दत्त प्रभू यांची आज जयंती आहे. दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला साजरी करण्यात येते. हा दिवस भगवान दत्तात्रेय यांच्या जन्मदिवस आहे. यावर्षी ४ डिसेंबर गुरुवार रोजी दत्त जयंती आल्याने तिला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण गुरुवार हा दत्तगुरुंचाच वार समजला जातो. याच गुरुवारी दत्त जयंती आल्याने तिचे महत्त्व वाढले आहे. दत्त जयंतीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागात दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पण, त्या पैकी काही विशेष आणि पुरातन ठिकाणी भक्तांची गर्दी जास्त असते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्त मंदिराविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. (Datta Maharaj)
दत्तशिखर
माहूर गडावर दत्तात्रेयांचा जन्म झाला. तेथेच एका शिखरावर दत्तात्रेयांचे वास्तव्य होते. यालाच दत्तशिखर असे म्हटले जाते. रेणुकेच्या शिखरावरुन पूर्वेकडे दोन-तीन मैलांच्या दत्तशिखर आहे. येथील दत्तमंदिर हे प्राचीन असून जुन्या बांधणीचे आहे. श्रीदत्ताचे मुख्य दर्शन एका खोल अशा अंधार्या खोलीतून केले जाते. या अंधार्या खोलीत दत्तांच्या पादूका व शिवलिंग आहे. मंदिरात सती अनसूया, विठ्ठल, रखूमाई या देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात श्रीलक्ष्मी- नारायणाचे मंदिर असून त्याच्या मागच्या बाजूस दत्ताचे धूनाधरही आहे. दत्त शिखरापासून एक मैल अंतरावर सती अनसूया मातेचे शिखर आहे. याच ठिकाणी दत्तात्रेयांचा अवतार झाला आहे, असे म्हणतात. (Datta Jayanti)

श्री क्षेत्र प्रयाग, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात, वेदगंगा नदीच्या तीरावर ‘गुप्त सरस्वती’ या ठिकाणी हे देवस्थान आहे, असे मानले जाते. हे एक महत्त्वाचे देवस्थान आहे, जिथे ‘गुप्त सरस्वती’ नदीजवळ दत्त प्रभूंचा वास असल्याचे मानले जाते. गुप्त सरस्वती म्हणजे ही एक नदीचे आहे. त्या ठिकाणी दत्ताची पूजा केली जाते. या ठिकाणी पाच नद्यांचा संगम आहे. त्यात कासारी, भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी या नद्यांचा समावेश आहे. श्री क्षेत्र प्रयाग येथे १४ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान मोठी यात्रा असते. येथील नद्यांच्या संगमतील पाण्याने अंघोळ करण्यासाठी तिथे भक्तांची मोठी गर्दी असते. (Todays Marathi Headline)

श्री क्षेत्र दत्त मंदिर, रावेर
रावेर येथे श्रीदत्त जयंतीनिमित्त सुमारे २०० वर्षाची अखंड परंपरा असलेला श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव साजरा करण्यात येते. याठिकाणी स्वामी सच्चिदानंद महाराजांनी वयाच्या १०८ व्या वर्षी श्री दत्त मंदिरातच संजीवन समाधी घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक हे मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा अती प्राचीन आहे. इतरही अनेक लोकांची समाधी त्या ठिकाणी आहे. या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो, की संत दत्त महाराज ऊर्फ सच्चिदानंद बाबा यांनी एकोणिसाव्या शतकात, १८३३ मध्ये या मंदिराची स्थापना केली. या मंदिरासाठी त्यांनी बऱ्हाणपूर येथील एका जुन्या किल्ल्यातील लाकडे विकत आणली होती. त्याच प्रमाणे एका कासारास पंचधातूचे प्रमाण सांगून त्याच्याकडून १७ इंच उंचीची दत्तमूर्ती घडवून घेतली होती. (Top Marathi Headline)

एकमुखी दत्त, नाशिक
नाशिकमधील रविवार कारंजा येथील गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर ‘प्रति गाणगापूर’ अशी ओळख असलेले एकमुखी दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर साधारणतः ३५० वर्षें जुने असल्याचे सांगितले जाते. अहिल्यादेवी होळकर पूल आणि यशवंत महाराज मामलेदार समाधीपासून जवळच मंदिराचे स्थान आहे. हे जागृत देवस्थान असून एखाद्या व्यक्तीला कसलीही बाधा झाली असेल, तर या एकमुखी दत्ताची उपासना केल्यावर ती निघून जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Latest Marathi News)

श्री क्षेत्र नृसिंहवाडी
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दत्तात्रेय देवस्थान म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी ओळखले जाते, जेथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम होतो. हे ठिकाण श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे प्रमुख स्थान मानले जाते आणि ‘दत्त संप्रदायाची पंढरी’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आहे. (Top Trending News)

========
Datta Jayanti : ‘दत्त’ नावाची उत्पत्ती कशी झाली?
Shri Datta : दत्तात्रेयांच्या प्रतिमेतील प्रत्येक गोष्टीला आहे खास मतितार्थ, जाणून घ्या त्याबद्दल
========
श्री क्षेत्र औदुंबर
श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन १४४१मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दत्तक्षेत्र श्री क्षेत्र औदुंबर आहे. हे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चातुर्मासामुळे या स्थळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. औदुंबर वृक्षाला ‘कल्पवृक्ष’ मानले जाते आणि येथील पादुकांना ‘विमल पादुका’ म्हणतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
