आज दत्त जयंती असल्याने दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची विविध दत्त मंदिरांमध्ये एकच गर्दी झाली आहे. दत्त महाराजांच्या मुख्य मंदिरात जरी जाता येत नसले तरी भक्तांनी आपल्या गावात, शहरात, परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये जात स्वामींचे दर्शन घेतले असेल. दत्त म्हटले की, डोळ्यासमोर येते ती तिनं मस्तके असलेली लोभस सुंदर मूर्ती. म्हणूनच दत्तला त्रिमूर्ती असे देखील म्हटले जाते. हेच दत्तांचे मुख्य स्वरूप आहे. मात्र यासोबतच एकमुखी दत्त देखील खूपच प्रसिद्ध आहे. देशात एकमुखी दत्ताची अनेक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. (Datta Jayanti)
एकमुखी दत्त देखील दत्ताचे खूपच प्रसिद्ध रूप मानले जाते. याच एकमुखी दत्ताची अनेक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. यातलेच एक महत्त्वाचे प्रसिद्ध मंदिर म्हणजे नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठी वसलेले एकमुखी दत्त मंदिर. नाशिकमधील रविवार कारंजा येथील गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर ‘प्रति गाणगापूर’ अशी ओळख असलेले एकमुखी दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर साधारणतः ३५० वर्षें जुने असल्याचे सांगितले जाते. अहिल्यादेवी होळकर पूल आणि यशवंत महाराज मामलेदार समाधीपासून जवळच मंदिराचे स्थान आहे.(Marathi)
नाशिकडमधील एकमुखी दत्त मंदिर हे जागृत देवस्थान असून एखाद्या व्यक्तीला कसलीही बाधा झाली असेल, तर या एकमुखी दत्ताची उपासना केल्यावर ती निघून जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराची देखील एक कथा सांगितली जाते. नाशिकमधील सदगुरु बर्वे महाराज हे दत्त भक्त होते. त्यांची दत्त भगवंतावर अपार श्रद्धा होती. ते उपासक होते. एकदा त्यांना स्वप्नात दत्त भगवंतांचा दृष्टांत झाला आणि ते गोदावरीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांच्या हातात शालूकामय मूर्ती आली. त्यांनी त्या मूर्तीची स्थापना गोदावरी किनारी असलेल्या एका मठात केली. कालांतराने त्याचे भव्य मंदिरात रूपांतर झाले. (Todays Marathi Headline)

अनेक वर्षे दत्त चरणी सेवा केल्यानंतर सद्गुरू बर्वे महाराज याच दत्त मंदिराशेजारी समाधीस्थ झाले. या मंदिरात दत्तसंप्रदायातील अनेक साधू-संत, थोर व्यक्ती दर्शनास येऊन गेल्याचे जुन्या कागदपत्रांत उल्लेख सापडतात. सद्गुरू रामचंद्र महाराज बर्वे यांनी २०० वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. गोदा घाटाकडून पायऱ्या चढून मंदिर प्रवेश करताना एकमुखी दत्त मंदिराची कमान लागते. या कमानीच्या दोन्ही बाजूला रक्षकांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. एकमुखी दत्ताचे मंदिर छोटेखानी व मातीचे असून गर्भगृह व सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहातील एकमुखी दत्तात्रयाच्या मूर्तीला सहा हात आहेत. त्यांत कमळ, त्रिशूळ, शंख, चक्र, रुद्राक्षांच्या माळा आहेत. दत्तमूर्तीच्या बाजूला अनुसया आणि महालक्ष्मी या देवींच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहात चांदीचे नक्षीकाम असून मंदिराला छोटासा कळस आहे. (Top Marathi News)
मंदिराशेजारी औदुंबर वृक्ष आहेत. तसेच गणपती, राम, मारुती, काळभैरव, सप्तशृंगीमाता यांची छोटी मंदिरे आहेत. याशिवाय येथे अनेक साधू-संतांच्या समाध्या आहेत. येथे दरवर्षी गुरुप्रतिपदा मोठ्या उत्साहात साजरी होते. त्यावेळी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते. या दिवशी निघणाऱ्या पालखी सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती असते. दत्त जयंतीनिमित्त दहा दिवस येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. (Latest Marathi Headline)
========
Datta Jayanti : ‘दत्त’ नावाची उत्पत्ती कशी झाली?
Shri Datta : दत्तात्रेयांच्या प्रतिमेतील प्रत्येक गोष्टीला आहे खास मतितार्थ, जाणून घ्या त्याबद्दल
========
लघुरुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण, विश्वकल्याणार्थ श्री दत्तयाग, श्री दत्तयाग पूर्णाहुती, श्री सत्यदत्त महापूजा आदींचा समावेश असतो. या मंदिराला गुरू-शिष्याची म्हणजेच गादी परंपरा आहे. वामन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांची सातवी पिढी मयूरेश बर्वे हे सध्या या मंदिराचा संपूर्ण कारभार बघत आहेत. अनेक भाविकांनी आपल्या इच्छा श्री दत्त महाराजांसमोर मांडल्या आणि त्या पूर्ण झाल्या. म्हणूनच हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
