कान हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा, नाजूक आणि अविभाज्य अंग आहे. कानाशिवाय मनुष्य अपूर्ण आहे. याच कानामुळे आपण बारीक बारीक गोष्टी ऐकू शकतो. त्यामुळेच एवढ्या महत्त्वाच्या या अंगाची स्वछता ठेवणे निगा राखणे आपले पहिले काम आहे. यासाठीच अनेकवेळा लोकं कान साफ करतात. कान साफ करताना सर्रास मेडिकलमध्ये मिळणाऱ्या इअरबर्ड्सचा वापर करतात. मात्र आपण खूप लोकांकडून ऐकले असेल की, इअरबर्ड्सने कान साफ करणे अजिबातच सुरक्षित नाही. जर तुम्ही इअरबर्डसने कान साफ करत असाल तर, त्याचे अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. (Ear Cleaning)
कॉटन इअर बर्ड्सचा वापर करून कान साफ करताना मेण अनेक वेळा ढकलून आत जाते. जे कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. एवढेच नाही तर इअर बडवरील कापूस खूप मऊ असतो, तो वारंवार वापरल्याने कानाचा पडदा फाटण्याची भीती असते. यामुळे नसा देखील खराब होऊ शकतात आणि व्यक्ती बहिरी देखील होऊ शकते. काही वेळा कॉटन इअर बड्स कानात कापसाचे तंतू सोडतात. हे तंतू गोळा होऊन कानात बुरशी निर्माण होऊ शकते. कानात बुरशीजन्य संसर्गामुळे कानात दुखणे, पाण्यासारखा स्त्राव किंवा पू होऊ शकतो. (Marathi News)
कान स्वच्छ कसे करावे?
– कोमट पाणी कानातला मळ सैल करण्यासाठी मदत करते. एका ड्रॉपरच्या मदतीने कोमट पाण्याचे काही थेंब कानात टाका. काही वेळ थांबा आणि नंतर डोके झुकवून पाणी बाहेर काढून टाका. हा उपाय खूप सोपा आणि सुरक्षित आहे. (todays Marathi Headline)
– ग्लिसरीन देखील तेलासारखे काम करते. कानात तेल घालायचे नसेल तर तेलाऐवजी ग्लिसरीनचे काही थेंब कानात टाकू शकता. ग्लिसरीनचे काही थेंब इअरवॅक्स काढून टाकण्यास मदत करतील. याशिवाय, ते तुमच्या कानाची त्वचा देखील मऊ करू शकते.
– खोबरेल तेल कानात जमा झालेला कोरडा मळ मऊ बनवण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी २-३ थेंब खोबरेल तेल कानात टाका आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हलक्या हाताने कान स्वच्छ करा. (Top Marathi News)
– लसणाच्या तीन ते चार पाकळ्या आणि तीन चमचे खोबरेल तेल घ्या. आता गॅसवर एक पॅन ठेवा, त्यात तेल घाला आणि गरम करा. या लसणाच्या पाकळ्या सोलून हलक्या हाताने कुस्करून घ्या. आता तेलात लसूण घाला आणि थोडा तपकिरी रंग आला की गॅस बंद करा. जेव्हा हे तेल कोमट होईल तेव्हा कानात काही थेंब टाका आणि कापसाने कान बंद करा.
– हायड्रोजन पेरॉक्साइड आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण कानात टाकल्यास मळ फेस होऊन बाहेर येतो. पण हा उपाय आठवड्यातून फक्त एकदाच करा. (Latest Marathi Headline)
– चमचा बेकिंग सोडा २ चमचे पाण्यात मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे २-३ थेंब कानात टाका. १० मिनिटांनी डोके झुकवून कान साफ करा. हा उपाय जास्त प्रमाणात साठलेला मळ काढण्यासाठी उपयुक्त आहे.
– कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.
– एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा पाणी घ्या. दोन्ही गोष्टी एकत्र करून कानात घाला. जर या उपायाने कानातील मळ एकाच वेळी साफ केला नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पुन्हा वापरू शकता.
– मीठ मिसळून तयार केलेले द्रावण कान साफ करण्यासाठी प्रभावी आहे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून त्याचे काही थेंब कानात टाका आणि नंतर डोके झुकवा. (Top Stories)
– गरम पाण्याची वाफ घेतल्यानेही कानाच्या आतील मळ आणि घाण मऊ होऊन बाहेर येते. विशेषतः हिवाळ्यात हा उपाय केल्यास खूप आराम मिळतो.
========
Consumer Day : राष्ट्रीय ग्राहक दिन! जाणून घ्या… ग्राहक म्हणून आपल्या अधिकारांबाबत
========
लक्षात ठेवा कानाला रोज साफ करण्याची गरज नसते, कारण इअरवॅक्स नैसर्गिकरित्या बाहेर येते. आंघोळ करताना पाणी आणि साबणाने इअरवॅक्स निघून जाते. मात्र जर कानात दुखत असेल किंवा ब्लॉकेज असेल किंवा कानामध्ये खाज येणे, तीव्र वेदना होणे आणि काही वेळा दुर्गंधीयुक्त स्त्राव बाहेर येणे ही संसर्गाची लक्षणे आहेत. त्यामुळे, जर तुम्हाला ऐकण्याच्या समस्या जाणवत असतील किंवा कानामध्ये तीव्र वेदना होत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे सुरक्षित नक्की चांगले ठरेल. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
