उद्या अर्थात २५ नोव्हेंबर रोजी सर्वत्र ‘विवाह पंचमी’चा उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे. विवाह पंचमी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते. मान्यतेनुसार या दिवशी राम आणि माता सीतेचा विवाह झाला होता. असे मानले जाते की या दिवशी राम आणि सीतेची मनोभावे पूजा केल्याने वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखकर होते तसेच इच्छित जीवनसाथी आणि सौभाग्य लाभते. विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. (Lord Vishnu)
विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करण्याला मोठे महत्त्व आहे. केळी हे भगवान विष्णूंचे आवडते झाड आहे असे मानले जाते. घराच्या अंगणात किंवा बागेत केळीचे झाड लावल्यास त्याचे शुभ फळ मिळते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी येते विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. केळीच्या झाडाचे हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे. अनेक शुभ कार्यक्रमांना केळीच्या झाडाला प्रथम स्थान दिले जाते. मात्र केळीच्या झाडाचे नक्की धार्मिक महत्त्व कोणते चला जाणून घेऊया. (Vivah panchami)
हिंदू धर्मग्रंथांमध्ये केळीची वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते. केळीच्या पानांचा उपयोग अनेक प्रकारच्या पूजेत केला जातो. केळीचे फळं, केळीचं देठ, पानं पूजेमध्ये उपयोगात आणले जातात. हे शुभ आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. केळीच्या झाडामध्ये देवगुरु बृहस्पतीचा वास मनाला गेला आहे. शास्त्रानुसार सात गुरुवार नियमितपणे केळीची पूजा केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. खास करून देशातील दक्षिण भागाचा विचार केल्यास येथे केळीच्या पानांचा वापर पूजेच्या वेळी हमखास केला जातो. शास्त्रानुसार केळीचे झाड शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. (Todays Marathi Headline)

शास्त्रानुसार, केळीच्या झाडामध्ये विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा वास असतो असे म्हटले गेले आहे. त्यामुळे पूजेदरम्यान, केळीच्या पानांचा वापर केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा सैदव आपल्यावर राहते असे म्हटले जाते. पूजेत केळ्याच्या पानांचा वापर केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपने पूजेचे कार्य विनाअडथळा पूर्ण होते. केळीच्या झाडाचा संबंध गुरु अर्थात गुरु ग्रहाशी सुद्धा आहे. असे मानले जाते की, पूजेमध्ये केळीच्या पानांचा वापर केल्याने कुंडलीतील गुरुचे स्थान अढळ होते आणि शुभ परिणाम दिसू लागतात. (Reliogius)
भगवान विष्णूच्या पूजेमध्ये विशेषत: सत्यनारायणाच्या पूजेमध्ये नक्की वापरले जाते. कारण असे म्हटले जाते की, केळीच्या झाडाचा मंडप पूजास्थळाला पूर्णपणे शुद्ध करतो. याशिवाय गृह प्रवेशाच्यावेळी दरवाजाच्या दोन्ही बाजूला केळीची रोपे लावणे खूप शुभ मानले जाते. बरेच लोक इतर दिवसातही सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून घराच्या मुख्य दारावर केळीचे रोप लावतात. हिंदू धर्मात केळीचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. कोणतीही पूजा, होम, हवन आदींमध्ये केळ्याचा पानाचा वापर केला जातो. केवळ केळीचे पानच नाही तर केळीचे फळ वाण म्हणूनही देण्यात येते. शास्त्रानुसार, केळीच्या पानावर केळीचा आस्वाद घेतल्याने दाम्पत्य जीवन सुखमय होण्यास मदत होते. (Top Marathi News)
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला केळीचे पाने लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने सुख समृद्धी घरात नांदते. याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार लग्नमंडपात केळीची रोपे लावणे शुभ मानले जाते. केळीच्या रोपाचा उपयोग धार्मिक विधींमध्येही केला जातो. त्याच्या देठाला सौभाग्याचे प्रतीक मानून गणेशपूजेत त्याचा वापर केला जातो. मान्यतेनुसार अनेक लोक गणपती बाप्पाला केळीची पानेही अर्पण करतात. पंजिरीसारखे पदार्थ बनवण्यासाठी केळीचा वापर केला जातो. दुर्गापूजेच्या वेळी मंडप आणि मंचावर केळीच्या पानांसह केळीची सजावट केली जाते. प्रत्येक पूजन कर्मामध्ये केळीच्या पानांचा उपाय केला जातो. ऋषीपंचमीच्या दिवशी केळीच्या पानावर चंदनाने सप्तऋषीचे चिन्ह काढून पूजा केली जाते. (Latest Marathi Headline)
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा विवाह होत होता, तेव्हा तेथे उपस्थित देवांनी देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीची थट्टा केली आणि यामुळे अलक्ष्मीला खूप दुःख झाले. जेव्हा दुःखी अलक्ष्मी भगवान विष्णूंकडे पोहोचली, तेव्हा त्यांनी अलक्ष्मीला आपल्या संरक्षणाखाली घेतले. विष्णूजींनी अलक्ष्मीला आशीर्वाद दिला की आजपासून दरिद्रता केळीच्या झाडात वास करेल. तसेच, जो कोणी खऱ्या मनाने केळीच्या झाडाची पूजा करेल त्याला नक्कीच माझा आशीर्वाद मिळेल. या कारणामुळे घरात केळीचे झाड ठेवल्याने आपोआपच दरिद्रता येते. आणि नकळतपणे घरात एकामागून एक अडचणी येऊ लागतात. म्हणूनच घरात केळीचे झाड ठेवण्यास मनाई आहे. (Top Trending News)
=========
Banana Tree : विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा का केली जाते?
Prayagraj : माघमेळ्यासाठी प्रयागराज सज्ज !
=========
जर कोणी घरात केळीचे झाड लावले, तर त्याचा विनाकारण खर्च वाढतो आणि त्याच्याकडे पैसा टिकत नाही. यामुळेच वास्तुशास्त्रात म्हटले आहे की, केळीच्या झाडाखाली बसून जेवण करू नये. घरात केळीचे झाड लावणे अशुभ मानले जात असले तरी, शुभ आणि धार्मिक समारंभांमध्ये केळीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रात असा सल्लाही दिला जातो की, जर एखाद्या व्यक्तीला केळीचे झाड लावायचे असेल, तर त्याने ते मोकळ्या जागेत लावावे, घरात नाही. धार्मिक मान्यतेनुसार केळीचे मूळ सोबत ठेवल्याने धन मिळण्याची शक्यता निर्माण होते. माणसाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते. याशिवाय उधळपट्टीवरही आपोआप लगाम येतो. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही त्याची हमी देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
