Home » Champashashti : नऊ लाख पायऱ्या असलेली खंडोबाची ‘सोन्याची जेजुरी’

Champashashti : नऊ लाख पायऱ्या असलेली खंडोबाची ‘सोन्याची जेजुरी’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Champashashti
Share

मार्गशीर्ष महिन्यातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे ‘चंपाषष्ठी’. यादिवशी कांदा आणि वांग्यापासून बनवलेले पदार्थ खंडोबाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. खंडोबा हे भगवान शंकराचेच रूप मानले जाते. चंपाषष्ठीचा उत्सव मार्गशीर्ष अमावास्येपासून सुरु होऊन मार्गशीर्ष षष्ठीला संपतो. या सहा दिवसांच्या काळात खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाचे मुख्य मंदिर किंवा मुख्य ठिकाण असलेल्या जेजुरी गडावर तुफान गर्दी असते. यादिवशी इथे लाखो भक्त देवाच्या दर्शनाला येतात. सोन्याची जेजुरी अशी ओळख असलेल्या जेजुरी गडावर खंडोबा अर्थात मल्हार यांचे मुख्य वास्तव आहे. (Marathi)

जेजुरी हे देवस्थान पुणे जिल्ह्यात आहे. इथे खंडोबाचे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे. खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत. या मंदिरात जेव्हा लग्नानंतर कुलदेवतेच्या दर्शनाला नवीन लग्न झालेली जोडपी येतात, तेव्हा पती पत्नीला उचलून घेतो आणि खंडोबाच्या नावाने भंडारा उधळून तिला घेऊन पायऱ्या चढतो. ही खूपच जुनी परंपरा आहे. आज काल लोकं पत्नीला घेऊन केवळ पाच पायऱ्या चढतात, मात्र काही जोडपे आजही ३९५ पायऱ्या चढून जातात आणि देवाचे आशिर्वाद घेतात. (Todays Marathi Headline)

जेजुरी गडाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा खंडोबा हा नवलाख पायरीचा अर्थात नऊ लाख पायऱ्या असलेल्या डोंगरावर विराजमान आहे असे म्हटले जाते. मात्र ही फक्त एक धारणा आहे. इथे कुठेही नऊ लाख पायऱ्या नाही. वास्तवात या गडावर जाण्यासाठी ३८५ पायऱ्या आहेत. या पायऱ्या बांधण्यासाठी ९ लाख दगड वापरण्यात आले होते. यामुळे याचा उल्लेख ९ लाख पायरी म्हणून केला जातो. म्हणजेच मंदिरात जाण्यासाठी ९ लाख नव्हे तर ३८५ पायऱ्या चढाव्या लागतात. या ३८५ पायऱ्या चढून वर गेल्यावर गडावर खंडोबाचे आकर्षक हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरात म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन मूर्ती आहेत. समोर मोठा सभामंडप आहे. तसेच या मंदिरात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन करुन ठेवलेल्या आहेत. या मंदिरात असलेली अतिशय जड मोठी पुरातन तलवार उचलण्याचा खेळ इथे दरवर्षी जल्लोषात खेळला जातो. तसेच तलवार जास्तीत जास्त वेळ उंच धरून ठेवणाऱ्याला बक्षिस दिले जाते. (Top Marathi News)

Champashashti

खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्याकाळात बांधले गेले. दगडी दीपमाळ आहेत. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचे प्रतिक आहे. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक समजले जाते. मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक आणि गाभार्‍यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते. जेजुरीगडावर असलेल्या या खंडोबा मंदिरात गुप्त शिवलिंग आहेत. वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. (Latest Marathi Headline)

जेजुरीच्या खंडोबाला पाच पत्नी असल्याचे सांगितले जाते. यातल्या दोन त्यांच्या मुख्य पत्नी होत्या. म्हाळसा ही त्यांची पट्टराणी होती, जी एका व्यापाऱ्याची मुलगी होती. त्यांची दुसरी पत्नी बाणाई किंवा बानू आहे. बानू ही धनगर समाजाची होती. वाघ्यामुरळीच्या गाण्यांमध्ये आणि काही लोक कथांमध्ये खंडोबाच्या एकूण पाच बायका असल्याचा उल्लेख येतो. यांमध्ये म्हाळसा आणि बानू यांच्याव्यतिरिक्त तीन बायकांचा समावेश होतो त्या म्हणजे फुलाई (माळीण/तेलीण), रंभाई (शिंपीण) आणि चंदाई (बागवानीण/मुस्लिम). (Top Trending Headline)

मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि देव मुटके, पुरणाचे ५ दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवळावे. शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या आणि औक्षण करावे. चंपाषष्ठीला नागदिव्यांचे महत्त्व आहे कारण ते घराच्या समृद्धी, सुख आणि शांततेसाठी करण्यात येते. (Top Stories)

========

Champashashti : मल्हार मार्तंडाचे नवरात्र आणि चंपाषष्ठीचे महत्त्व

Champashashti : जाणून घ्या चंपाषष्ठीला भरल्या जाणाऱ्या तळीचे महत्त्व

Champashashti : चंपाषष्ठी विशेष- महाराष्ट्रातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरं

========

खंडोबाची यात्रा चैत्र, पौष आणि माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा अशी ५ दिवस असते. तसेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या खंडोबाच्या ६ दिवसांच्या नवरात्रीच्या काळात, चंपाषष्ठीला आणि सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या काळात देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. जेजुरी गडावर कायम भाविक भंडारा आणि खोबऱ्याची उधळ करतात. त्यामुळे हा गड पूर्णपणे पिवळा होतो. म्हणूनच या गडाला ‘सोन्याची जेजुरी’ म्हटले जाते. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.