पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरुन पाकिस्तानमध्ये गदारोळ उठला आहे. इम्रान खान यांचे हजारो चाहते अदियाला तुरुगांच्या बाहेर ठाण मांडून बसले आहेत. या सर्वात इम्रान खान यांच्य बहिणीला तुरुंगात जाण्याची परवानगी देण्यात आली. इम्रान खान जिवंत असले तरी त्यांना तुरुंगात छळण्यात येत असल्याचे या बहिणीनं खान यांच्या चाहत्यांना सांगितल्यावर आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खानवरुन एवढा गोंधळ चालू असतांना पाकिस्तानची सत्ता ख-या अर्थानं ज्याच्या हातात आहे, ते लष्करप्रमुख असीम मुनीर कुठे आहेत, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. सोबतच पंतप्रधान शाहबाज शरीफ अचानक प्रकृती बिघडल्यानं थेट लंडनला का गेले हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. या सर्वांमागे कारण आहे ते असीम मुनीर यांच्या नियुक्तीचे. (Pakistan)

तांत्रिकदृष्या लष्कर प्रमुख असीम मुनीर हे २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांची नियुक्ती तिन्ही सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर, म्हणजेच संरक्षण दलांचे प्रमुख, सीडीएफ म्हणून करण्यात येणार होती. मात्र असीम मुनीर सीडीएफ झाले तर पाकिस्तानला ते पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतील, हे जाणूनच शरीफ कुटुंबियांनी मुनीर यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया लांबवली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ घाईघाईनं लंडनला गेले आणि मुनीर यांची नियुक्ती लांबली गेली. त्यातच पाकिस्तानमध्ये इम्रान खान समर्थकांनी असीम मुनीर यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तिकडे बलुचिस्तान समर्थकांनीही असीम मुनी र विरोधात आघाडी उभारली आहे. त्यातच एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांनीही असीम मुनीर यांच्या या पदावरील नियुक्तीला विरोध केला आहे. त्यामुळे सध्यातरी मुनीर यांचे पाकिस्तानचे पहिले सीडीएफ होण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यासारखे आहे. (International News)
पाकिस्तानमधून इम्रान खान समर्थकांचे आंदोलन आणि बलुचिस्तान समर्थकांनी सुरु केलेला हिंसाचार यांच्या बातम्या प्रामुख्याने येत असल्यातरी या देशाच्या राजकारणातही मोठी कथा लिहिली जात आहे. अर्थात ही कथा एका पडद्याआड लिहिली जात आहे. यात पाकिस्तातनचे लष्कर प्रमुख असीर मुनीर यांचा हिरो बनण्याचा प्रयत्न हाणून पाडून त्यांना खलनायक म्हणून निवृत्त करण्याची योजना आहे. यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मोठा पुढाकार आहे. असीम मुनीर यांच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना २९ नोव्हेंबर रोजी येणार होती. परंतु नेमकं तेव्हाच पंतप्रधान शाहबाज शरीफ आजारपणाचे निमित्त सांगून अचानक लंडनला गेले. तिथे त्यांनी आपल्या भावासोबत, नवाज शरीफ यांच्यासोबत असीम मुनीर यांच्याबाबत चर्चा केली. (Pakistan)
पाकिस्तानमध्ये कधी आणि कुणाचे फोन टॅपिंग होतील याची शाश्वती नसते, त्यामुळे शरीफ भावंडांनी एकमेकांना भेटूनच चर्चा करणे योग्य समजले. म्हणूनच देशात इम्रान खान समर्थकांचे आंदोलन सुरु असतांनाही शाहबाज लंडनला गेले आणि नवाज शरीफ यांच्यासोबत चर्चा केली. आता लष्करप्रमुख असलेले असीम मुनीर तिन्ही सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर झाले तर काय होईल, याची जाणीव या शरीफ बंधूना आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुनीर यांनी सीडीएफ करायचे नाही, यासाठी थेट लंडनमधून रणनिती आखली गेली आहे. त्यामुळेच मुनीर यांच्या नियुक्तीबाबत पाच दिवस उलटूनही अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. असीम मुनीर यांचा कार्यकाळ तांत्रिकदृष्ट्या २९ नोव्हेंबर रोजी संपला आहे. त्यामुळे त्याच दिवशी त्यांचे नाव जाहीर होईल अशी चर्चा होती, पण हा निर्णय अद्याप झालेलाच नाही, शिवाय लष्करामधूनही मुनीर यांच्या या सीडीएफ पदाला विरोध असल्याचे समोर येत आहे. (International News)

या सर्वात एवढी गुप्तता राखली जात आहे की, पाकिस्तानचे कुठलेही वरिष्ठ सरकारी मंत्री स्पष्टपणे बोलत नाहीत. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही याबाबत आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे सांगून स्वतःला दूर ठेवले आहे. वास्तविक पाकिस्तानच्या सर्वच राजकीय नेत्यांना माहित आहे की, जर मुनीर यांची संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली तर ते घोषित हुकूमशहा होणार आहेत. पाकिस्तानमध्ये, संरक्षण दल प्रमुखांना सर्व लष्करी अधिकार देण्यात आले आहेत. संरक्षण दल प्रमुख हवाई दल, नौदल आणि लष्कराबाबत निर्णय घेण्यास सक्षम असतील. शिवाय, संरक्षण दल प्रमुखांवर त्यांच्या हयातीत खटलाही चालवता येणार नाही. ही नियुक्ती झाल्यावर मुनीर आयुष्यभर फील्ड मार्शल ही पदवी कायम ठेवणार आहेत. (Pakistan)
========
हे देखील वाचा : Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर !
========
आधीच लष्कर प्रमुख असलेले मुनीर पाकिस्तानची सर्व सूत्र चालवत आहेत, त्यात ते सीडीएफ झाल्यास राजकीय पक्ष मोडीत निघतील याची कल्पना आल्यामुळे पाकिस्तानमध्ये सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच राजकीय नेते असीम मुनीर यांच्याविरोधात एकवटले आहेत. पाकिस्तानचे हवाई दल प्रमुख एअर मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांनीही असीम मुनीर यांच्याविरोधात खुलेपणानं आवाज उठवला आहे. त्यामुळेच येत्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यात असीम मुनीर हे खलनायकासारखे बाहेर फेकले जातात, की ते त्यांच्या दहशतवादी नेटवर्कच्या आधारे पाकिस्तानची सत्ता बळकवतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
