दर महिन्याला दोन एकादशी तिथी येतात. अशा वर्षातून २४ एकादशी येतात. या सर्व एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. सध्या मार्गशीर्ष महिना सुरु असून, आता हा महिना संपतच आला आहे. लवकरच पौष महिन्याला सुरुवात होत आहे. अशातच पौष महिन्यातील कृष्ण पक्षात एकादशी तिथी येत आहे. या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात. सफला एकादशी ही वर्षातील अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते. या सफला एकादशीचे व्रत केल्याने पापांचे क्षालन होते आणि पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते. (Ekdashi)
यंदा सफला एकादशी ही पंचांगानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफला एकादशी तिथीची सुरुवात रविवार, १४ डिसेंबर रोजी रात्री ०८.४६ वाजता होणार असून, सोमवार, १५ डिसेंबर रोजी रात्री १०.०९ वाजता या तिथीची समाप्ती होणार आहे. उदय तिथीनुसार सोमवार, १५ डिसेंबर रोजी सफला एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त पहाटेपासून ते सकाळी ११.०८ वाजेपर्यंत असेल. १५ डिसेंबर रोजी सफला एकादशीला शोभन योग तयार होत आहे. शोभन योग सकाळपासून दुपारी १२:३० वाजेपर्यंत असेल. त्यानंतर अतिगंड योग तयार होईल. एकादशीला चित्रा नक्षत्र सकाळपासून ११:०८ वाजेपर्यंत असेल त्यानंतर स्वाती नक्षत्र लागत आहे. (lord Vishnu)
सफला एकादशी पूजा विधी
अन्य एकादशी तिथि प्रमाणेच सफला एकादशीची देखील पूजा केली जाते. सकाळी उठल्यानंतर स्नान करून व्रताचा संकल्प करा. नंतर देवघरात गंगाजल शिंपडून भगवान विष्णुची विधिवत पूजा करा. तुळशीची पानं, अगरबत्ती, सुपारी, फळ आणि श्रीफळ भगवान विष्णुच्या प्रिय गोष्टी आहेत. पूजा केल्यानंतर या अर्पण करा. सफला एकादशीच्या व्रताची कथा वाचा आणि नैवेद्य अर्पण करा. या शुभदिनी विष्णुसोबत कृष्णाचीदेखील पूजा केली जाते. काहीजण आपल्या घरी या दिवशी सत्यनारायणाचीही पूजा मांडतात. या दिवशी रात्री जागरणाचेदेखील विशेष महत्व आहे. (Top Marathi Headline)

सफाळा एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान नारायणाची पूजा करावी आणि भक्तिभावाने व्रत करावे. भगवान श्रीकृष्णाच्या मते, जो खऱ्या भक्तीभावाने सफाळा एकादशी पाळतो तो त्याला प्रिय होतो. जे भक्त विधीनुसार सफाळा एकादशीचे व्रत करतात त्यांना मृत्यूनंतर विष्णुलोक म्हणजेच वैकुंठधाम प्राप्त होते. सफाळा एकादशीचे व्रत भक्तीभावाने पाळल्यास जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते. तसेच या पवित्र दिवशी भगवान विष्णूचे भजन आणि कीर्तन आणि दान केल्याने आत्म्याला शांती आणि सर्व सुख प्राप्त होते. (Marathi Latest News)
सफला एकादशी कथा
चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला चार मुले होती. त्यातील लुम्पक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता. तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन तसेच इतर दुसर्या वाईट कामाकरिता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता. तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता. जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबाबत कळले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला. (Top Stories)
दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे. इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे. त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती. त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्याला खाऊ लागला. महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे. ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते. (Top Trending Headline)
नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असते. त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुम्पक राहत होता. या जंगलाला जनता देवीदेवतांची नगरी मानत असत. काही काळ गेल्यानंतर लुम्पकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला. त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला. दिवस उजाडता- उजाडता तो मूच्र्छित झाला. दुसर्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली. कसाबसा स्वत:ला सावरत तो काही खायला मिळते का, हे पाहण्यासाठी फिरू लागला. (Marathi News)
पशुपक्ष्यांची शिकार करण्या इतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली. तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्वरला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले. (Top Marathi News)

दुसर्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याचवेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर, अशी आकाशवाणी झाली. ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून ‘भगवान की जय हो’ असे म्हणत पित्याकडे गेला. (Latest Marathi Headline)
पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला. त्यानंतर चंपावती नगरीवर लुम्पक राजा राज्य करू लागला. त्याची पत्नी, पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले. वृद्ध झाल्यानंतर लुम्पक आपल्या मुलाच्या हाती राज्यभार सोपवून तपस्या करण्याकरिता जंगलात निघून गेला. त्यानंतर तो वैकुंठास गेला. त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्या शेवटी मुक्ती मिळते. आणि जे हे व्रत करीत नाही ते पशूपेक्षा काही कमी नसतात. या सफला एकादशीचे व्रत केल्याने, माहात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.’ (Top Trending News)
=========
Lord Surya : जाणून घ्या धनु संक्रांती म्हणजे काय आणि तिचे महत्त्व
Vastutips : घरात घोड्याची नाल लावण्याने होतील चमत्कारिक फायदे
=========
सफला एकादशीच्या दिवशी गुळाचे दान करावे. हे दान अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने दात्याचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही जर सफला एकादशीच्या दिवशी गरिबांना उबदार वस्त्रदान करावे. हिंदू मान्यतेनुसार जो कोणी असे करतो, त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. सफला एकादशीच्या दिवशी अन्नदानही करावे. या दिवशी अन्नदान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी तांदूळ आणि मका दान करण्याची ही मान्यता आहे. या एकादशीला पिवळ्या वस्त्रांचे दान देखील खूप शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर कुंडलीतील कमकुवत गुरू बलवान होतो. सफला एकादशीला व्रत संपल्यानंतर ब्राह्मणांना भोजन करणेही शुभ असते. तसेच जेवणानंतर त्यांना दक्षिणा द्यावी. (Social News)
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
