Home » Doctor : डॉक्टर ऑपरेशन करताना निळ्या किंवा हिरव्या रंगाचाच ड्रेस का घालतात?

Doctor : डॉक्टर ऑपरेशन करताना निळ्या किंवा हिरव्या रंगाचाच ड्रेस का घालतात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Doctor
Share

आपण जर पाहिले तर कायम ऑपरेशन करताना डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचेच कपडे परिधान करतात. प्रत्यक्षात डॉक्टर हॉस्पिटलमध्ये, रुग्नांना तपासताना कोणत्याही ड्रेसमध्ये असले तरी ऑपरेशन करताना मात्र डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे घालतात. फक्त डॉक्टरच नाही तर ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित असणारा संपूर्ण स्टाफ मेडिकल स्टाफ देखील याच रंगाचे कपडे परिधान करतात. कधी विचार केला आहे का की का याच रंगाचे कपडे डॉक्टर घालत असतील? मागे एक खास वैद्यकीय कारण आहे कोणते ते चला जाणून घेऊया. (Doctor)

शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना सतत लाल रंग दिसतो. म्हणजेच काय ऑपरेशन करताना आपल्या शरीरातील रक्त आणि आतील रचना लाल रंगाची असते. सतत लाल रंग पाहिल्याने आपले डोळे थकतात, आणि त्यांना काही काळाने धूसर दिसू लागते. हिरवा आणि निळा रंग लाल रंगाचा कॉम्प्लिमेंटरी रंग असल्यामुळे डोळ्यांना हा रंग बघून आराम मिळतो आणि कॉन्ट्रास्ट सुधारतो. त्यामुळे रक्ताचे आणि टिशूजचे बारकावे डॉक्टरांना अधिक स्पष्ट दिसतात. (Marathi)

१९९८ मध्ये टुडेज सर्जिकल नर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांनी हिरवे कपडे घालण्यास सुरुवात केली कारण, हिरवा रंग डोळ्यांना आराम देतो. शस्त्रकिया करताना बारकाईने लक्ष असणे अति आवश्यक असते. शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टरना सेकंदासाठी देखील डोळे बदन करता येत नाही, सतत त्यांना त्यांचे डोळे उघडे ठेऊन त्यांचे काम करावे लागते. आणि अनेक तास सतत डोळे उघडे ज्यामुळे डोळे थकतात, जर हिरवा रंग त्वरित दिसला तर डोळे थंड होतात. तर दुसरीकडे रुग्णाला निळ्या रंगाचा पोशाख दिला जातो. कारण रक्ताचा लाल रंग अनेकदा हिरव्या रंगात दिसत नाही. शस्त्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणावर रक्त बाहेर येते. रक्ताचा लाल रंग निळ्यावर उठून दिसतो. परंतु त्याचा प्रभाव मात्र जाणवत नाही. निळ्यावर लाल रंग पाहिल्याच मेंदूला फारसं विचित्र वाटत नाही. त्यामुळे रंग शास्त्राचा विचार करूनच ऑपरेशन करताना डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे घालतात. (Top Marathi NEws)

Doctor

अधिक तास चालणाऱ्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांचे लक्ष विचलित होण्याची खूपच सामान्य आणि मोठी समस्या असते. हिरवा/निळा रंग डॉक्टरांना सतत फ्रेश वाटण्यास मदत करतो. यामुळे दीर्घकाळ लक्ष केंद्रित ठेवणे सोपे होते. ऑपरेशन थिएटरमध्ये प्रखर लाईट्स असतात. जर डॉक्टर पांढरे कपडे घालतील तर लाईटमुळे जास्त चमक निर्माण होईल आणि डोळ्यांना त्रास होईल. पण हिरवा आणि निळा रंग ही चमक कमी करतो. (Latest Marathi News)

ऑपरेशन थिएटरमध्ये स्टेरिलिटी अर्थात निर्जंतुकीकरण कायम ठेवणे खूप महत्त्वाचे असते. हिरवा आणि निळा कपडा डाग पटकन दाखवतो, त्यामुळे थोडासा रक्ताचा किंवा औषधांचा डागही लगेच लक्षात येतो आणि तो स्वच्छ करता येतो. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. लाल आणि पिवळा रंग डोळ्यांना जास्त झोंबतो, पण हिरवा व निळा रंग सौम्य वाटतो. सतत शरीरातील रक्त आणि अंतर्गत अवयव पाहिल्यामुळे डॉक्टर तणावात येऊ शकतात. हिरवा व निळा रंग त्यांना मानसिक शांतता देतो. (Top Trending News)

========

China : चिनी वर…पाकिस्तानी वधू !

========

मुख्य म्हणजे हिरवा रंग हा आरोग्य, शांती आणि सुरक्षितता याचं प्रतीक मानला जातो, तर निळा रंग विश्वास, एकाग्रता आणि स्थिरता दर्शवतो. रुग्णालयातील वातावरणात हे रंग रुग्णांवर आणि डॉक्टरांवर सकारात्मक मानसिक प्रभाव टाकतात. पूर्वी डॉक्टर पांढरे कपडे घालून सर्जरी करत असत. पण १९१४ साली एका प्रसिद्ध डॉक्टरने ऑपरेशनसाठी हिरवा रंग वापरला आणि त्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला. हळूहळू सगळ्यांनी ऑपरेशन थिएटरसाठी हिरवा आणि निळा रंग स्वीकारला. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.