‘ही मॅन’ अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. संपूर्ण जगभरात धर्मेंद्र यांची फॅन फॉलोविंग आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या फॅन्समध्ये दुःखाचे वातावरण आहे. जवळपास ६० वर्ष धर्मेंद्र यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या ६० वर्षांच्या काळात त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मुख्य म्हणजे धर्मेंद्र यांचे मोजकेच काही सिनेमे वगळता सर्वच चित्रपट तुफान गाजले. जेव्हा जेव्हा धर्मेंद्र यांचा विषय निघतो, तेव्हा आपसूकच ओघाने एक नाव तोंडात येते आणि ते म्हणजे ‘शोले’. (Dharmendra)
हिंदी सिनेसृष्टीतील कल्ट मूवी म्हणून शोलेला ओळखले जाते. हा सिनेमा प्रदर्शित होऊन ५० वर्ष झाली असली तरीही आजही या सिनेमातील एक एक पात्र आणि एक एक संवाद आजही सगळ्यांना लक्षात आहे. अशा या सिनेमात धर्मेंद्र यांनी साकारलेली ‘वीरू’ ही भूमिका कमालीची गाजली. या सिनेमातील धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेले सीन देखील खूपच प्रसिद्ध झाले. याच सिनेमानंतर ते आणि हेमा मालिनी खूपच जवळ आले. या सिनेमाचे अनेक किस्से मीडियामध्ये प्रसिद्ध आहेत. (Top Marathi News)
धर्मेंद्र यांना शोले सिनेमामध्ये सुरुवातीला ठाकूरची भूमिका करायची इच्छा होती. मात्र वीरूची मस्ती, कॉमेडी, बिधास्तपणा, त्यांची आणि हेमा मालिनी यांची जोडी या कारणांमुळे धर्मेंद्र हे वीरू पात्र साकारण्यास तयार झाले होते. या सिनेमाच्या आधीपासूनच धर्मेंद्र हे हेमा मालिनीवर फिदा झाले होते. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना हेमाजींसोबत अधिक वेळ मिळू लागला. धर्मेद्र यांनी देखील या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हेमाजींसोबत वेळ घालवायची एकही संधी सोडली नाही. वीरु आणि बसंतीचा जेव्हा जेव्हा रोमॅंटिक सीन असायचा तेव्हा धर्मेंद्र युनिटमधील लोकांना पैसे देऊन रिटेक घ्यायला सांगायचे. शोले सिनेमाने धर्मेंद्र यांना हेमा मालिनी जीवनसाथी म्हणून दिल्या सोबतच अमिताभ बच्चन यांच्यासारखे मित्र देखील दिले. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन हे शोले सिनेमानंतर खूपच घट्ट मित्र झाले होते. (Marathi Latest Headline)

धर्मेंद्र यांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या आईचा एक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले की, त्यांची आई त्यांचे कपडे चोरून न्यायची आणि याची माहिती त्यांना नंतर मिळायची. धर्मेंद्र यांनी सांगितले होते की, “माझी आई अनेकदा माझे कपडे चोरुन न्यायची. मी सनीला विचारायचो की ही पॅन्ट कुठे आहे. त्यावर सनी मला म्हणायचा बीजी म्हणजेच आजी घेऊन गेली. यानंतर मी आईकडे जाऊन विचारायचो. तर त्यावर ती म्हणायची की तू इतक्या कपड्यांचे काय करणार आहेस?. त्यापेक्षा ते कपडे मी घेते. मात्र मला समजायचे नाही की, ती माझ्या कपड्यांचे नक्की करते तरी काय? नंतर मला समजले की, माझी आई माझे कपडे गावातील गरजू लोकांना देत असे. मी जेव्हा पंजाबमध्ये किंवा गावात इतर कुठेही जायचो, तेव्हा तिथले लोक मला भेटायचे आणि म्हणायचे की पाजी हा तुमचा कोट आहे. ही तुमची पँट आहे. हे पाहून मला माझ्या आईबद्दल खूपच अभिमान वाटायचा.” (Top Trending News)
========
Dharmendra : “ही-मॅन”ची एक्सिट; एका युगाचा अंत
Dharmendra : धर्मेंद्र यांच्याकडे आहे कोट्यवधी रुपयांची बक्कळ संपत्ती
========
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे नाते वेगळे सांगायची गरज नाही. अनेकदा बॉलिवूड कलाकारांना अंडरवर्ल्ड कडून धमक्या येण्याबद्दल आपण ऐकले आहे. अशीच एक धमकी धर्मेंद्र यांना देखील आली होती. धर्मेंद्र यांचा अंडरवर्ल्डमधल्या लोकांशी वाद झाला होता. पण त्यांचे कुटुंब अंडरवर्ल्डपासून कधीच घाबरलं नाही. सत्यजीत पुरी यांनी यावर बोलताना सांगितले होते की, “त्या काळात अंडरवर्ल्ड खूप मजबूत होतं. जेव्हा अंडरवर्ल्ड एखाद्या अभिनेत्याला फोन करायचं, तेव्हा ते घाबरायचे. पण धरमजी आणि त्यांचं कुटुंब त्यांना कधीच घाबरलं नाही.” धर्मेंद्र यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांना सांगितले होते, “जर तुम्ही आलात, तर संपूर्ण साहनेवाल पंजाबमधून येईल. तुझ्याकडे १० लोक आहेत, पण माझ्याकडे एक सैन्य आहे. मी एकदा बोललो की, ट्रक भरून पंजाबमधून लढायला येतील. माझ्याशी पंगा घेऊ नको.” आणि त्यानंतर त्यांनी कधीच धर्मेंद्र यांच्याशी पंगा घेतला नाही. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
