Home » Health : हिवाळ्यात दारू प्यायल्याने खरंच शरीर उष्ण होते का?

Health : हिवाळ्यात दारू प्यायल्याने खरंच शरीर उष्ण होते का?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

हळूहळू थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. सकाळी, रात्री अनेक लोकं शेकोट्या करत त्यांच्यासमोर बसतात. यासोबतच शरीरातील थंडी पळवण्यासाठी विविध उपाय देखील करतात. जसे की, उष्ण कपडे घालणे, उष्ण पदार्थ खाणे. अनेक लोकं शरीरातील थंडी घालवण्यासाठी दारू देखील पितात. हिवाळ्यात दारू पिण्याचा ट्रेंड वाढतो. आपण अनेक चित्रपटांमध्ये बघतो की, खूप थंडी असली तर थंडी पळवण्यासाठी सिनेमातील कलाकार दारू पितात. दारू प्यायल्या नंतर त्यांची थंडी पळून जाते आणि शरीर उष्ण होते. मात्र प्रत्यक्षात खरंच असे घडते का की, दारू प्यायल्याने थंडी पळून जाते? चला जाणून घेऊया. (Winter Health)

हिवाळ्यात अल्कोहोल प्यायल्याने त्वचेच्या पृष्ठभागावरील रक्तवाहिन्या उघडतात आणि यामुळे लोकांना काही काळ उष्णता जाणवते. याचा अर्थ असा नाही की तुमच्या शरीराचे तापमान बदललं आहे. काही काळानंतर, आपल्या शरीराचं तापमान वेगानं कमी होईल आणि हायपोथर्मियाचा धोका देखील वाढेल. अल्कोहोलचे सेवन केल्याने तुमच्या शरीराचे तापमान झपाट्याने कमी होऊ शकतं, जे अनेक बाबतीत प्राणघातक ठरू शकते. दारु थंडीपासून वाचवत नाही तर थंडीसंदर्भात आणखीन संवेदनशील बनवत असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Health)

काही तज्ज्ञ हेही सांगतात की थंडीत दारू पिणे धोकादायक ठरू शकते. खरे तर अल्कोहोल थंड हवामानात शरीराचे तापमान आणखी वेगाने कमी करते म्हणजे थंडीत व्हिस्की किंवा रम पिऊन बाहेर पडणे खूप धोकादायक ठरू शकते. दारु प्यायल्याने शरीराला जरी गरम वाटत असले तरी शरीराच्या आतील थंडी वाढते. दारु शरीराची हुडहुडी भरण्याची प्रक्रिया देखील दाबून टाकते. वास्तवित शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करण्याची ती कार्य पद्धती असते. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा दारु प्रत्येक मोसमात शरीराला तेवढेच नुकसान पोहचवते. अल्कोहल हे डाययुरेटिक असते त्याने युरिनची फ्रीक्वेन्सी वाढते. अशात थंडीत तहान कमी लागत असताना आणि डीहायड्रेशन वेगाने होते. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रण बिघडते. (Todays Marathi Headline )

Health

याशिवाय दारू हृदयगती आणि रक्तदाबालाही प्रभावित करते. यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. विशेषतः ज्या लोकांना आधीच हृदयाची समस्या असते त्यांच्यात. दारू प्यायल्यानंतर व्यक्तीला थंडी कमी लागते, ज्यामुळे तो जॅकेट किंवा कोट न घालता बाहेर पडतो. हीच कारण शरीराचे तापमान अचानक खाली आणते जी जीवघेणीही ठरू शकते. (Marathi Trending Headline)

खरं तर शरीराला उष्णता जाणवू लागताच, आपल्याला घाम येणे देखील सुरू होते, ही एक प्रतिक्रिया आहे जी संपूर्ण शरीराचे तापमान आपोआप कमी करते. त्यामुळे हिवाळ्यात जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमच्या शरीराच्या थंडीचा योग्य प्रकारे शोध घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही हायपोथर्मियाचे शिकार होऊ शकता. हायपोथर्मिया ही अशी स्थिती आहे जेव्हा शरीर उष्णता निर्माण होण्यापूर्वी आंतरिक उष्णता गमावते. या स्थितीत थरथर कापणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रक्तदाब कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Marathi News)

दारू प्यायल्याने तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. कधी कधी शुद्ध हरपल्याने आपण काय करतो तेच कळत नाही. अनेकदा चुकीच्या गोष्टी आपल्या हातून नकळत घडून जातात. त्यामुळे दारू हा थंडीवरचा उपाय असू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते थंडीपासून वाचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे उबदार कपडे घालणे, सूप किंवा चहा यासारख्या उबदार गोष्टी पिणे आणि हायड्रेट राहणे. तज्ज्ञांच्या मते दारू तात्पुरती उबदारपणा देते, पण ही थंड पळवण्याचा कायमस्वरूपी किंवा सुरक्षित उपाय नाही. (Latest Marathi Headline)

=======

Winter : शरीराला उबदार ठेवणाऱ्या ‘या’ चविष्ट सूप रेसिपी नक्की तरी करा

Winter Dite : हिवाळ्यात चणा आणि गूळ एकत्र खाणे किती फायदेशीर, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

=======

हिवाळ्यात शरीर उष्ण कसे ठेवावे?
– उबदार कपड्यांनी शरीर पूर्णपणे झाका.
– आहारात गरम पदार्थांचा समावेश करा.
– आलं, लसूण, मध आणि गूळ यांचं सेवन करा.
– दररोज सुमारे ३० मिनिटं व्यायाम करा.
– आवश्यक असल्यास रूम हीटर वापरा. (Social News)

(टीप : ही माहिती केवळ वाचनासाठी आहे. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.