पृथ्वीवर आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका असे सात प्रमुख खंड आहेत. काही हजार वर्षांनी या सात खंडांची संख्या आठ होणार आहे. कारण आफ्रिका खंडाचे भौगोलिक विभाजन होत आहे. गेल्या काही वर्षापासून आफ्रिका खंडामध्ये घडत असलेल्या भौगोलिक हालचालींमुळे भूगर्भशास्त्रज्ञांना कोड्यात पाडले होते. जगभरातले शास्त्रज्ञ या हालचालींचा अभ्यास करत होते, आणि त्यातून समोर आलेले सत्य जाणून हे शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत. काही हजार वर्षांनी आफ्रिका खंड, पूर्व आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिका अशा दोन भागात विभागणार आहे. या दोन आफ्रिका खंडामध्ये एक नवा महासागर जन्माला येणार असल्याचाही अहवाल जगभरातील शास्त्रज्ञांनी दिला आहे. हा सर्व बदल काही हजार वर्षांनी होणार असला तरी त्याचे परिणाम आत्तापासून या भागातील जनतेला जाणवू लागले आहेत. (Africa)

मुळात या सर्वच क्षेत्रात भूगर्भातील हालचाली वाढल्यामुळे भूकंपाचे प्रमाण वाढणार आहे. शिवाय या सर्वच भागातील मनुष्य जीवनावर त्याचा जसा परिणाम होणार आहे, तसाच परिणाम पशूपक्षी आणि वनसंपदेवरही होणार आहे. आफ्रिकन खंडात एक मोठा भूगर्भीय बदल होत आहे ज्यामुळे येत्या काही वर्षांत ते दोन स्वतंत्र खंडांमध्ये विभागले जाणार आहेत. यासंदर्भात जर्नल ऑफ आफ्रिकन अर्थ सायन्सेसमध्ये एक स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात असे म्हटले आहे की, आफ्रिकेतील हा बदल ईशान्येकडून दक्षिणेकडे पसरत आहे. यामुळे पृथ्वीचा नकाशा बदणार आहे. आफ्रिका खंडामध्ये होत असलेले हे विभाजन संथ होत आहे, मात्र ते धोकादायक असल्याचेही शास्त्रज्ञ सांगतात. आफ्रिका खंडातील ही दरी ईशान्येकडून दक्षिणेकडे पसरत आहे. त्यामुळे या सर्व काळात, ज्वालामुखी क्रियाकलाप, भूकंप आणि क्रस्टल स्ट्रेचिंगचे चिन्ह जमिनीखाली होणार आहेत. (International News)
सध्या पूर्व आफ्रिकेच्या मध्यभागी भूकंपाच्या घटना घडत आहेत, त्या याच हालचालींमधून होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एका अभ्यासानुसार ही प्रक्रिया अंदाजे ५ दशलक्ष ते १० दशलक्ष वर्षांत पूर्ण होईल. यावेळी इजिप्त, अल्जेरिया, नायजेरिया, घाना, नामिबिया हे देश पश्चिम आफ्रिकेचे भाग होतील. तर पूर्व आफ्रिकेमध्ये सोमालिया, केनिया, टांझानिया, मोझांबिक आणि इथिओपियाचा हे देश जाणार आहेत. अर्थात एवढ्या वर्षानंतर या देशांच्याही भौगोलिक सीमा बदण्याची शक्यता आहे. आफ्रिकेतील भू-स्वरूपातील हा मोठा बदल जगातील सर्वात प्रसिद्ध रिफ्ट सिस्टम, ईस्ट आफ्रिकन रिफ्टमुळे झाला आहे. ही दरी अंदाजे ४,००० मैल लांब, ३,०४० मैल रुंद आहे आणि जॉर्डनपासून मोझांबिकपर्यंत पसरलेली आहे. (Africa)

सध्या ही दरी जगभरातील छायाचित्रकारांसाठीही आकर्षणाचे स्थान ठरली आहे. गेल्या काही महिन्यात या दरीमधील रुंदी वाढल्याचे आता छायाचित्रांवरुन स्पष्ट झाले आहे. हा शोध रोमांचकारी वाटत असला तरी ही प्रक्रिया कशी आणि किती वेगानं होईल, याबाबत अद्यापही अभ्यास सुरु आहे. या विभाजनाच्या वेगाबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. काही शास्त्रज्ञ ही सर्व प्रक्रिया अत्यंत संथगतीनं होईल, असं सांगत असतांना काही शास्त्रज्ञ ठराविक अंतरानं जमिन विभागल्यावर विभाजनाची प्रक्रिया वेगानं होईल, असा सिद्धांत सांगतात. असे झाले तर मग या सर्वच भागात भूकंप आणि ज्वालामुखीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडणार आहेत. (International News)
========
हे देखील वाचा : Vladimir Putin: पुतिन आणि त्यांचे अभेद्य सुरक्षा पथक !
========
आफ्रिकेच्या भौगोलिक विभाजनाचे पर्यावरणीय व्यापक परिणाम होणार आहेत. येथे भविष्यात एक नवीन महासागर तयार होईल, परिणामी या भागातील पावसाचे स्वरूप बदलणार आहे. जिथे पाऊस चांगला पडत होता, तिथे दुष्काळ पडू शकतो, आणि जो भाग दुष्काळी आहे, तिथे पूरसदृश्य स्थिती येऊ शकते. त्याचा या भागातील शेतीवर परिणाम होणार आहे. यामुळेच या भागातील मानवी व प्राणी जीवनही बदलणार आहे. सोबतच नवीन समुद्री मार्ग आणि किनारपट्टी उदयास आल्यामुळे राष्ट्रीय सीमा बदलतील. व्यापार आणि दळणवळणासाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत. या खंड विभाजनामुळे सोमालिया, केनिया आणि टांझानियासारखे देश नवीन भूभागांचा भाग बनतील, तर युगांडा आणि झांबियासारख्या देशांना नवीन किनारपट्टी मिळेल, त्यामुळे तेथील उत्पादनाचे साधन बदलणार आहे. (Africa)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
