आजच्या काळात मोबाईल ही गरज बनली आहे. प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्ट फोन दिसतोच दिसतो. आपल्या सर्वांचेच आयुष्य या स्मार्टफोनशी जोडले गेले आहे. आजकाल मोबाईलशिवाय राहण्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही. मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. आपल्या हातातल्या मोबाइलमध्ये कॅमेऱ्यापासून, मेल, प्रिंट्सपर्यंत सर्वच सुविधा मिळत असल्याने मोबाइलचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. सर्वच सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या मोबाइलचा वापर देखील कमालीचा वाढला आहे. (Mobile)
फोनचा वापर जास्त होत असल्याने फोन हळूहळू स्लो होण्याची आणि हँग होण्याची अनेकांची तक्रार असते. किती महागडा, चांगला फोन घेतला तरी तो स्लो होतो. अनेक उपाय करून देखील फोन आपल्याला अपेक्षित प्रतिसाद देत नाही. मग अनेकदा नवीन फोन घेण्याचा विचार देखील बरेच लोकं करतात. पण सगळ्यांनाच नवीन फोन घेणे शक्य नसते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला सतत स्लो आणि हँग होणाऱ्या फोनला नीट करण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत, जे करून तुम्ही तुमचा फोन घरच्या घरीच नीट करू शकता. (Marathi)
वेळोवेळी फोनमध्ये टेम्पररी फायली, कॅशे डेटा आणि बॅकग्राउंड अॅप्स साठत जातात, जे फोनच्या प्रोसेसिंगवर परिणाम करतात. यामुळे फोन हँग होणे, अॅप्स क्रॅश होणे किंवा बॅटरी लवकर संपणे अशा समस्या दिसून येतात. यावर अतिशय सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा फोन रीस्टार्ट करणे. जेव्हा आपण फोन रीस्टार्ट करतो, तेव्हा RAM क्लियर होते, बॅकग्राउंडमध्ये चालणारी अॅप्स बंद होतात आणि संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम ‘रिफ्रेश’ होते. त्यामुळे फोन हलका, जलद आणि स्मूद चालतो. तसेच, फोनचा ‘क्रॅश’ होण्याचा धोका कमी होतो. (Todays Marathi Headline)

फोनचे स्टोरेज भरलेले असेल किंवा आधीच खूप कमी असेल तर फोन स्लो होण्याची समस्या असू शकते. तुमच्या फोनमध्ये जागा कमी असेल आणि तुम्ही सतत त्यावर काम करत असाल, तर गोष्टींवर प्रोसेस करण्यासाठी वेळ लागू शकतो. फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रॅम दिली जाते आणि त्यानुसार त्यांच्या किमतीही असतात. फोनची रॅम जितकी कमी असेल तितकी त्याची किंमत कमी असेल. रॅम कमी असेल आणि तुम्ही हेवी ॲप्स चालवत असाल किंवा फोनवर लोड टाकत असाल तर फोन स्लो व्हायला लागतो. (Top Stories)
प्रत्येक फोनसाठी नवीन OS अपडेट सतत उपलब्ध असतात, जेणेकरुन बग फिक्स आणि परफॉर्मेंस चांगले केले जाऊ शकतात. काही लोक फोनचा स्पेस वाचवण्यासाठी नवीन OS इन्स्टॉल करत नाहीत. जर तुमचा फोन जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असेल तर तुमचा फोन स्लो होऊ शकतो. कडक उन्हात फोन हँग होऊ लागल्याचे अनेकदा दिसून येते. हे ओव्हरहिटिंगमुळे होते. फोन खूप गरम होत असेल तर हँग होण्याची समस्या उद्भवू शकते. (Top Marathi Headline)
तुम्ही जुना किंवा कमी किमतीचा फोन वापरत असल्यास, ॲप्सचा मोठा आकार स्टोरेज आणि परफॉर्मन्सवरही परिणाम करू शकतो. तुम्हाला फक्त या ॲप्सचे लाईट व्हर्जन इंस्टॉल करायचे आहे. हे ॲप्स कमी मेमरी घेतील. फोनचा स्पीड वाढवण्यासाठी जर तुम्ही अँप अनइंस्टॉल करू शकत नसाल तर ते डिसेबल करा, असे करण्यासाठी सेटिंग्ज ॲप्स आणि प्रोग्राम्स > तुम्हाला अक्षम करायचे असलेले ॲप उघडा डिसेबल पर्यायावर किल्क करा आणि कन्फर्म करा. (Latest Marathi News)
याशिवाय तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग देखील करू शकता. About Phone > Build Number वर 7 वेळा टॅप करा > आता Settings > Developer Options > Animation Scale बंद करा.” width=”1008″ height=”737″ /> अॅनिमेशन बंद करा : डेव्हलपर ऑप्शन्समध्ये जा आणि विंडो आणि ट्रान्झिशन अॅनिमेशन बंद करा किंवा 0.5x वर सेट करा. यामुळे स्क्रीन उघडण्याचा आणि बंद करण्याचा वेळ कमी होतो. जुन्या किंवा कमी रॅम असलेल्या फोनवर, ही ट्रिक त्वरित परिणाम दर्शवते आणि फोन पूर्वीपेक्षा अधिक फास्ट वाटतो. ते कसे करावे: Settings > About Phone > Build Number वर 7 वेळा टॅप करा > आता Settings > Developer Options > Animation Scale बंद करा. (Top Trending News)
========
Inactive Bank Account : 2 वर्षे बँक खाते वापरले नाही तर काय होते? जाणून घ्या सविस्तर माहिती
========
Storage > Cached Data > Clear Cache” width=”750″ height=”563″ /> Cache डेटा नियमितपणे क्लिअर करा : अनेक अ‍ॅप्स कालांतराने कॅशे फाइल्स जमा करतात. ज्यामुळे फोनची गती कमी होते. दर काही आठवड्यांनी त्या साफ केल्याने फोन सुरळीत चालतो. कसं करावं : Settings > Storage > Cached Data > Clear Cache (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
