Home » Health : जाणून घ्या आरोग्यास अतिशय लाभदायक असणाऱ्या ओल्या हळदीचे फायदे

Health : जाणून घ्या आरोग्यास अतिशय लाभदायक असणाऱ्या ओल्या हळदीचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

हिवाळा सुरु होताच अनेक नानाविध प्रकारच्या भाज्या आपल्याला बाजारात दिसायला लागतात. हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने आपल्याला शरीराला उष्ण ठेवणारे गरम पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर गाजर, मटार, पालेभाज्यांची अवाक होते. यातलीच एक भाजी, कंद म्हणजे ओली हळद. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर ओली हळद आपल्याला विक्रीस आलेली दिसते. आपल्या दैनंदिन जेवणात वापरली जाणारी हळद खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक असते. ओली हळद देखील आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. (Raw Turmeric)

हळद अन्नाची चव वाढवण्यासोबतच, अन्नाला रंग देण्याचे आणि अन्नाचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम करते, जेवणाशिवाय देखील हळदीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक मोठे आणि महत्वाचे फायदे आहेत. त्यातही जर हळद ओली किंवा कच्ची असेल तर ती अधिक जास्त लाभदायक ठरते. हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. साधारणतः हिवाळ्यामध्येच ओली हळद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. हिवाळयात कच्ची हळद खाणे अतिशय प्रभावशाली मानले जाते. (Marathi News)

कच्ची हळद अर्थात ओली हळद औषधी गुणांचा खजिना आहे. आयुर्वेदात कच्ची हळद सूज कमी करण्यास, सर्दीची समस्या दूर करण्यासाठी, पाचन प्रणाली सुधारण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण आणि कर्करोगासारख्या आजारांविरुद्ध लढण्यास प्रभावी आहे. ओली हळद आल्यासारखी दिसते. तिचा वापर ज्यूसमध्ये, दुधात उकळून, लोणचे, चटण्या बनवून आणि सूपमध्ये घालता येते. या ओल्या हळदीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Health

– संधिवातादरम्यान जळजळ कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे कच्च्या हळदीचा वापर केला जात आहे. कच्ची हळद सांधेदुखी कमी करण्यास प्रभावी आहे. तसेच, कच्ची हळद शरीराच्या नैसर्गिक पेशी नष्ट करणारे फ्री रॅडिकल्स देखील काढून टाकते. (Top Marathi News)

– कच्च्या हळदीमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असतात. हे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते, विशेषत: प्रोस्टेट कर्करोग असलेल्या पुरुषांमध्ये, तसेच त्यांना काढून टाकते. हे हानिकारक रेडिएशनच्या प्रदर्शनामुळे होणाऱ्या ट्यूमरपासून देखील संरक्षण करते.

– कच्च्या हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. ही हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप रोखण्यास मदत करते. या हळदीमध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकतात. (Top Stories)

– मुक्कामार किंवा सूज आल्यावर कच्ची हळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते. शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर कच्ची हळदचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.

– कच्ची हळद शरीरातील इन्सुलिन संतुलित करते. तसेच, ग्लूकोज नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही कच्ची हळद खूप फायदेशीर ठरते. हळद यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे, असे बर्‍याच संशोधनात समोर आले आहे. यामुळे यकृताचे कार्य सुधारते. (Marathi Latest Headline)

– कच्च्या हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका कमी होतो.

– कच्च्या हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. त्यात संक्रमणाशी लढण्याचे गुणधर्म देखील आहेत. यात सोरायसिस सारख्या त्वचेच्या रोगांविरूद्ध दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

– शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर कच्ची हळदचा लेप लावावा. कच्ची हळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास त्वचेचा रंग उजळतो (Top Trending News)

– वजन कमी करण्याचा गुणधर्म हळदीमध्ये आढळतो. त्याचा नियमित वापर वजन कमी करण्याचा वेग वाढवतो.

=========

Audumbar : अनेक रोगांवरील रामबाण उपाय म्हणजे ‘औदुंबर जल’

=========

ओल्या हळदीचे लोणचे
प्रथम ओली हळद स्वच्छ धुवून सुती कपडाने ती कोरडी पुसून घ्यावी. आता हलदीवरची साले काढून घेणे. आता ही हळद एका प्लेट मध्ये किसणीने किसून घ्यावी. किसलेली हळद एका बाऊलमध्ये घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लिंबू लोणचे मसाला, तिखट घाला. या मिश्रणामध्ये ३ ते ४ लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. लिंबू मुळे या मिश्रणाला चांगला रस सुटेल आणि लोणचे चटपटीत लागते. एका छोटया कढई मध्ये ५ मोठे चमचे फोडणीसाठी तेल घेऊन ते गरम झाले की त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालून घ्या. फोडणी खमंग झाली की, गॅस बंद करा. ही फोडणी थंड झाल्यावर तयार मिश्रणावर टाकावी. आता हे लोणचे नीट एकजीव करून घेऊन हवाबंद डब्यात भरावे आणि फ्रिजमध्ये ठेवावे. हळदीमुळे हे लोणचे जरी चवीला उग्र वाटले तरी जसे हे लोणचे जुने होईल तसा त्याला स्वाद येईल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.