Breast Cancer : स्तनकर्करोग (Breast Cancer) हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक असून त्याची वेळेत ओळख होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा लोकांना स्तनात गाठ जाणवली तरच धोक्याची जाणीव होते परंतु तज्ज्ञ सांगतात की, गाठ ही एकमेव लक्षण नसून शरीर अनेक सूचक चिन्हांद्वारे स्तनकर्करोगाची शक्यता आधीच चेतावणी देते. जागरूकता, वेळेवर तपासणी आणि योग्य वेळी केलेली वैद्यकीय सल्लामसलत यामुळे जीव वाचण्याची शक्यता अनेकपट वाढते. म्हणूनच, या 5 महत्त्वाच्या संकेतांची माहिती असणे अत्यावश्यक आहे. (Breast Cancer)
स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात अचानक बदल स्तनाचा आकार मोठा किंवा छोटा दिसणे, त्यात अचानक सूज येणे किंवा आकार असमान होणे हे स्तनकर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. बरेचदा महिलांना हे बदल फारसा महत्त्वाचा वाटत नाहीत, पण हे शरीरातील असामान्य पेशींच्या वाढीचे संकेत असू शकतात. जर तुम्हाला एकाच स्तनात सतत सूज, घट्टपणा किंवा वेगळा आकार जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Breast Cancer)

cancer-warning
स्तनाग्रातून द्रवस्राव दूध नसतानाही येणारे स्त्राव स्तनाग्रातुन पांढरा, पिवळा, लालसर किंवा पारदर्शक द्रव बाहेर पडणे हे निश्चितच दुर्लक्ष न करण्यासारखे लक्षण आहे. विशेषतः एका स्तनातून अनियमित पद्धतीने स्त्राव येत असल्यास स्तनातील नलिका किंवा ऊतकांमध्ये असामान्यता असल्याची शक्यता असते. हे लक्षण नेहमी कर्करोगाशी संबंधित नसले तरी त्यावर वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करणे अत्यावश्यक आहे. (Breast Cancer)
स्तनाग्र आत ओढला जाणे किंवा त्याच्या त्वचेत बदल स्तनाग्राचा आत ओढला जाणे (Nipple Retraction) हे अनेकदा महिलांकडून दुर्लक्षित केले जाते. परंतु हे लक्षण कर्करोगामुळे ऊतकांच्या ताणाव्यात होणाऱ्या बदलांशी थेट संबंधित असू शकते. तसेच स्तनाग्रावर किंवा त्याच्या आसपास त्वचा सुरकुतणे, खडबडीत होणे, तपकिरी किंवा लालसर रंग येणे यांसारखे बदल दिसल्यास ते त्वरीत तपासावे.
स्तनातील किंवा बगल क्षेत्रातील वेदना गाठ नसतानाही स्तनात सतत जळजळ, तीव्र वेदना किंवा बगल (armpit) भागात चिमटीसारखी वेदना जाणवत असेल तर तज्ज्ञांच्या मते हे लक्षण स्तनातील लिम्फ नोड्स सक्रिय झाल्याचे संकेत असू शकते. मासिक पाळीदरम्यान हलकी वेदना सामान्य असते; पण ती वारंवार आणि कारण न समजता होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करु नये. (Breast Cancer)
===========================
हे देखिल वाचा :
Joint Pains: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? वाचा कारणे आणि सोपे उपाय
Skin Cancer : स्किन कॅन्सरचा धोका कोणाला असतो? जाणून घ्या लक्षणे
Winter Health : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी घ्या सकस आणि पौष्टिक आहार
===========================
स्तनाच्या त्वचेवर लालसर पुरळ, जाडी किंवा ‘ऑरेंज पील’ सारखा टेक्स्चर काही महिलांमध्ये स्तनाच्या त्वचेवर सूज, लालसरपणा किंवा नारळाच्या करवंटीप्रमाणे (orange peel texture) खडबडीतपणा दिसतो. हे ‘Inflammatory Breast Cancer’ चे मुख्य लक्षण असून हा प्रकार अतिशय जलद पसरतो. त्यामुळे त्वचेवरील असे सूक्ष्म बदलही धोक्याची पूर्वसूचना देऊ शकतात. स्तनकर्करोगाची लक्षणे अनेकदा साध्या समस्यांसारखी वाटतात, म्हणूनच त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. गाठ नसली तरी शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. नियमित स्व-परीक्षण (Self-examination), वेळेवर मॅमोग्राफी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच स्तनकर्करोगावरील लढाईतील सर्वात प्रभावी पाऊल आहे. (Breast Cancer)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
