Home » Health : श्री दत्तात्रेयांना आवडणारी घेवड्याची भाजी आहे आरोग्यसाठी लाभदायक

Health : श्री दत्तात्रेयांना आवडणारी घेवड्याची भाजी आहे आरोग्यसाठी लाभदायक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आज श्री सद्गुरू दत्त महाराजांची जयंती अर्थात मार्गशीर्ष पौर्णिमा. आजच्याच दिवशी अत्री ऋषी आणि देवी अनुसूया यांच्या घरी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेल्या दत्तात्रेयांचा जन्म झाला. आजचा दिवस दत्त संप्रदायातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे पूजा केली जाते, गुरुचरित्राच्या परायणाची समाप्ती होते यानंतर दत्त महाराजांना नैवेद्य दाखवला जातो. यात खासकरून बनवली जाते. महाराजांच्या आवडीची घेवड्याची भाजी. धार्मिक मान्यतेनुसार दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच आज नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी आणि शिरा विशेषकरून बनवला जातो. (Health)

मात्र बहुतकरून लोकांना ही घेवड्याची भाजी भाजी मन घालून आवडत नाही. घेवडा म्हटले की बऱ्याच लोकांच्या कपाळावर आठ्या येतात आणि नाक मुरडले जाते. पण ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. आजच्या दिवशी बनवली जाणारी घेवड्याची भाजी आपण सर्वांनी जर नियमित खाल्ली तर आपल्या आरोग्याला याचे अनेक फायदे होतात. स्ट्रिंग बीन्स, फ्रेंच बीन्स आणि स्नॅप बीन्स अशा बीन्सच्या वेगवेगळ्या जाती आहेत. घेवड्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे घेवडा खाल्ल्यास आरोग्य उत्तम राहते. जाणून घेऊया ही घेवड्याची भाजी खाण्याचे फायदे. (Datta Jayanti)

घेवड्यात व्हिटॅमिन ए, सी आणि के मुबलक प्रमाणात असते. याशिवाय घेवडा फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. हिरवा घेवडा खाल्ल्याने पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राहते. हिरवा घेवडा खाल्ल्याने पचनसंस्थेचं आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदानुसार, घेवडा पित्त आणि कफ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीदेखील केला जातो. ह्याचा वापर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी देखील केला जातो. (Todays Marathi Headline)

Health

घेवड्यात फायबर्स असतात, जे पचनक्रियेला मदत करतात. फायबर्स ह्यामुळे शरीरातील अवांछित पदार्थ सहजपणे बाहेर जातात आणि पचन प्रक्रिया सुधारते. शिवाय घेवड्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. घेवड्यात कमी कॅलरी आणि उच्च फायबर्स असतात, जे वजन कमी करण्यास मदत करू शकतात. फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे, अधिक खाण्याची इच्छा कमी होते. (Latest Marathi News)

हिरव्या घेवड्यात व्हिटॅमिन के मुबलक असतं. तसेच हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि कोणत्याही कारणामुळे फ्रॅक्चरची जोखीम कमी होते. हिरवा घेवडा नियमित खाल्ला तर पोटाचे आरोग्य चांगले राहते. हिरव्या घेवड्यामध्ये कॅरोटिनॉइड्स आणि ल्यूटिन आणि जॅक्सेन्थिन या घटकांमुळे दृष्टी सुधारते. याचा फायदा डोळ्यांसाठी खूप होतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी नियमित घेवडा खाणे लाभदायक आहे. हिरवा घेवडा त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी असतो. यामुळे नखे मजबूत होतात. (Marathi Top Headline)

घेवड्याच्या भाजीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे रक्तातील शर्करा पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते. घेवड्यात असलेली फायबर्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी लाभकारी असतात. ते हृदयरोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात. घेवड्यात अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन C चांगल्या प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत करतात. हे जंतुसंसर्ग आणि इन्फेक्शन्सपासून शरीराचे संरक्षण करते. (Top Trending News)

=========

Datta Jayanti : ‘दत्त’ नावाची उत्पत्ती कशी झाली?

Shri Datta : दत्तात्रेयांच्या प्रतिमेतील प्रत्येक गोष्टीला आहे खास मतितार्थ, जाणून घ्या त्याबद्दल

========

घेवड्यात चांगल्या प्रमाणात पोटॅशियम आढळून येतं. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. पोटॅशियममुळे रक्तातल्या सोडियमचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची नियंत्रित राहून हृदयविकारांचा धोका कमी होतो. घेवड्यामध्ये असलेले पोषक घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. घेवड्याची भाजी ही महिलांसाठी कोणत्या वरदानापेक्षा किंवा अमृतापेक्षा कमी नाहीये. घेवड्यात आयसोफ्लाव्होन असतात. ज्यामुळे इस्ट्रोजेनचं उत्पादन कमी व्हायला मदत होते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.