IVF प्रक्रियेनंतर जुळी मुले कंसीव होणे ही आजकाल अत्यंत सामान्य बाब झाली आहे. परंतु गर्भधारणा पुढे सरकत असताना बहुतेक महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वात मोठा प्रश्न पडतो नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का, की सी-सेक्शनच करावे लागेल? जुळ्या गर्भधारणेला सामान्य गर्भधारणेपेक्षा जास्त रिस्क असतो, त्यामुळे प्रसूतीची पद्धत ठरवताना डॉक्टर बरेच घटक तपासतात. (IVF )
जुळ्या गर्भधारणेला हाय-रिस्क का मानले जाते? IVF मध्ये अनेकदा दोन किंवा अधिक एम्ब्रिओ ट्रान्सफर केले जातात, ज्यामुळे जुळी मुले होण्याची संभावना वाढते. जुळी गर्भधारणा ही आपल्या स्वभावत हाय-रिस्क प्रेग्नंसी मानली जाते. या स्थितीत पुढील गुंतागुंती उद्भवण्याची शक्यता जास्त (IVF )

IVF Pregnancy
अकाली प्रसूती (Preterm delivery)
प्री-एक्लेम्प्सिया किंवा उच्च रक्तदाब
एका बाळाची वाढ कमी व दुसऱ्याची जास्त
अम्निओटिक फ्लुइडचे असंतुलन
या धोकारांमुळे डॉक्टर प्रसूतीची पद्धत अत्यंत सावधपणे निवडतात.
नॉर्मल डिलिव्हरी कधी शक्य असते? अनेक महिलांना असे वाटते की IVF प्रेग्नंसी म्हणजे सी-सेक्शनच, पण प्रत्यक्षात नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा शक्य असते, जर काही अटी पूर्ण होत असतील तर पहिले बाळ हेड-डाउन पोझिशन मध्ये असणे दोन्ही बाळांची वाढ आणि वजन योग्य असणे आईचा BP आणि शुगर लेव्हल नियंत्रणात असणे
कोणतीही गुंतागुंत नसलेली प्रेग्नंसी या सर्व परिस्थिती नीट असतील तर डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करू शकतात. तसेच आई शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर नॉर्मल डिलिव्हरी सहज शक्य होते. (IVF )
सी सेक्शन कधी करावा लागतो? जुळ्या गर्भधारणेत बहुतांश वेळा डॉक्टर सी-सेक्शन सुरक्षित पर्याय मानतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे दोन्ही बाळांचे संरक्षण आणि प्रसूतीदरम्यान गुंतागुंत कमी करणे. सी-सेक्शन आवश्यक ठरते जेव्हा दोन्ही बाळांची स्थिती बदललेली असेल, ब्रीच पोझिशन आईला प्री-एक्लेम्प्सिया, डायबिटीज, ब्लीडिंग यांसारखे रिस्क बाळाचे हृदयाचे ठोके अनियमित होणे प्लॅसेंटाची समस्या किंवा कॉर्ड गुंतणे एक बाळ खूप कमकुवत असणे या परिस्थितीत सी-सेक्शन आई आणि दोन्ही बाळांसाठी जास्त सुरक्षित ठरते. (IVF )
=======================
हे देखिल वाचा :
Pregnancy Dite : गर्भावस्थेत योग्य पोषण का अत्यावश्यक, आहारात काय ठेवावे तज्ज्ञांकडून जाणून घ्या
SBI १ डिसेंबर २०२५ पासून बंद करणार ही सर्विस खातेदारांना होईल मोठा परिणाम
========================
IVF मध्ये कोणता पर्याय जास्त सुरक्षित? IVF प्रेग्नंसी ही सामान्य गर्भधारणेपेक्षा जास्त निरीक्षणाची मागणी करते. जरी नॉर्मल डिलिव्हरीसाठी आवश्यक अटी पूर्ण होत असल्या तरी IVF ट्विन प्रेग्नंसीमध्ये सी-सेक्शन दर अधिक असतो, कारण यात अनपेक्षित गुंतागुंत जास्त आढळते. तरीही, अंतिम निर्णय हा पुढील गोष्टींवर अवलंबून असतो बाळांची स्थिती आईचे आरोग्य प्रेग्नंसीमध्ये आलेल्या अडचणी अल्ट्रासाऊंड आणि इतर टेस्टचे रिपोर्ट आई आणि बाळांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन डॉक्टरच सर्वात अचूक निर्णय घेतात. (IVF )
IVF द्वारे जुळी मुले कंसीव झाल्यास नॉर्मल डिलिव्हरी शक्य असते, परंतु बहुतेक वेळा सी-सेक्शन अधिक सुरक्षित मानले जाते. प्रसूतीची पद्धत ठरवताना डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय तपासणी हा सर्वात महत्त्वाचा आधार असतो. आई व बाळांच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे, हे त्यांच्या स्थितीनुसारच ठरवणे सर्वात सुरक्षित आहे.
