प्रत्येक महिन्यामध्ये खास दिवशी काही विशेष तिथी येत असतात. मात्र या तिथी आपल्या लक्षात देखील येत नाही. तिथी छोट्या असल्या तरी खूपच महत्त्वाच्या आणि खास असतात. प्रत्येक महिन्याला येणारी अशीच एक तिथी म्हणजे ‘अष्टमी’ किंवा ‘दुर्गाष्टमी’. देवीला समर्पित असलेली ही अष्टमीची तिथी प्रत्येक महिन्यात येते, मात्र आपल्याला याबद्दल जास्त माहिती नसते. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक अष्टमी साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरमध्ये पाहिले तर प्रत्येक महिन्यात दोन अष्टमी तिथी असतात. एक कृष्ण पक्षात आणि दुसरा शुक्ल पक्षात येतो. शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी व्रत केले जाते. या व्रताला दुर्गा देवीचे मासिक व्रत असेही संबोधले जाते. मासिक अष्टमीच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला दुर्गादेवीचे व्रत आणि उपासना केली जाते. (Goddess Durga)
दुर्गाष्टमीच्या दिवशी अनेक लोकं उपवास करून दुर्गा देवीची पूजा करतात. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मान्यतेनुसार अष्टमीच्या दिवशी दुर्गेची पूजा केल्याने जीवनातील संकटे कमी होतात आणि येणाऱ्या संकटांपासून देऊ सर्वांचे रक्षण करते. तुमच्या आयुष्यामधील महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील आणि प्रगती होत नसेल तर तुम्ही मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी या गोष्टी केल्यामुळे सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या मनामधील विचार सकारात्मक ठेवा. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते, धन-धान्य वाढते आणि कौटुंबिक जीवनात शांती राहते. (Durgashatami)
मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गाष्टमी यंदा पंचांगानुसार, शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.२९ वाजता या तिथीची सुरुवात होणार आहे. अष्टमी तिथीची समाप्ती शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता होणार आहे. रात्रीच्या वेळी दुर्गा देवीची पूजा केली जाते. म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गा अष्टमी २८ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. अष्टमीचे व्रत श्रद्धेने केल्यास त्या व्यक्तीला त्याच्या सर्व कामामध्ये अपेक्षित यश मिळते. (Todays Marathi Headline)

दुर्गाष्टमीची पूजा कशी करावी?
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. दुर्गा देवीला लाल रंग आवडत असल्याने या दिवशी लाल कपडे घालणे शुभ मानले जाते. यानंतर हातात गंगाजल, तांदूळ आणि फुले घेऊन माता दुर्गेचे ध्यान करावे आणि उपवास, पूजा करण्याचा संकल्प करावा. पाणी, दूध, दही, तूप, मध, गंगाजल अर्थात पंचामृताने देवीला अभिषेक करावा. दुर्गा देवीला लाल चुनरी, कुंकू, अक्षता, लाल फुले, माला, धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करावा. नंतर देवीला सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्या. यानंतर दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती, सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा देवी कवच पठण करावे. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरातील ८ किंवा ९ लहान मुलींना अन्नदान करा आणि त्यांना काही भेटवस्तू द्या. जर हे शक्य नसेल तर तुम्ही मुलींच्या घरी जाऊन त्यांना भेट वस्तू देऊ शकता. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन त्या व्यक्तीवर आपला आशीर्वादाचा वर्षाव करात. (Marathi News)
दुर्गाष्टमीला हवन करणे खूप शुभ मानले जाते. म्हणून, शक्य असल्यास या दिवशी हवन जरूर करावे. शेवटी, माता दुर्गेची आरती करावी. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी या मंत्राचा जप करावा. ओम सर्वमंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते । अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमी तिथीला सकाळी लवकर उठून स्नान करून दुर्गेची पूजा करावी. देवीला फळे आणि मिठाई अर्पण करावी. सर्वप्रथम, पारणाच्या वेळी सात्विक अन्नाचे सेवन करावे. उपवास सोडण्यापूर्वी, तुमच्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्न, फळे किंवा दक्षिणा दान करावी. (Marathi Trending Headline)
दुर्गाष्टमी कथा
पौराणिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी असुर दंभला महिषासुर नावाचा पुत्र प्राप्त झाला होता. ज्यांच्यामध्ये लहानपणापासूनच अमर होण्याची तीव्र इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अमर होण्याचे वरदान मिळवण्यासाठी ब्रह्माजींची कठोर तपश्चर्या सुरू केली. महिषासुराच्या या कठोर तपश्चर्येने ब्रह्माजीही प्रसन्न झाले. त्यांनी त्याला इच्छित वर मागण्यास सांगितले. यावर महिषासुराने त्याला फक्त अमर व्हायचे आहे असे सांगितले. परंतु, ब्रह्माजींनी महिषासुराला सांगितले की, जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर जन्म निश्चित आहे. त्यामुळे अमरत्व नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. त्यानंतर ब्रह्माजींचे म्हणणे ऐकून महिषासुराने त्यांच्याकडून आणखी एक वरदान घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि सांगितले की ठीक आहे स्वामी, जर मृत्यू निश्चित असेल तर मला असे वरदान द्या की माझा मृत्यू एखाद्या स्त्रीच्या हातून व्हावा. याशिवाय दुसरा कोणताही राक्षस, मनुष्य किंवा देवता मला मारण्यास सक्षम नसावा. (Top Stories)

त्यानंतर ब्रह्माजींनी महिषासुराला हेच वरदान दिले. ब्रह्मदेवाकडून वरदान मिळताच महिषासुर अभिमानाने आंधळा झाला आणि त्यामुळे त्याच्या लोकांवरील अन्यायही वाढला. मृत्यूच्या भीतीतून मुक्त होऊन त्याने आपल्या सैन्यासह पृथ्वीवर हल्ला केला. त्यामुळे पृथ्वी चारी बाजूंनी थरथरू लागली. त्याच्या सामर्थ्यापुढे सर्व प्राणीमात्रांना नतमस्तक व्हावे लागले. त्यानंतर पृथ्वी आणि पाताळाला जिंकल्यानंतर गर्विष्ठ महिषासुराने इंद्रलोकावरही आक्रमण केले. (Marathi Top News)
ज्यामध्ये त्याने इंद्रदेवाचा पराभव केला आणि स्वर्गही काबीज केला. महिषासुरामुळे व्यथित होऊन सर्व देवी-देवता मदत मागण्यासाठी त्रिदेवांकडे पोहोचले. यावर विष्णूजींनी देवी शक्तीच यात मदत करू शकेल असे सांगितले. त्यानंतर सर्व देवतांनी मिळून देवी शक्तीला मदतीसाठी हाक मारली आणि ही आर्त हाक ऐकून सर्व देवतांच्या शरीरातून बाहेर पडलेल्या प्रकाशाने अतिशय सुंदर सौंदर्य निर्माण झाले आणि याच तेजातून आदिशक्तीचा जन्म झाला. जिच्या रूपाने आणि तेजाने सर्व देवांनाही आश्चर्य वाटले. (Marathi Latest Headline)
हिमवनाने त्रिदेवांच्या साहाय्याने निर्माण केलेल्या दुर्गा देवीला सिंहावर स्वार होण्यासाठी दिले आणि त्याचप्रमाणे तिथे उपस्थित असलेल्या सर्व देवांनी आपली प्रत्येक शस्त्रे मातेच्या स्वाधीन केली आणि अशा प्रकारे स्वर्गातील देवी दुर्गा महिषासुराला मारण्यासाठी आली. देवीचे अतिशय सुंदर रूप पाहून महिषासुराला तिच्याबद्दल खूप आकर्षण वाटू लागले आणि त्याने आपल्या एका दूताद्वारे देवीला लग्नाचा प्रस्तावही पाठवला. गर्विष्ठ महिषासुराच्या या क्षुल्लक कृत्याने देवी भगवती खूप क्रोधित झाली. त्यानंतर देवीने महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. (Top Trending News)
===========
Shriram : अतिशय शुभ दिवस असूनही विवाह पंचमीला लग्न करणे का टाळतात?
Vivah Panchami : विवाह पंचमीला सुखी वैवाहिक जीवनासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
Margashirsha : मार्गशीर्षातील गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करावी?
===========
दुर्गा मातेची युद्धाची हाक ऐकून आंधळा महिषासुर ब्रह्माजीकडून मिळालेल्या वरदानाच्या गर्विष्ठतेने तिच्याशी युद्ध करण्यास तयार झाला. या युद्धात दुर्गा मातेने महिषासुराच्या संपूर्ण सैन्याचा एकेक करून नायनाट केला. हे युद्ध संपूर्ण नऊ दिवस चालले. त्यादरम्यान असुरांचा सम्राट महिषासुराने अनेक वेळा देवीला विविध रूपे धारण करून फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे सर्व प्रयत्न शेवटी अयशस्वी झाले. देवी भगवतीने आपल्या चक्राने या युद्धात महिषासुराचा शिरच्छेद करून त्याचा वध केला. अशा प्रकारे महिषासुराचा मृत्यू देवी भगवतीच्या हातून शक्य झाला. माता भगवतीने ज्या दिवशी महिषासुराच्या पापांपासून स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ मुक्त केले त्या दिवसापासून दुर्गा अष्टमीचा उत्सव सुरू झाला, असे मानले जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
