Home » Shakambhari Navratra : पौष महिन्यात सुरु होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचे महत्त्व

Shakambhari Navratra : पौष महिन्यात सुरु होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shakambhari Navratra
Share

वर्षातून चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात. यातल्या दोन नवरात्री गुप्त नवरात्री म्हणून ओळखल्या जातात तर एक चैत्र नवरात्री आणि एक शारदीय नवरात्री म्हणून ओळखल्या जातात. मात्र यासोबतच अजून एक नवरात्र साजरे केले जाते आणि ते म्हणजे, ‘शाकंभरी नवरात्र’. दरवर्षी डिसेंबर जानेवारीमध्ये शाकंभरी नवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरे होते. यंदा देखील लवकरच शाकंभरी नवरात्र सुरु होत आहे. (Navratri)

२०२५ मध्ये शाकंभरी नवरात्री २८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत असून, ३ जानेवारी २०२६ समाप्त होणार आहे. या नवरात्रामध्ये देवी शाकंभरीची पूजा केली जाते. हा उत्सव पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरू होऊन पौर्णिमेला संपतो. शाकंभरी हे पार्वतीचे रूप आहे. पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंभरी देवीने हा अवतार घेतला होता, म्हणूनच या दिवसाला शाकंभरी जयंती साजरी केला जातो. (Marathi)

शाकंभरी देवी निसर्गाची देवी मानली जाते, जी तिच्या भक्तांना अन्न, पाणी आणि फळे आणि फुले प्रदान करते. “शाकंभरी” नावाचा अर्थ भाजीपाला आणि अन्न पिकवणारी असा होतो. दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध करून देवीने पृथ्वीवर हिरवाई आणि जीवन परत आणले. निसर्गाचे संवर्धन आणि समतोल राखणे किती महत्त्वाचे आहे हे देवीचे रूप शिकवते. शाकंभरी देवी शाकाहार आणि हरित ऊर्जेची प्रमुख देवता मानली जाते. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनात राहणारी देवी असेही म्हणतात. (Shakambhari Navratri)

दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी म्हणूनही ओळखले जाते. ‘बनशंकरी देवी’ ही अनेकांची कुलदेवता देखील आहे. अशी अख्यायिका आहे की, जेव्हा अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेनं प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून तिला शाकंभरी नाव मिळाले. शाकंभरी नवरात्रामध्ये देवीला भाज्यांचे अलंकार करून सजवले जाते. तिचा विविध भाज्यांचा वापर करून शृंगार केला जातो. (Marathi News)

शाकंभरी पौर्णिमा पूजा विधी
पौष महिन्याच्या आठव्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करा, नंतर माता शाकंभरीचे ध्यान करा. लाल कपड्यावर घालून आईची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या आईभोवती ठेवा. गंगाजल शिंपडून आईची पूजा करा. तिच्या प्रसादात खीर-पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, साखर मिठाई, सुका मेवा यांचा समावेश आहे. मातेची पूजा आणि नियम पाळल्यास व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. शाकंभरी देवीचे प्रमुख मंत्र – ॐ शाकम्भर्यै नमः , ॐ ऐं ह्रीं क्लीं शाकम्भर्यै नमः (Todays Marathi Headline)

Shakambhari Navratra

शाकंभरी देवीची अनेक प्रमुख मंदिरे भारतात आहेत. यामध्ये राजस्थानचे शाकंभरी शक्तीपीठ, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील शाकंभरी मंदिर आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. पौष पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि भंडारा केला जातो. शाकंभरी पौर्णिमेला चालू हंगामात पिकणाऱ्या 60 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हे नैवेद्य सूर्योदयापूर्वी दाखवतात. राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये देवीला हे नैवेद्य अर्पण केलं जातं. (Top Marathi Headline)

शाकंभरी देवीची कथा
पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासुर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. दुर्गमासुराने दुष्टनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करविण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, ‘असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. ‘हात जोडून असुर म्हणाला, ‘देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे.’ ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, ‘तथास्तु.’ (Marathi Top Stories)

ब्रह्मदेवांचा एकच शब्द ‘तथास्तु’; पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले. सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषिमुनी तेजोहीन झाले. प्रभाहीन झाले. शक्तीहीन झाले. वरदानामुळे शक्तीसंपन्न बनलेला दुर्गमासुर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरु झाली. दुर्गासुर उन्मत, बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भानक पर्व सुरु झाले. (Top Trending Headline)

अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव ऋषीं जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कसे रुप होते तिचे? आगळेवेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच-उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. (Top Marathi NEws)

रुप विविधरंगी; पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला ‘शताक्षी’ असे म्हणू लागले. देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण ‘शाकंभरी’ देवी असे म्हणू लागले. (Latest Marathi Headline)

=========

Odisha : जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पुन्हा काय दिसले !

Tamil Nadu : कार्तिगाई दीपम प्रकाशोत्सव वादाच्या भोव-यात का अडकला !

=========

यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रेअस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युध्दासाठी आव्हान दिले. दुर्गासुर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे, ऋषिमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. (Top Trending News)

देवी त्यांना म्हणाली, ‘हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवो.’ एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खर्‍या अर्थाने माउली देवी होती. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.