Home » Skin Care : स्किनकेअर रूटीन करूनही मिळत नाही रिजल्ट? या चुका ठरतायत मोठी कारणं!

Skin Care : स्किनकेअर रूटीन करूनही मिळत नाही रिजल्ट? या चुका ठरतायत मोठी कारणं!

by Team Gajawaja
0 comment
Skin Care
Share

Skin Care : चेहऱ्याची त्वचा चमकदार, हेल्दी आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी लोक विविध स्किनकेअर रूटीन फॉलो करतात. क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, सिरम, फेस पॅक… अशी अनेक पायरी असलेली रूटीन अनेक जण दररोज करतात. तरीही अनेकदा अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. त्वचा निस्तेज दिसते, पिंपल्स थांबत नाहीत किंवा पोर्स blocc होतात. तज्ज्ञ सांगतात की स्किनकेअर काम न करण्यामागे बर्‍याचदा काही मूलभूत चुका कारणीभूत असतात. त्या वेळेवर दुरुस्त केल्या तर काही आठवड्यांत त्वचेत बदल दिसू शकतो. (Skin Care)

आपल्या स्किन टाइपनुसार प्रॉडक्ट न निवडणे स्किनकेअरमध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या त्वचेनुसार योग्य प्रॉडक्ट न वापरणे. ज्यांची त्वचा ऑइली आहे ते हेवी क्रीम वापरतात, तर ड्राय स्किन असलेले जण स्ट्राँग क्लेन्झर वापरतात. यामुळे त्वचेचा नैसर्गिक बॅरिअर डॅमेज होतो आणि अ‍ॅक्ने, ड्रायनेस किंवा रेडनेस वाढतो. त्वचा ऑइली असेल तर जेंटल जेल-बेस्ड क्लिंझर आणि लाइटवेट मॉइश्चरायझर योग्य ठरते. ड्राय स्किनसाठी क्रीम-बेस्ड प्रॉडक्ट्स आणि हायलूरॉनिक अ‍ॅसिडसारखी ingredient फायदेशीर असतात. त्यामुळे स्किन टाइप ओळखा आणि त्यानुसार रूटीन सेट करा. (Skin Care)

Skin Care

Winter Skin Care

खूप जास्त प्रॉडक्ट्स वापरणे किंवा वारंवार बदलणे स्किन इन्फ्लुएंसर किंवा सोशल मीडियामुळे लोक सतत नवे प्रॉडक्ट्स वापरत राहतात. दर 4–5 दिवसांनी सिरम बदलणे, नवी क्रीम ट्राय करणे किंवा एकाच वेळी 6–7 लेयर्स लावणे हे त्वचेसाठी घातक ठरते. जास्त प्रॉडक्ट्समुळे ingredient clash होतो आणि पिंपल्स, redness, dryness यांसारख्या समस्या वाढतात. तज्ज्ञांच्या मते, कमीत कमी पण consistent routine हेच सर्वात प्रभावी असते. 3–4 बेसिक प्रॉडक्ट्स पुरेसे असतात—क्लिंझर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि गरजेनुसार एक सिरम. (Skin Care)

सनस्क्रीनचा अभाव सर्वात मोठी चूक अनेक जण रात्रीचे सिरम, फेस मास्क, महागडी क्रीम वापरतात परंतु सनस्क्रीनचा वापर टाळतात. यामुळे त्वचेवर pigmentation, टॅनिंग, premature aging आणि fine lines दिसू लागतात. तुम्ही कितीही चांगले स्किनकेअर करा… पण सनस्क्रीन न लावल्यास ते सर्व निरर्थक ठरते. त्वचेचे संरक्षण ही पहिली पायरी आहे आणि SPF 30–50 ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन रोज वापरणे अत्यंत आवश्यक आहे हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा, सर्व ऋतूंमध्ये!

========================

हे देखिल वाचा :

Pickle Oil : हिवाळ्यात लोणच्याचे तेल का सुकते? जाणून घ्या ते पुन्हा पूर्वीसारखे मऊ आणि वापरण्यायोग्य कसे कराल                                    

Stretch Marks : स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय? कारणे, बचावाचे उपाय आणि ट्रीटमेंट पर्याय                                    

Gita Jayanti 2025: गीता जयंती कधी आहे? जाणून घ्या श्रीकृष्णांचे 5 जीवन बदलणारे उपदेश                                    

=======================

एक्सफोलिएशनची चुकीची पद्धत स्किन Dead cells काढण्यासाठी exfoliation महत्त्वाचे असले तरी ते अति केले तर त्वचा संवेदनशील बनते. अनेक जण आठवड्यातून 3–4 वेळा स्क्रब किंवा केमिकल एक्सफोलिएंट वापरतात. यामुळे स्किन पातळ होते, irritation वाढते आणि उलट त्वचा dull दिसते. एक्सफोलिएशन आठवड्यातून फक्त 1–2 वेळाच करावे. केमिकल एक्सफोलिएंट (AHA/BHA) वापरत असाल तर night वापरा आणि नंतर मॉइश्चरायझर व दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन अनिवार्य आहे. (Skin Care)

चुकीची lifestyle सवयी  स्किनकेअरवर परिणाम केवळ प्रॉडक्ट्स नव्हे तर lifestyle सुद्धा त्वचेवर मोठा परिणाम करतो. कमी पाणी पिणे, junk food जास्त खाणे, कमी झोप, ताणतणाव, धूम्रपान किंवा अल्कोहोल यामुळे त्वचा निस्तेज दिसते. स्किन तज्ज्ञ सांगतात की हेल्दी स्किनसाठी 70% योगदान lifestyle चे असते. त्यामुळे स्वच्छ आहार, पुरेशी झोप, hydration, light exercise आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हे स्किनकेअरइतकेच महत्त्वाचे आहे.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.