Home » Wedding : ‘ही’ आहेत भारतातील बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन वेडिंगची ठिकाणं

Wedding : ‘ही’ आहेत भारतातील बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन वेडिंगची ठिकाणं

by Jyotsna Kulkarni
0 comment
Wedding
Share

प्रत्येक व्यक्तीसाठी तिचे लग्न हा केवळ एक सोहळा नसून, आयुष्यातील संस्मरणीय दिवस असतो. संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा सुखद आणि आनंदाचा दिवस म्हणजे लग्न. प्रत्येकालाच वाटते की, आपले लग्न सगळ्यात हटके, सुंदर आणि सर्वच लोकांना कायम लक्षात राहील असे व्हावे. त्यासाठी सर्वच वाढू वर पर्यटनशील असतात. आजच्या काळात बहुतकरून मुलामुलींना त्यांचे लग्न डेस्टिनेशन वेडिंग करायची मनापासून इच्छा असते. कलाकारांचे भव्य डेस्टिनेशन पाहून बऱ्याच लोकांना आपणही डेस्टिनेशन वेडिंग करावे असे वाटते. मात्र चांगले आणि बजेटमधील ठिकाण माहित नसते. त्यामुळे त्यांना आपली इच्छा मारावी लागते. मात्र आज आम्ही तुम्हाला भारतातील अतिशय सुंदर आणि बजेटमधील डेस्टिनेशन वेडींगची ठिकाणं कोणती आहेत, ते सांगणार आहोत. (Destination Wedding)

गोवा
खुल्या आकाशाखाली, समुद्राच्या लाटांच्या आवाजात लग्न करण्याची तुमची इच्छा असेल तर गोव्याला नक्की भेट द्या. पालोलेम, वागाटोर आणि कैंडोलिम बीचवर लग्न करण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो. लाइव्ह म्युझिक, सी-फूड आणि पार्टीचं वातावरण तुमच्या लग्नाला एक ‘फन’ टच देईल. गोव्यात तुमच्या बजेटमध्ये असणारी काही उत्तम ठिकाणे आहेत. तसेच ऑफ-सीझनमध्ये लग्नाचे नियोजन केल्याने आणखी चांगले डिस्काउंट मिळू शकतात. १० ते १५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये गोव्यात एक भव्य बीच वेडिंग आयोजित केले जाऊ शकते. (India)

Wedding

लोणावळा-खंडाळा
मुंबई आणि पुणे या शहरांपासून जवळ असल्यामुळे लोणावळा आणि खंडाळा हे सर्वात सोयीचे ठिकाण आहे. अनेक लोकं विकेंड ट्रीपसाठी कायम या ठिकाणी जात असतात. निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेले लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण देखील डेस्टिनेशन वेडींगसाठी उत्तम पर्याय आहे. हिरव्यागार डोंगररांगा आणि मनमोहक दऱ्यांच्या पार्श्वभूमीवर येथे अनेक आलिशान रिसॉर्ट्स आणि बुटीक हॉटेल्स उपलब्ध आहेत. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लग्न असल्यास येथे तुमच्या फोटोंना एक अप्रतिम आणि सुंदर लूक मिळतो. इथे निसर्गरम्यता, मुंबई-पुण्याहून सोपी कनेक्टिव्हिटी, अनेक भव्य बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. (Marathi News)

Wedding

अलिबाग
सध्या अनेक व्यावसायिक, कलाकार यांचे आवडते ठिकाण म्हणून अलिबागला ओळखले जात आहे. अनेक कलाकारांनी या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. अतिशय सुंदर शहर म्हणून अलिबागला ओळखले जाते. समुद्रकिनाऱ्यावर लग्न करण्याची तुमची इच्छा असेल, तर महाराष्ट्रातला बजेट फ्रेंडली असा अलिबाग हा सर्वोत्तम पर्याय आहे. ‘मिनी-गोवा’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण शांत समुद्रकिनारे, नारळाची झाडे आणि सनसेटच्या सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. अलिबागमध्ये अनेक बीच-फेसिंग व्हिला आणि रिसॉर्ट्स आहेत, जे खास बीच वेडिंगसाठी डिझाइन केलेले आहेत. इथे तुम्हाला बीच वेडिंगचा अनुभव मिळेल. शांत आणि खासगी ठिकाणे उपलब्ध आहेत. तसेच मुंबईहून जलमार्गाने पोहोचण्याची सुविधादेखील आहे. (todays Marathi Headline)

Wedding

मसुरी
भारतातील प्रसिद्ध हिल्स स्टेशन म्हणून मसुरी जगभर ओळख आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेले मसुरी प्रत्येकाचेच ड्रीम डेस्टिनेशन आहे. लग्नासाठी अतिशय परफेक्ट ठिकाण म्हणजे मसुरी. सावॉय हॉटेल आणि जे डब्ल्यू मेरियटसारख्या ठिकाणी तुम्हाला डोंगरांच्या सुंदर दृश्यांसोबत पारंपरिक आणि आधुनिकतेचं मिश्रण पाहायला मिळेल. उंच ठिकाणी, थंड वातावरणात लग्न करण्याचा अनुभव खरंच अविस्मरणीय असतो. (Marathi Trending Headline)

Wedding

अंदमान आणि निकोबार
जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांत आणि खासगी ठिकाणी लग्न करायचे असेल, तर अंदमान आणि निकोबार हे एक उत्तम ठिकाण आहे. शांत समुद्र, निळेशार पाणी आणि आनंददायी वातावरण लग्नासाठी अत्यंत खास ठरतात. खाजगी बीच वेडिंग किंवा सनसेटच्या प्रकाशात घेतलेले लग्नाचे वचन हा अतिशय वेगळा अनुभव असतो. येथील हॅवलॉक आयलंड आणि नील आयलंडसारखी ठिकाणे स्वच्छ पाणी, पांढरी वाळू आणि सुंदर सूर्यास्तासह तुमच्या लग्नाला ‘ड्रीमी’ लुक देतील. (Top Marathi Headline)

Wedding

उदयपूर
बॉलिवूडमधील तर अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची लग्न राजस्थानमधील उदयपूरमधील भव्य, आलिशान राजवाड्यांमध्ये झाले आहेत. हे राजवाडे आणि मोठमोठे किल्ले यांच्यामध्ये शाही जोडप्याप्रमाणे आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधणे म्हणजे स्वर्गीय अनुभव आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि शाही विवाह करण्यासाठी उदयपूर हे योग्य ठिकाण असू शकते. राजस्थानमध्ये अशी अनेक खास ठिकाणे आहेत जिथे तुम्ही वेडिंग डेस्टिनेशनचा प्लॅन टाकू शकता. येथे सुमारे १०० लोकांच्या गेस्ट लिस्टसाठी तुम्हाला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावे लागतील. (Latest Marathi News)

Wedding

नाशिक वाइनयार्ड
इतरांपेक्षा वेगळ्या ठिकाणी लग्न करण्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच वाइनयार्ड वेडिंगचा अनुभव घेऊ शकता. आता वाइनयार्ड म्हटल्यावर नाशिकला पर्याय नाही. ‘भारताचे वाइन कॅपिटल’ अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये अनेक सुंदर आणि आकर्षक वाइनयार्ड आहेत. येथील विस्तीर्ण द्राक्षांचे मळे आणि शांत, युरोपियन-शैलीचे रिसॉर्ट्स तुमच्या लग्नाला एक युनिक आणि क्लासिक टच देऊ शकतात. वाइनयार्डचे सौंदर्य विशेषतः सूर्यप्रकाशात फोटोशूटसाठी अप्रतिम असते. इथे तुम्हाला वाइनयार्डचा रोमँटिक अनुभव मिळतो, निसर्गरम्य आणि शांत वातावरण मिळते. तसेच हे खासगी समारंभासाठी उत्तम आहे. (Top Trending News)

Wedding

===========

Dating Trend: झिप कोडिंग म्हणजे नेमकं काय? कपल्ससाठी कसा ठरतोय फायदेशीर?

===========

महाबळेश्वर-पाचगणी
पश्चिम घाटातील ही दोन्ही ठिकाणे पर्वतांवरील शांतता आणि थंडीसाठी प्रसिद्ध आहेत. येथे अनेक अति-आलिशान रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत, जे दरीच्या विहंगम दृश्यांसह लग्नाचे आयोजन करतात. थंड हवामान आणि सुंदर व्ह्यू-पॉईंट्स असल्यामुळे तुमचा विवाहसोहळा खूपच आकर्षक आणि वेगळा ठरू शकतो. थंड आणि आल्हाददायक हवामान, सुंदर व्ह्यू-पॉईंट्स, निसर्गाच्या कुशीत लग्न करण्याची संधी हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. (Social News)

Wedding

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.