Beauty Tips : मेकअप केल्यानंतर चेहऱ्याचे सौंदर्य खुलले जाते, परंतु दिवसाअखेर मेकअप काढल्यानंतर त्वचा कोरडी, टाईट आणि निर्जीव वाटू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे मेकअपमध्ये असणारे केमिकल्स आणि मेकअप रिमूव्हरमुळे त्वचेतील नैसर्गिक तेलं कमी होणे. अशावेळी त्वचेची ओलावा संतुलित ठेवणे, त्वचेला पोषण देणे आणि दुरुस्ती करणे गरजेचे असते. योग्य पोस्ट-मेकअप स्किन केअर केल्यास त्वचा पुन्हा मऊ, तजेलदार आणि निरोगी दिसते.
मेकअप काढताना Gentle Cleanser वापरा
मेकअप काढताना अनेकजण हार्श मेकअप रिमूव्हर किंवा अल्कोहोलयुक्त प्रॉडक्ट्स वापरतात, ज्यामुळे त्वचेतली ओलसरता झपाट्याने कमी होते. प्रथम micellar water किंवा oil-based cleanser वापरून मेकअप हलका करा. त्यानंतर gentle hydrating face wash ने डबल क्लीन्सिंग करा. यामुळे त्वचा स्वच्छ होत असतानाच तिची नैसर्गिक मऊपणाही टिकून राहतो. फेस वॉश निवडताना सल्फेट-फ्री आणि स्किनसाठी हायड्रेटिंग घटक असलेले प्रॉडक्ट्स निवडा.
टोनरचा करा वापर
क्लीन्सिंगनंतर त्वचेचा पीएच बॅलन्स बिघडतो, ज्यामुळे कोरडेपणा वाढतो. म्हणून alcohol-free hydrating toner वापरणे खूप महत्त्वाचे आहे. टोनर त्वचेला शांत करतो, छिद्रे कसतो आणि पुढील स्किन-केअर प्रॉडक्ट्स चांगल्या प्रकारे शोषले जावेत यासाठी त्वचा तयार करतो. गुलाबजल, अलोवेरा, काकडी अर्क असे घटक असलेला टोनर कोरडी होणारी त्वचा त्वरित फ्रेश करतो.

Beauty Tips
सिरमने द्या डीप हायड्रेशन
टोनरनंतर त्वचेला आवश्यक पोषण देणारा सिरम वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Hyaluronic Acid, Vitamin E, Niacinamide यासारखे हायड्रेटिंग सिरम त्वचेतील ओलावा पुन्हा भरून काढतात. मेकअप काढल्यानंतर त्वचा बारीक ताणलेली वाटत असेल तर हायलुरॉनिक सिरमची काही थेंब त्वचेवर हलक्या हाताने दाबून लावा. यामुळे त्वचा लवकर हायड्रेट होते आणि पुढील स्टेपला तयार होते.(Beauty Tips)
जाड थराचा Moisturizer वापरा
सिरमनंतर त्वचेतील ओलावा लॉक करण्यासाठी deep moisturizing cream लावणे आवश्यक आहे. मेकअपनंतरची कोरडी, थकलेली त्वचा मॉइश्चरायझरच्या जाड थराने त्वरित मऊ आणि पोषित होते. Shea butter, ceramides, glycerin, squalane यांसारखे घटक असलेले क्रीम रात्रीच्या वेळी अधिक फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचेची दुरुस्ती होते आणि पुढच्या दिवशी चेहरा तजेलदार दिसतो.
==========
हे देखील वाचा :
Perfume : परफ्यूम प्लॉस्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतच का साठवले जातात?
Lip Care : फाटलेल्या ओठांसाठी घरच्याघरी लिप बाम कसा तयार करावा? याचे फायदे घ्या जाणून
Bridal Lehenga Care : ब्राइडल लेहेंगा घातल्यानंतर अशी घ्या काळजी, पुन्हा वापरताना दिसेल नवाकोरा
============
लिप केअर आणि आय क्रीम विसरू नका
मेकअप काढल्यानंतर ओठ आणि डोळ्याभोवतालची त्वचा सर्वाधिक संवेदनशील असते. त्यामुळे hydrating lip balm आणि eye cream वापरणे गरजेचे आहे. आय क्रीम डोळ्याखालील भागाला ओलसर ठेवते, झीज कमी करते आणि काळी वर्तुळे नियंत्रणात ठेवते. लिप बाममुळे ओठ मऊ राहतात आणि फाटण्यापासून संरक्षण मिळते. रात्री लिप मास्क किंवा जाड बाम लावल्यास दुसऱ्या दिवशी ओठ उत्तम हायड्रेटेड दिसतात.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
