Home » Christian : ब्रिटिनमध्ये ख्रिश्चन होणार अल्पसंख्याक !

Christian : ब्रिटिनमध्ये ख्रिश्चन होणार अल्पसंख्याक !

by Team Gajawaja
0 comment
Share

एकेकाळी ज्या देशाच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नसे, त्या ब्रिटनची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. कारण या देशाचा प्रमुख ख्रिश्चन धर्मही संकटात सापडला आहे. ब्रिटिश नागरिक मोठ्या संख्येनं इस्लाम धर्माकडे आकर्षिक होत असल्याचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. धर्मानं ख्रिश्चन असलेले ब्रिटिश नागरिक स्वतःहून मुस्लिम धर्म स्विकारत आहेत. इन्स्टिट्यूट फॉर द इम्पॅक्ट ऑफ फेथ इन लाइफ या संस्थेच्या संशोधनातून हा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अहवालानुसार ब्रिटनमध्ये इस्लाम धर्म स्वीकारण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनमधील ख्रिश्चन लोकसंख्या ५०% पेक्षा कमी झाली आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार, इंग्लंड आणि वेल्सच्या लोकसंख्येमध्ये ख्रिश्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचे प्रमाण पहिल्यांदाच ५०% पेक्षा कमी झाले आहे. या भागात आता मुस्लिम धर्माच्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच ब्रिटनमध्ये “कोणताही धर्म नसलेल्या” लोकांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढत आहे. (Christian)

या सर्वामुळे ब्रिटनचा सर्वच रचना बदलून जाण्याची शक्यता आहे. ब्रिटिश नागरिक हे परंपरा पाळण्यासाठी ओळखले जातात. पण याच ब्रिटिश नागरिकांनी आपला धर्म बदलल्यामुळे ब्रिटनमधील संस्कृतीही वेगानं बदलत आहे. ब्रिटन हा देश त्यातील राजघराणे आणि धार्मिक चालीरितींसाठी ओळखला जातो. ख्रिश्चन धर्मामुळे या देशात असल्याचे मानले जाते. शिवाय ब्रिटिश नागरिक आपल्या ख्रिश्चन धर्माचा मोठा अभिमान असल्याचेही सांगितले जात होते. मात्र आता याच ब्रिटनमध्ये मोठ्या वेगान धर्मांतरण होत आहे. ब्रिटनमधील ख्रिश्चन धर्मिय मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्माचा स्विकार करत आहेत. यामध्ये तरुण वर्गाचे मोठा भरणा असून असे झाल्यास पुढच्या काही काळात या देशाचा मुळ धर्म असलेला ख्रिश्चन धर्म हा अल्पसंख्याकांचा धर्म म्हणून ओळखला जाण्याचा धोका आहे. या सर्वाबाबत इन्स्टिट्यूट फॉर द इम्पॅक्ट ऑफ फेथ इन लाइफ या संस्थेनं ब्रिटनच्या कानाकोप-यात जाऊन अभ्यास केला, आणि यातून तयार केलेल्या अहवालात धक्कादायक तथ्य़ मांडण्यात आले आहे. (International News)

यात ब्रिटनमधील तरुण पिढी मोठ्या संख्येने इस्लामकडे आकर्षित होत असल्याचे सांगण्यात आले आहे. जगभरात सुरू असलेली युद्धे आणि अन्यायाची वाढती भावना यामुळे मोठ्या प्रमाणात हे धर्मांतर होत आहे. युद्धामध्ये मुस्लिम धर्मियांवर अन्याय होत असल्याचा प्रचार होत आहे. सोबतच २०२३-२४ च्या इस्रायल-गाझा युद्धादरम्यान गाझामध्ये झालेल्या अत्याचाराचे एक मोठे चित्र तयार करण्यात आले आहे, यामुळे तरुण पिढी इस्लाम धर्म स्विकारत आहे. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनमधील ख्रिश्चन लोकसंख्या ५०% पेक्षा कमी झाली आहे. त्यातही काही ब्रिटिश नागरिक हे धर्म सोडून नास्तिक होत आहेत. ३९% लोकांनी संघटित धर्म सोडला असून ४४% लोकांनी चर्चमध्ये जाणे सोडल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. (Christian)

ब्रिटनचे नागरिक मोठ्या संख्येननं आपला धर्म बदलत असल्यानं येथील काही सामाजिक संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक संस्था या धर्मबदलांचा अभ्यास करुन ब्रिटनमध्ये पुन्हा कुटुंबव्यवस्था बळकट करावी अशी मागणी करत आहेत. प्रामुख्यानं तरुण पिढी अन्य धर्मियांच्या जाळ्यात अडकत आहे. हे तरुण कुटुंबापासून स्वतंत्र रहात असल्याचे आढळून आले आहे. अशा तरुण पिढीला कुटुंबांनी सामावून घेतल्यास ही तरुणपिढी आपल्या धर्मापासून दूरावणार नाही, अशा विश्वास काही संस्था व्यक्त करीत आहेत. प्यू रिसर्च सेंटरनेही या धर्मांतरणाबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या मते, २०५० पर्यंत ब्रिटनमध्ये याच वेगानं धर्मांतरण झाले तर ख्रिश्चन धर्म अल्पसंख्याक धर्म होणार आहे. यात फक्त ४५% लोक ख्रिश्चन म्हणून आपली ओळख सांगणार आहेत. (International News)

========

हे देखील वाचा :  America : इल्हान उमरला अमेरिकेतून हद्दपार करणार !

========

ब्रिटनमधील मुस्लिम लोकसंख्या प्रामुख्याने स्थलांतर आणि जन्मदर यांच्यामुळे वाढत आहे. २००१ मध्ये, ब्रिटनमध्ये अंदाजे १.६ दशलक्ष मुस्लिम नागरिक होते. २०२१ पर्यंत अंदाजे ही संख्या ४ दशलक्ष पर्यंत वाढली आहे. सध्या ब्रिटनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धर्म म्हणून मुस्लिम धर्म आहे. दक्षिण आशियासारख्या देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांमुळे या देशातील अनेक शहरे आता या स्थलांतरितांच्या ताब्यात गेली आहेत. लंडन आणि बर्मिंगहॅम सारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीच लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या आहे. या सर्वांचा प्रभाव तरुण पिढीवर होत असून त्यांचा धर्मांतराकडे ओढा वाढत आहे. (Christian)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.