उद्या दत्त जयंती असल्याने घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये दत्त जयंतीची जोरदार तयारी सुरु असेल. महाराजांच्या पूजेची सर्व एव्हाना झालीच असले. मात्र आता पूजेनंतर महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा असा प्रश्न पडला असेल? याच प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. श्री दत्त गुरूंना घेवडा अतिशय प्रिय आहे. बऱ्याच घरांमध्ये दर गुरुवारी आणि दत्त जयंतीला खास घेवड्याची भाजी बनवली जाते. या घेवड्याच्या वेलासंदर्भात श्री गुरुचरित्रात आलेली कथा आता अनेक ठिकाणी घेवड्याला वालाची भाजी असे देखील म्हटले जाते. त्यामुळे उद्याच्या नैवेद्यात महाराजांसाठी घेवड्याची भाजी नक्की करा. याच घेवड्याच्या भाजीची रेसिपी आणि श्री गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायात घेवड्याच्या शेंगांची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घेवड्याच्या भाजीसोबत सद्गुरूंना शिरा देखील आवडायचा त्यामुळे उद्या प्रसादामध्ये गोड शिरा देखील नक्की करा त्याची देखील सोपी रेसिपी आम्ही देत आहोत. (Datta Jayanti)
घेवड्याच्या शेंगांची कथा
कृष्णापंचगंगा संगमावरील अमरापूर येथे एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण कुटुंबासमवेत राहत होता. या ब्राह्मणाच्या घराजवळ एक घेवड्याच्या शेंगांचा वेल होता . काही भिक्षा न मिळाल्यास त्या वेलावरील घेवड्याच्या शेंगांची भाजी हेच त्यांच्या क्षुधातृप्तीचे साधन होते . निष्कांचन अशा स्थितीत देखील हे कुटुंब अतिथी सत्कारात तत्पर असे. एकदा श्रीगुरुमहाराज त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मण स्त्रीने घरात इतर काही नसल्याने त्यांना घेवड्याच्या शेंगाची भाजी भिक्षा म्हणून वाढली .महाराजांनी ‘तुझे दारिद्र्य गेले’ असा आशीर्वाद दिला. परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा वेल मुरडून टाकला. (Marathi News)
श्रीगुरुमहाराजांनी घेवड्याचा वेल मुरडून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत म्हणाली, “अहो काय आमचे दुर्दैव !” मात्र, त्या ब्राम्हणाची स्वामींवर दृढ श्रध्दा होती. त्यामुळेच उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन नष्ट झाल्यानंतरही त्याचे चित्त शांत होते. तो ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला, “सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते. जे पेरावे तेच उगवते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. ” घेवड्याच्या वेलाचे मूळ पायी लागू नये म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली व मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य ! वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनकुंभ सापडला. गुरूंवर असलेल्या विश्वासामुळेच त्याला त्याच्या गुरूने भेट दिली होती. (Todays Marathi Headline)

घेवड्याच्या भाजीची रेसिपी
साहित्य
घेवड्याच्या शेंगा, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची पेस्ट, हळद, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, दाण्याचा कूट
कृती
सर्वात आधी घेवड्याच्या शेंगा स्वच्छ करून, धागे काढून बारीक चिरा. आता कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे तडतडल्यावर हिंग, कढीपत्ता घाला. आता हळद आणि मिरची पेस्ट घालून परतून घ्या. चिरलेला घेवडा आणि मीठ घालून मिसळा.आता चिंचेचा कोळ आणि गूळ घालून, घट्ट झाकण ठेवून वाफेवर शिजवा. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी शिंपडा. शेवटी दाण्याचा कूट घाला. चला तर तयार घेवड्याची भाजी, नैवेद्यात ठेवा. (Top Marathi Headline)
______________________________________________________________________________________________________________________________________
रव्याचा शिरा
साहित्य
१ कप रवा, १/२ कप गरम दूध, १/२ कप तूप, १ कप साखर, काजू, मनुका, वेलची पावडर, गरम पाणी
कृती
एका पॅनमध्ये १/२ कप तूप गरम करत ठेवा. तुपामध्ये एक कप रवा घालावा. गॅसच्या मध्यम आचेवर रवा दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्या. रव्याचा रंग बदलल्यानंतर त्यात १/२ कप दूध मिक्स करावे. रवा आणि दुधाचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यात अडीच कप पाणी आणि साखर घालावी. सर्व सामग्री ढवळत राहा म्हणजे मिश्रण पॅनला चिकटणार नाही. यानंतर मिश्रणात काजूचे काप आणि मनुके घालावे. चिमूटभर वेलची पावडर देखील मिक्स करावी. तयार झाला आहे गोडाचा शिरा. (Latest Marathi News)

______________________________________________________________________________________________________________________________________
गव्हाच्या पिठाचा शिरा
साहित्य
गव्हाचे पीठ (कणिक): १ वाटी, साखर: ¾ वाटी (किंवा चवीनुसार), तूप: ½ वाटी, पाणी: २ वाट्या, वेलची पावडर, काजू, बदाम, मनुके, केशर
कृती
एका कढईत किंवा जाड बुडाच्या भांड्यात मध्यम आचेवर तूप गरम करा. त्यात काजू, बदाम आणि मनुके घालून हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. बाजूला काढून ठेवा. त्याच तुपात गव्हाचे पीठ घाला. मंद आचेवर सतत ढवळत पीठ खमंग आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. पीठ भाजताना खमंग वास येईल आणि पीठ तुपातून तेल सोडेल. याची काळजी घ्या की पीठ जळणार नाही. दुसऱ्या भांड्यात २ वाट्या पाणी उकळत ठेवा.
भाजलेल्या पिठात हळूहळू गरम पाणी घाला आणि सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. पाणी पूर्ण मिसळल्यानंतर साखर घाला आणि पुन्हा नीट ढवळा. साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर शिजवत राहा. शिरा घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात वेलची पावडर आणि भिजवलेले केशर घाला. तळलेले काजू, बदाम, आणि मनुके घालून मिसळा. शिरा तूप सोडू लागला की गॅस बंद करा. (Top Trending News)
______________________________________________________________________________________________________________________________________
========
Datta Jayanti : दत्तात्रेय महाराजांनी केले होते २४ गुरु; प्रत्येक गुरूकडून घेतला होता एक गुण
========
गव्हाच्या पिठाचा गुळाचा शिरा
साहित्य
¾ कप गव्हाची कणिक, ½ कप तूप, ½ कप गूळ पावडर, ३-४ पिस्ता आणि बदामाचे काप, चिमूटभर वेलची पावडर, 1 ग्लास पाणी
कृती
एका पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. त्यात गव्हाचं कणिक घाला. दोन्ही सामग्री नीट मिक्स करून घ्या. आता पाणी घालून हे मिश्रण ४ ते ५ मिनिटे शिजवावे. नंतर मिश्रणात गूळ पावडर घालून ढवळत राहा.स्टेप ३: मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात पिस्ता आणि बदामाचे काप घालावे. चिमूटभर वेलची पावडर देखील टाकावी. सर्व सामग्री पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्या. तयार झालाय गुळाचा कणकेचा शिरा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
