Home » Lift : लिफ्टमध्ये आरसा असण्यामागे आहे अतिशय खास कारण

Lift : लिफ्टमध्ये आरसा असण्यामागे आहे अतिशय खास कारण

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lift
Share

आजकाल कमी जास्त कितीही मजल्यांच्या बिल्डिंग असल्या तरी त्यांना लिफ्ट असतेच असते. पायऱ्यांनी वर चढण्याचा त्रास वाचवण्यासाठी लिफ्टचा वापर केला जातो. केवळ रहिवासी बिल्डिंगच नाही तर ऑफिसेस, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, मॉल्स आदी सर्वच ठिकाणी लिफ्ट आपल्याला पाहायला मिळते. जुन्या पद्धतीच्या लिफ्ट सोडल्या तर नवीन प्रकारच्या सर्वच लिफ्ट्समध्ये अत्याधुनिक नवनवीन सुविधा आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण लिफ्ट्स पाहिल्या तर लिफ्ट्समध्ये मोठमोठे आरसे लावलेले दिसतात. लिफ्ट मधले आरसे पाहून आपल्याला वाटते हा डेकोरेशनचा भाग असावा. मात्र असे नाही, लिफ्टमध्ये आरसे लावण्यामागे एक खास कारण आहे. कोणते ते जाणून घेऊया. (Mirror in Lift )

वैज्ञानिकांनी लिफ्टचा शोध लावून आपला बराच त्रास आणि वेळ वाचवला आहे. लिफ्टचा वापर केल्याने आपली एनर्जी सुद्धा वाचते. लिफ्टमध्ये लावण्यात आलेला हा आरसा सुरुवातीपासूनच बसवण्यात येत होता असे नाहीये. यापूर्वी लिफ्टमध्ये कोणत्याही प्रकारचा आरसा नसायचा मात्र, नंतर आरसा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पूर्वीच्या लिफ्टमध्ये आरसा नव्हता पण आता मात्र सर्वच लिफ्टमध्ये आरसा का लावण्यात येतो. (Todays Marathi News)

Lift

पूर्वीच्या काळात लिफ्टमध्ये आरसा बसवलेला नसायचा आणि त्यामुळे लिफ्टमधून प्रवास करताना स्पीड खूप असल्याच्या तक्रारी अनेकांच्या येत होत्या. त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागायचे. तर काहींना भीती वाटू लागायची. अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी आल्यावर लिफ्ट उत्पादक कंपन्यांनी याच्या संदर्भात अभ्यास केला. त्यावेळी असे समोर आले की, लिफ्टमधून प्रवास करताना नागरिकांचे लक्ष हे भिंतींकडे असायचे आणि त्यामुळे लिफ्ट खूप वेगाने जात असल्याचे त्यांना वाटायचे. (Marathi News)

पण लिफ्टचा वेग हा जास्त नसायचा तर लिफ्ट नॉर्मल वेगानेच जात असे. त्यामुळे लिफ्ट उत्पादक कंपन्यांनी यावर एक उपाय शोधून काढला. हा उपाय म्हणजे लिफ्टमध्ये आरसा लावण्यात यावा. जेणेकरुन लिफ्टमधून प्रवास करताना नागरिकांचे लक्ष आरशांकडे जाईल. आता तसेच होऊ लागले आहे नागरिकांचे लक्ष लिफ्टमधील आरशाकडे असते आणि त्यामुळे त्यांना आपला लिफ्टमधील प्रवास कधी पूर्ण होतो हे कळत सुद्धा नाही. तसेच त्यांना अस्वस्थ वाटत नाही आणि लिफ्टचा स्पीड खूप जास्त असल्याचंही त्यांना वाटत नाही. (Top Trending News)

=========

World Highest Railway Station : जगातील सर्वाधिक उंच रेल्वे स्थानक; येथे पोहोचण्याआधीच लोक दोनदा विचार करतात

=========

अनेकांना एका खोलीत जास्त वेळ बंद असल्याने भीती वाटू लागते. अनेकांना या भीतीचा त्रास होतो. मग त्यांना घाम फुटतो, अस्वस्थ वाटते. काय करावे हे सुचत नाही. तेव्हा अशावेळी त्यांना शांत करता यावे म्हणूनच हे आरसे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळेच हे आरसे लावले जातात जेणेकरून त्यांना एकटे वाटत नाही. ही एक मानसिक स्थिती आहे. या भीतीला क्लॉस्ट्रोफोबिया असे म्हटले जाते. आरसा लावल्याने त्यांचे लक्ष वचलित होते. ते आपल्या प्रतिमेकडे आपोआपच पाहतात. अशावेळी त्यांची ही भीती नष्ट होते. त्यातून लिफ्टच्या गतीचाही अनेकांना त्रास होतो. त्यामुळे त्यांची ही बैचेनीदेखील कमी व्हावी यासाठी लिफ्टमधील आरसा महत्त्वाची भुमिका बजावतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.