अगणित मंदिराचा देश असलेल्या भारतात नानाविध परंपरांची, रीतींची, देवांची, लहान मोठी अशी भरपूर मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. असंख्य मंदिरं असून देखील प्रत्येक मंदिराने आपली वेगळी ओळख जपली आहे. असेच एक कृष्णाचे मंदिर आहे, जिथे देवाला चक्क अफू अर्पण केला जातो. एवढेच नाही तर देवासोबत बिजनेस डील केली जाते आणि देवाला प्रॉफिट देखील दिले जाते. आता हे ऐकून तुम्हाला वाटले असेल की, हे मंदिर नक्कीच कोणत्यातरी बिजनेसमॅनच्या घरातील असावे. मात्र असे नाही हे मंदिर आहेत भारतातील राजस्थान या राज्यात. (Temple)
राजस्थानमधील मेवाड प्रांतातील चित्तोडगढच्या मंडफिया गावामध्ये श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर आणि आकर्षक मंदिर आहे. या मंदिराला श्री सांवरिया मंदिर म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे आपण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला साकडे घालतो, नवस करतो. मात्र या मंदिरात देवाला इच्छापूर्तीसाठीच नवसच केला जातो, मात्र त्याबदल्यात देवाला बिजनेसमध्ये पार्टनर करून घेतले जाते किंवा देवाला प्रॉफिट शेयर ऑफर केला जातो. ऐकून नवल वाटले असेल ना…? मात्र हे खरे आहे. आज आपण याच अनोख्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. (Rajasthan)
या मंदिराबद्दल एक आख्यायिका खूपच प्रसिद्ध आहे. खूप वर्षांपूर्वी मेवाडमधील बागुंड गावात एक गरीब गुराखी राहत होता. तो कष्टाळू होता, पण नशीब अस्थिर होते. एका रात्री त्याला स्वप्न पडले की, गावाच्या गोठ्यात जमिनीखाली तीन दिव्य मूर्ती गाडलेल्या आहेत. सकाळी त्याने त्या खोदण्याचा निर्णय घेतला. नांगरणी करत असताना अचानक जोरात आवाज झाला. जेव्हा त्याने माती काढली तेव्हा, तिथे भगवान श्रीकृष्णाच्या तीन सुंदर, हसऱ्या आणि काळ्या रंगाच्या मूर्ती त्याला दिसल्या, जसे त्याने स्वप्नात पाहिले होते. मात्र शेतकरी याने प्रभावित झाला नाही. त्याच रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले की, काळ्या रंगाचा कृष्ण त्याच्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला, ‘घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. उद्या तुझे नशीब बदलेल.’ दुसऱ्याच दिवशी चमत्कार सुरू झाले. शेतात पाण्याचा झरा दिसला, पीक दुप्पट झाले आणि गावकरी मदतीसाठी पुढे आले. अशाप्रकारे त्याच्या घरी समृद्धी परतली. (Todays Marathi News)
यावेळी परिसरात तीन चोरीला गेलेल्या कृष्ण मूर्तींची चर्चा होती. जेव्हा लोकांनी मूर्ती पाहिल्या तेव्हा त्यांना समजले की, त्या हरवलेल्या मूर्ती आहेत, ज्या चोरांनी लपवल्या होत्या. वडीलधारे लोक म्हणाले की, काळ्या रंगाच्या या श्री कृष्णाच्या मूर्ती स्वतःहूनच इथे आल्या होत्या आणि आता त्या येथेच राहतील. यापैकी एक मूर्ती मांडफिया येथे, दुसरी भडासोडा येथे आणि तिसरी बागुंड छापर येथे स्थापित करण्यात आली होती. आज ही सर्व मंदिरे एकमेकांपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आसपासच्या परिसरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. लोक त्यांना सावलिया सेठ म्हणून संबोधतात. (Marathi News)

या मंदिराबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. मेवाडचा शासक राणा संग्राम सिंह यांचा बाबरशी युद्धानंतर १५८४ मध्ये मृत्यू झाला. तसेच संत मीराबाईचा पती भोजराजही लग्नानंतर केवळ आठ वर्षे जगला. तिच्या आई-वडिलांचेही निधन झाले आणि मीराबाई एकटी राहिली. तसेच त्या वेळी ऋषी-मुनींचा समूह देशाच्या विविध भागांत फिरत मेवाड भागात आला. या ऋषी-मुनींजवळ गिरधर गोपाळ श्री सावरियाजींच्या चार मूर्ती होत्या. या मूर्तींची दररोज संपूर्ण धार्मिक विधी करून पूजा केली जात होती आणि भजन आणि कीर्तन केले जात होते. (Top Stories)
या श्री सांवरियाजींच्या चार मूर्तींपैकी एक छोटी मूर्ति ने मीराबाईचे मन आकर्षित केले. त्या या देखण्या श्री सांवरियाजींच्या मूर्तीला पाहतच राहिल्या. तसेच मीराबाई तिची वीणा वाजवायची, नाचायची आणि भजने व कीर्तन गात गायची. नंतर ती वृंदावनला गेली. तिथे भक्तीचा प्रसार करीत नंतर द्वारका येथे गेली जिथे भक्तीचा प्रवाह वाहत ती भगवान श्री द्वारकाधीशमध्ये विलीन झाली. (Latest Marathi Headline)
तसेच चमत्कारिक मूर्ती म्हणून लोकांमध्ये ती स्वीकारली जाऊ लागली. दिवसेंदिवस प्रभू श्री सांवरियाजींच्या दर्शनासाठी भक्तांची संख्या वाढत असताना गावातील मंडफिया व आजूबाजूच्या सोळा गावांतील प्रमुख भाविकांशी चर्चा करून ही चमत्कारिक मूर्ती भक्त भोलीराम गुर्जर यांच्या ओसरीतून काढण्यात आली व पूजा केल्यानंतर भक्त भोलीरामच्या घराजवळ मातीचे मंदिर बांधून त्याची स्थापना करण्यात आली. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. (Top Marathi NEws)
गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, श्री सांवरिया सेठ प्रत्येक भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. सामान्य भक्तांसोबत अफू तस्कर देखील सावलिया सेठचे भक्त आहेत. अफू तस्करांसाठी तर श्री सांवरिया सेठ जीव की प्राण आहे. हे तस्कर लोकं त्यांचे तस्करचे मोठमोठे सामान पाठवण्यापूर्वी मंदिरात येतात नमस्कार करतात आणि त्यांच्या कमाईचा काही भाग देवाला अर्पण करतात. दर महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी, जेव्हा दानपेटी उघडली जाते तेव्हा पैशासोबत या पेटीमधून अफू देखील सापडतो. अफूला ‘काळे सोने’ म्हटले जात असल्याने, लोक श्री सांवरिया सेठला काळ्या सोन्याचा देव देखील म्हणतात. (Top Marathi News)
=========
Datta Jayanti : दत्त परिक्रमा म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्त्व
=========
श्री सांवरियाजी सेठ मंदिरामध्ये वर्षभर विविध पारंपरिक धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते. मुख्यता जन्माष्टमी, एकादशी, दिवाळीनिमित्त तीन दिवसीय भव्य जत्रेचे आयोजन केले जाते आणि विविध एकादशी, होळी, शरद पौर्णिमा, वसंत पंचमी महाशिवरात्री इत्यादी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्री सांवरिया सेठ यांची दानपेटी उघडली जाते. तसेच दर महिन्याच्या अमावस्येला महाप्रसाद भक्तांना वाटला जातो. राजस्थानमधील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून देखील श्री सांवरिया सेठ मंदिराचा नावलौकिक आहे. जर तुम्हाला देखील या मंदिरात जायचे असेल तर राजस्थानच्या चित्तौगढ किंवा उदयपुर येथे आधी यावे लागेल. तिथून श्री सांवरिया सेठ मंदिर मंडफिया करिता बस किंवा टॅक्सीने जावे लागते. (Top Stories)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
