Home » America : इल्हान उमरला अमेरिकेतून हद्दपार करणार !

America : इल्हान उमरला अमेरिकेतून हद्दपार करणार !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

इल्हान उमर कचरा आहे, आम्ही तिला अमेरिकेत राहू देणार नाही, असे विधान करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प फक्त हे विधान करुनच शांत राहिले नाहीत, तर त्यांनी १९९१ पासून लागू असलेले सोमालियाच्या नागरिकांसाठीचे हद्दपारीपासून संरक्षण समाप्त केले आहे. त्यांच्या या निर्णयाचा आणि वक्तव्याचा अमेरिकेतील स्थलांतरितांनी विरोध केला आहे. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करीत ट्रम्प यांनी इल्हान उमरविरोधात पुन्हा विषारी वक्तव्य केली आहेत. इल्हानने अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी सख्या भावाबरोबर विवाह केल्याचे ट्रम्प सांगत आहेत. (America)

भारतविरोधी असलेली इल्हान उमर ही डेमोक्रॅटिक खासदार आहे. इल्हान उमर २०१९ पासून या पदावर आहे. इल्हान ही अमेरिकन काँग्रेसमध्ये पोहोचणारी पहिली सोमाली-अमेरिकन मुस्लिम महिला आहे. इल्हान उमर कायम भारत विरोधी भूमिका घेण्यासाठीही ओळखली जाते. तिने २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करण्यास विरोध केला. शिवाय २०२२ मध्ये पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा दौरा करुन तिथे तिने भारतावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. अशा इल्हान उमरच्या अमेरिकेतील वास्तव्यावरच आता शंका निर्माण झाल्या आहेत. (International News)

अमेरिकेत स्थलांतरितांचा मुद्दा सर्वात वादग्रस्त ठरला आहे. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानमधून आलेल्या एका व्यक्तीनं व्हाईट हाऊस जवळ केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्यावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी हा हल्ला झाल्यावर १९ देशातील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशास बंदी घातली. आता या देशांच्या संख्येत आणखी काही देशांची भर पडली आहे. त्यातही डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमालियातून अमेरिकेत स्थलांतर झालेल्या नागरिकांविरोधात आघाडी उभारली आहे. त्यातही इल्हान उमर या डेमोक्रॅटिक खासदाराविरोधात ट्रम्प उघडपणे जी वक्तव्य करत आहेत, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सोमाली स्थलांतरितांवर राग व्यक्त केला. (America)

या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारायला हवा, सोमाली फक्त एकमेकांना मारत राहतात. त्यांच्यातून दुर्गंधी येते आणि आम्हाला ते आमच्या देशात नको आहेत. जर आम्ही आमच्या देशात कचरा आणत राहिलो तर आम्ही चुकीच्या मार्गावर जात आहोत. हे सोमाली अमेरिकन काहीही योगदान देत नाहीत, असे वक्तव्य ट्रम्प यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी हे विधान केले, तेव्हाच सोमालियात कोरोना काळात घडलेला १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कमेचा घोटाळा उघड झाला आहे. कोरोना काळात सोमानालियामध्ये पाठवण्यात आलेला पैसा सोमाली लोकांनी बनावट बिलांच्या नावानं हडप केला आहे. त्यामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी सोमाली नागरिकांना कचरा, म्हणून संबोधले आहे. अर्थात या सर्वात डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांचा हात आहे, याची शंका असलेल्या ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांच्याविरोधातही आघाडी उभारली आहे. (International News)

ट्रम्प यांनी सुरुवातीपासून इल्हान ओमर यांना विरोध केला आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारातही इल्हान ओमर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यात सोमालियन नागरिकांसाठी पाठवलेल्या पैशात भ्रष्ट्राचार झालेल्या प्रकरणात इल्हान ओमर यांचाही समावेश असल्याचा संशय आहे. ही संधी साधून ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांच्या अमेरिकन नागरिकत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. इल्हान ओमर यांची संपूर्ण कारकिर्दच वादग्रस्त आहे. त्या कट्टर भारतविरोधी आहेत. ४ ऑक्टोबर १९८२ रोजी सोमालियातील मोगादिशू येथे त्यांचा जन्म झाला. (America)

१९९१ मध्ये सोमाली गृहयुद्धादरम्यान वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या कुटुंबांनी केनियातील निर्वासित छावणीचा आसरा घेतला. हे कुटुंब १९९५ मध्ये अमेरिकेत आले आणि मिनेसोटा येथील मिनियापोलिस येथे स्थायिक झाले. २००० मध्ये इल्हान ओमर अमेरिकेच्या नागरिक झाल्या. या दरम्यान त्यांनी नॉर्थ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदवी मिळवली. २०१६ मध्ये इल्हान ओमर मिनेसोटा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजवर निवडून आल्या आणि पहिल्या सोमाली-अमेरिकन मुस्लिम आमदार झाल्या. इल्हान ओमर या भारतविरोधी विचारसरणीनं अधिक चर्चेत राहिल्या आहेत. ३७० कलम रद्द करण्यासाठी त्यांनी भारतावर टीकेची झोड उठवली होती. शिवाय पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीवरही बहिष्कार टाकला होता. २०२३ मध्ये, खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे. (International News)

========

हे देखील वाचा : Three Gorges Dam : चायनाचं हे धरण पृथ्वीचं रोटेशन स्लो करतंय!

========

असे असले तरी इल्हान ओमर या राहूल गांधी यांच्या समर्थक आहे. राहूल गांधी अमेरिका दौ-यावर असतांना त्यांच्यासोबत इल्हान ओमर या कायम उपस्थित राहिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांच्या  विचारसरणीचा कायम विरोध केला आहे. इल्हान ओमर यांनी २००९ मध्ये तिचा जैविक भाऊ अहमद नूर सैद एल्मीशी अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी लग्न केल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यानुसार हा अपराध आहे. आता या सर्वात इल्हान ओमर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नागरिकत्वाबाबत काही शंका आल्यास त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांची अमेरिकेतून रवानगीही होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. (America)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.