यामध्ये टाका आणि हे पाणी प्या. मेथीच्या दाण्यांमुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. त्यामुळे पोटदुखी कमी होते. (Health Care)

– फायबर पोट साफ करण्यात महत्वाची भूमिका बजावते. तेव्हा आहारात फळं, भाज्या, धान्य इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. (Marathi)
– पोट खराब होणे म्हणजे पचनसंस्था नीट काम करत नाही. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पचन व्यवस्थित राहण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळणे अत्यंत गरजेचे आहे. बहुतांश लोकं कधीही जेवतात. सकाळचा नाश्ता वगळतात, तर काही लोकं फक्त एकाच वेळी जेवतात, ज्यामुळे पोट बिघडते. (Top Marathi News)
– जास्त वेळ रिकाम्या पोटी राहिल्याने आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होतो. त्यामुळे जास्त वेळ रिकाम्या पोटी राहू नका. यामुळे डोकेदुखी देखील उद्भवू शकते. (Latest Marathi Headline)
– हिवाळ्यात अपचनामुळे अनेक वेळा पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे बेकिंग सोडा आणि गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. तसेच पोटदुखी देखील कमी होते. एक चमचा बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून प्या. (Top Trending News)
– चांगली झोप ही एक औषध म्हणून काम करते, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. झोपेच्या कमतरतेमुळे तणावाची पातळी वाढू शकते जे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले नाही. चांगली झोप म्हणजे उत्तम स्ट्रेस मॅनेजमेंट. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कमीतकमी 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. (Top Stories)
=======
Health Tips : नवं वर्ष सुरू होण्यापूर्वी लावा या 5 सवयी, रहाल फिट आणि हेल्दी
=======
– रोजच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करा. रोज अक्रोड, बदाम इत्यादी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले पाहिजे. यासोबतच फळे आणि भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे अ, क, ब आणि फायबर असलेली फळे आणि भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीरातील मेटाबोलिजम सुरळीत ठेवण्यास मदत करतात. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
