आपण जर दक्षिण भारतात पाहिले तर तिथे घरी हॉटेलमध्ये कायम जेवण हे केळीच्या पानावरच वाढले जाते. मग श्रीमंत असो किंवा गरीब दक्षिण भारतात सर्वांच्याच घरी आजही केळीच्या पानात जेवले जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील नेहमी नाही, मात्र सणासुदीला, खास कार्यक्रमांना आवर्जून केळीच्या पानावर जेवण वाढले जाते. देवाला देखील याच केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो. शिवाय अनेक पदार्थ याच केळीच्या पानामध्ये ठेऊन तयार केले जातात. थोडक्यात काय तर केळीच्या पानावर जेवण करण्याला आजही फार महत्त्व दिले जाते. (Health Care)
आज जिथे आपण जवळपास सर्वच पाश्चिमात्य गोष्टी आत्मसाद करत असताना केळीच्या पानावर जेवणाची सवय मात्र बदललेली नाही. केळीच्या पानावर नैवेद्य दाखवणे याला जरी धार्मिक महत्त्व असले तरी केळीच्या पानावर जेवणाला मात्र आरोग्यदायी महत्त्व आहे. केळीचे झाड धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचे मानले जाते. काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो. केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते. भगवान विष्णूंचा वास असलेल्या या झाडाच्या पानात जेवणाचे अनेक मोठे फायदे आहेत. (Banana Leaves)
केळीच्या पानांवर गरम जेवण दिले जाते. त्यामुळे पानांमध्ये असलेले पोषक द्रव्ये अन्नात उपलब्ध होतात. या पानांवरील मेणासारखा लेप केवळ पदार्थांनाच चव देत नाही, तर पाने स्वच्छ करणे देखील सोपे करते आणि त्यामुळे घाण आणि धूळ चिकटण्यापासून प्रतिबंधित होते. केळीमध्ये असलेले घटक आरोग्यास लाभ देतात. केळी खाल्ल्याने जे फायदे होतात तेच फायदे केळीच्या पानांवर ठेवलेले अन्न खाल्ल्यानेही मिळते. एवढेच नाही तर केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. केळीच्या पानावर अन्न ठेवल्यावर यातील काही पोषक घटक अन्नामध्ये हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. (Todays Marathi News)

केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. केळीच्या पानांत पॉलिफेनॉल असतं हे पचनासाठी चांगले असते. पोटाचे आरोग्य, पचनक्रिया सुरळीत ठेवायचं असेल तर केळीच्या पानांत जेवण करा. केळीचे पान जिवाणू नष्ट करण्यास मदत करतात. केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. जर एखाद्या पदार्थामुळे आपल्याला आजार होणार असेल तर तशी शक्यता कमी होते. रोज केळीच्या पानावर जेवण केल्याने केस स्वस्थ राहतात. चेहऱ्यावरील पुरले फोडे दूर होतात. पोटाशी संबंधित सर्व आजार दूर राहतात. केळीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सीडेंट असतात, जे पालेभाज्यांमध्ये असतात. जो फायदा केली खाल्याने होतो, तोच फायदा केळीच्या पानांवर जेवल्यानेही मिळतो. (Latest Marathi Headline)
भारतात, विशेषतः दक्षिण भारतात, केळीच्या पानावर जेवण वाढण्याची परंपरा अजूनही पाळली जाते. ही परंपरा धार्मिक कार्य, सण आणि समारंभांमध्ये विशेष स्थान राखते. केळीचे पान शुद्धतेचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच नैवेद्यासाठी त्याचा वापर अधिक पवित्र मानला जातो. केळीच्या पानावर वाढलेल्या अन्नाला एक वेगळा स्वाद प्राप्त होतो. काही खास पदार्थ, जसे की मोदक, इडली, पातोळ्या, अळुवड्या, नेवऱ्या किंवा कोथिंबीर वड्या; केळीच्या पानात वाफवले की त्यांची चव अधिक खुलते. (Top Marathi News)
केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात ‘एपिगालोकेटचीन गलेट’ आणि इजीसीजीसारखे ‘पॉलिफिनोल्स अँटिऑक्सीडेंट’ आढळतात. याच पानांमार्फत अँटिऑक्सीडेंट आपणास मिळतात. यामुळे त्वचा दिर्घकाळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते. मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोपे जाते. केळीचे पान सात्विक असल्याने जेवणाऱ्या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्विकता २ टक्के वाढू शकते. केळीच्या पानातील चैतन्यामुळे शरीराची शुद्धी होते. (Top Trending Headline)
बऱ्याच समारंभामध्ये किंवा घरामध्ये अधिक पाहुणे आले की त्यांनी प्लास्टिकच्या प्लेटमध्ये जेवण वाढलं जातं. किंवा स्टायरोफोम प्लेटचा देखील यासाठी वापर केला जातो. पण या प्लेट्सचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच प्लास्टिकसारख्या प्लेटचा वापर केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणं कठीण होऊन जातं. म्हणूनच पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही केळीच्या पानांचा वापर सहज करू शकता. केळीच्या पानामध्ये जेवल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे इतर प्लेटच्या तुलनेमध्ये अधिक सोपे असते. (Top Stories)
========
Blood Sugar : अचानक कमी होणारे शुगर लेवल कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांचे महत्त्वाचे इशारे
Health Care : व्यायाम केल्याने लवकर वजन कमी होते असे मानता? आधी वाचा या गोष्टी
========
जेव्हा आपण प्लास्टिक, स्टील किंवा अन्य धातूंच्या ताटात जेवतो, तेव्हा त्यातले रासायनिक घटक अन्नात मिसळले जाण्याचा धोका असतो. मात्र जेव्हा आपण केळीच्या पानावर जेवतो, तेव्हा असे रासायनिक घटक अन्नपदार्थात मिसळण्यापासून बचाव होतो. त्यामुळे आपला आहार अधिकच पौष्टिक होतो. केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात जे अन्नातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने रोगांचा धोका कमी होतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
